Posts

 चौथी नवता चौथीच का श्रीधर तिळवे नाईक  मराठीत पहिली दुसरी तिसरी चौथी अशा तऱ्हेची इतिहास मांडणी करण्याची परंपराच नाही साहजिकच पहिली नवता दुसरी नवता असं म्हंटल कि लोक दचकतात पाश्चात्य देशात मात्र १९६० नन्तर अशी मांडणी कॉमन होत गेली विशेषतः अल्विन टॉफ्लरच्या थर्ड वेव नंतर अशी मांडणी लोकप्रिय झाली आपल्याकडे द भि कुलकर्णी ह्यांनी पहिली परंपरा दुसरी परंपरा अशी मांडणी केली व ह्या नावाचे ग्रन्थही लिहिले विशेषण वापरण्याऐवजी संख्यात्मक मांडणी का केली गेली ह्याचे कारण एकाच काळात एकच मांडणी निर्माण होण्याचा काळ ओसरला होता मी अगदी सुरवातीला जालता हा शब्द वापरायचो पण तो डोक्यावरून जायला लागल्यावर परिचित काही शोधायला हवे म्हणून मी द भि कुलकर्णी ह्यांचा वारसा पुढे न्हेत १९९२ च्या नव्यांच्या अक्षर चळवळीत (संपादक अरुण म्हात्रे ) प्रथम चौथी परंपरा हा शब्द वापरला होता पण परंपरा हा शब्द कोणीच द भि च्या अर्थाने घेत नाही म्हंटल्यावर नवता हा शब्द वापरायला सुरवात केली त्याआधी विशेषण वापरतांना चौथी हा शब्द वापरला कारण करंट ट्रेंड तसाच होता उदाहरणार्थ ह्या काळात मानसशास्त्रात वर्तनवादी शाखेत वर्तनवादी थेरपीला पह
 चौथ्या नवतेच्या चार  कादंबऱ्या इंट्रो श्रीधर तिळवे नाईक  अडाहॉकाबानासुना आल्यानंतर काहींनी  विचारलं होतं इतकंच ? नुसत्या एका कादंबरीनं काय होतं ? मी म्हणालो होतो मी नुसती ओपनिंग करून देतोय पुढच्या खऱ्या खेळ्या पुढची पिढी खेळेल आणि आता चार कादंबऱ्या स्पष्टपणे आलेल्या दिसतायत (विश्राम गुप्तेच्या कादंबरीवर मी आधीच बोललो आहे त्यामुळे तिचा विचार मी इथे करत नाहीये ) नितीन वाघ ह्यांची व्हर्जिन  सुधीर देवरेंची मी गोष्टीत मावत नाही  प्रणव सखदेवची मेट्रोमॉल  अविनाश उषा वसंताची पटेली  ह्यातील सुधीरची कादंबरी अनपेक्षितपणे आली कारण तो ज्या अहिराणीच्या संदर्भात काम करतोय तिच्यातून तो असं काही लिहिल हे अनपेक्षित होतं . नितिनकडून तो भेटल्यापासूनच अपेक्षा होत्या प्रणव मात्र थेट फेसबुकवर (आम्ही अजून एकदाही भेटलेलो नाही ) त्यामुळं माहिती न्हवतं अविनाश कादंबरीकडे आस्तेकदम सरकेलच अशी अपेक्षा होती कारण त्याच्या कविता मी वाचल्या होत्या आणि त्याच्या कवितेच्या भाषेतच पटेलीच्या भाषेची शक्यता स्पष्ट दिसत होती  ह्या चारही कादंबऱ्या अल्टर्नेटीव्ह व्हिजन घेऊन येतात नितीन सेलेबिलिटीची , सुधीर गोष्टीची , प्रणव मॉलची
 कोल्हापूर व पाया पडणे वैग्रे  Alka Gandhi-Aserkar कोल्हापूर - स्त्रियांसाठी फार प्रतिगामी विचार असणारं शहर?? 20 एक वर्षांपूर्वी गेले होते. ज्यांच्याकडे गेले होते त्या घरातील बायका माझ्याच वयाच्या, डोक्यावर पदर घेऊन राबत होत्या.. नि नवऱ्याच्या पायावर रीतसर डोकं ठेवून पाया पडत होत्या.. नवरे इंजेनीअर होते. श्रीधर तिळवे नाईक  प्रथम धन्यवाद ! प्रत्येक विकसनशील शहराप्रमाणे १९८५ला कोल्हापुरवर सरंजामशाहीचा पगडा होता त्यावेळी लिहिलेली ही कविता आहे मात्र कोल्हापूरातही ह्याकाळात आधुनिक विचार करणारे लोक होते व आहेत मात्र ते अल्पसंख्य आहेत पुणे मुंबईतही ह्या काळात किती आधुनिक लोक होते हा संशोधनाचा विषय आहे युरोपअमेरिकेतही प्रबोधनाचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही आजही तिथे शाळेत न गेलेल्या स्त्रिया आहेत प्रश्न प्रमाणाचा असतो आपल्याकडे पुरोगामी लोकांचे प्रमाण धड २० टक्केही नाही आधुनिक म्हणावेत असे ५ टक्केही नाहीत आणि उत्तराधुनिक १ टक्काही नाहीत  प्रत्येक संस्कृतीत आदर व्यक्त करण्याच्या पद्धती असतात आपल्याकडे चरणस्पर्श ही आदर दाखवण्याची पद्धत आहे मी स्वतः माझ्या आईवडिलांना आणि माझ्या दोन्ही बहिणींना मा
 देशीयतेचे कार्य काय श्रीधर तिळवे नाईक  साठोत्तरीचा ज्वर अद्यापही ओसरलेला नाही आपण ज्या संस्कृतीत चाललोय त्यापेक्षा आपण ज्या संस्कृतीत होतो  त्यातच प्रत्येकाला रस ! बरं स्वतः भूतकाळात रमणाऱ्या ह्या लोकांचा तेच काम करणाऱ्या हिंदुत्ववादाला विरोध असतो कारण काय तर ह्यांना परंपरेत काही आधुनिक लोक व विचार सापडत असतात समजा असे लोक तुमच्या परंपरेत नसते तर तुम्ही हिंदुत्ववाद्यांचं काय केलं असतं ? आमच्या परंपरेत हिंदुत्ववाद्यांना विरोध नाही म्हणून गप्प बसला असता कि परंपरा मोडीत काढली असती ? नवतेचा आधार परंपरा असत नाही नवतेचा आधार वर्तमान व भविष्य असते तुम्ही नवतेला पारंपरिक आधार शोधायला लागला कि आपोआपच जे परंपरावादी लोक असतात ज्यांना आधुनिकता किंवा चौथी नवता नको असते ते तुमच्या वळचणीला येऊन उभे राहतात आणि मग तुम्ही परंपरेला बळ देता देता कर्मठपणाला बळ द्यायला लागता रामाचं समर्थन अंतिमतः बजरंग दलाचं समर्थन बनतं आणि परंपरेचा देशीवादी पद्धतीने विचार करणारे लोक कितीही आधुनिक असले तरी ते अल्पसंख्याक असल्याने परंपरेचा अंतिम लढा हा कर्मठ लोकांच्या ताब्यात जातो अंतिमतः हिंदू कादंबरी हिंदुत्ववादाला मदत कर
Image
आंतरराष्ट्रीय, जागतिक आणि वैश्विक श्रीधर तिळवे नाईक  मला वाटतंय जागतिक  आणि आंतरराष्ट्रीय ह्यात तुमची काहीतरी गल्लत होतीये देशी भाषेतील पुस्तक भाषांतरामार्गे जागतिक होऊ शकते पण सॅम्युएल बेकेटसारखा लेखक आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लंड आयर्लंड आणि फ्रांस अशा तीन राष्ट्रातल्या लोकांसाठी लिहीत होता व्ही एस नॉयपॉल व सलमान रश्दीसाठी अनेक राष्ट्रातील ऑडियन्स डोक्यात असावा असे वाटते बाकी वैज्ञानिक तंत्रवैज्ञानिक चिन्हवैज्ञानिक चिन्हतंत्रवैज्ञानिक लेखक तर  उघड उघड आंतरराष्ट्रीय वाचकांसाठी लिहीत असतात केवळ साहित्यासाठी कोण समग्र संस्कृतीला देशीवादी वेठीस  धरेल ? खुद्द नेमाडे बदलतायत हे अलीकडच्या त्यांच्या गोष्टींच्यावरून दिसते नितीन , असं होऊ नये कि नेमाडे नूतन झालेत आणि तुम्ही जुन्या नेमाडेंच्यात थांबलाय .  पहिली गोष्ट तीन कॅटेगरीज  १ वैश्विक  २ जागतिक  ३ आंतरराष्ट्रीय अंतर्राष्ट्रीयमध्ये सगळी राष्ट्रे अभिप्रेत नाहीत दोन राष्ट्रातील वाटाघाटींनाही आंतरराष्ट्रीय वाटाघाटी म्हंटल जातं कम्युनिस्ट पक्षाची अनेक अधिवेशनं आंतरराष्ट्रीय असतात त्यात प्रत्येक राष्ट्र सामावून घेतलं जाईलच असं नाही  जग म्हणजे तु
सॉरी सहमत नाही  मनोहर ओक एक टिपण  श्रीधर तिळवे नाईक  मनोहर ओक ह्यांची एक ओळ आहे  "लेखक कसे सापासारखे  माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे "  ह्या ओळी दिसायला साध्या दिसतात आणि लेखकही त्यामुळे खुश होतात पण त्यातले खरे अर्थसौंदर्य लेखक मध्ये नाहीये ते आहे माणुसकीला दिलेल्या सापाच्या उपमेत अशी उपमा मन्यालाच सुचू शकते वास्तविक माणुसकी म्हणजे कशी छानछान दुधासारखी पांढरी तुपासारखी मुलायम असायला हवी ह्या ओळीत असे होत नाही ती चक्क सापासारखी होते मानवतावादी लोकांनी काढलेल्या माणुसकीबद्दलच्या मुलायम गळ्यापेक्षा इथे चक्क माणुसकीचा फुत्कार ऐकायला मिळतो ह्यात लेखकाचा गौरव जास्त आहे कि सापाचा  हे ठरवणे कठीण आहे मात्र माणुसकी म्हणजे शामळुपणा हे समीकरण मन्या मोडीत काढतो हे नक्की ! श्रीधर तिळवे नाईक 
 आशुतोष दिवाण ह्यांच्या कमेंटवर भाष्य श्रीधर तिळवे नाईक  आशुतोष दिवाण ह्यांनी एक कमेंट केलीये तिला मी इथे उत्तर देतो आहे  प्रिय आशुतोष दिवाणजी  सर्वात प्रथम धन्यवाद ! तुम्ही म्हणताय, "आपण आणि मकरंद साठे या दोघांबद्दल मला आज मराठीत बहुदा सर्वात जास्त आदर आहे हे मी अनेकदा लिहीले आहे". श्रीधर तिळवे :मकरंद साठे ह्यांच्याबद्दल मलाही आदर आहे स्वतःचा मध्यमवर्ग झाकण्यापेक्षा तो खोलून ठेवण्यात अधिक अर्थ आहे हे कळलेल्या दुर्मिळ लेखकांपैकी ते एक आहेत मुख्य म्हणजे श्याम मनोहरांची उगाचची अगतिकता त्यांच्या पात्रांच्या ठायी नाही नवमध्यमवर्गाच्या  आंतरिक लालसा आणि त्यांच्यातील साधनशुचितेचा होत चाललेला ऱ्हास  ते प्रभावीपणे मांडतात असो  तुम्ही म्हणताय,  "पण आपल्या अश्या कविता वाचल्या की मला काही समजेनासे होते". श्रीधर तिळवे नाईक : अश्या म्हणजे कश्या ? तश्या म्हणजे कश्या ?आणि तश्या का आवडतात आणि अश्या का आवडत नाहीत  तुम्ही म्हणताय,  "एक भयंकर मोठा समाज भयंकर इंटेन्सली पोट भरण्यासाठी,आपले जीवन सुधारण्यासाठी इरेला पडून धडपडत आहे.खूप मोठ्या प्रमाणावर तोंडाने बोलत नसला तरी आपल्या व्य