Posts

Showing posts from August, 2018
ग्रीक आणि शैव बुद्धिप्रामाण्यवाद रॅशनॅलिझमचा आदिम अवतार सध्या फेसबुकवर बरेच बुद्धिप्रामाण्यवादी लोक स्वतःला पुरोगामी म्हणवून घेत असतात आणि युक्तिवादही करत असतात त्यातील अनेकांना त्याची बीजे मात्र ठाऊक नसतात . काही पुरोगामी अंधभक्तांचा तर बुद्धिप्रामाण्यवाद हा फुले किंवा आंबेडकर किंवा मार्क्स ह्यांच्यापासून सुरु झाला असा ठाम गैरसमज असतो हा गैरसमज दूर करण्यासाठी इथे त्याचे जे आदिम रूप आहे ते सांगतो अर्थात जे  जाणकार बुद्धिप्रामाण्यवादी आहेत त्यांना हे सर्व माहित असणारच रॅशनॅलिझम समजायचा असेल तर प्रथम आपणाला त्याच्या इतिहासात जावे लागेल आणि त्याची मुळे ग्रीक तत्वज्ञानात कशी होती ते थोडक्यात पहावे लागेल कुठलाही धर्म मायथॉस च्या आधारेच उभा असतो मायथॉस अनेक कथा रचते त्यांना आपण दन्तकथा वा भाकडकथा म्हणतो ग्रीक धर्मही अश्याच अनेक भाकडकथांनी भरलेला होता आणि वैदिकांच्या प्रमाणे ह्या धर्मातही एक इंद्र होता त्याचे नाव झ्यूस ! त्याच्याभवती देवतामंडळ होते आणि ग्रीकांचा ह्या देवतांच्यावर विश्वास होता त्यातूनच  पहिला ध्रुव तयार झाला मायथॉस हा धर्मकेंद्रित होता भारतातही हा मायथॉस आहे व होता आणि
शिवराळ ,अर्वाच्य  आणि अश्लील  श्रीधर तिळवे नाईक चिन्हांच्या संदर्भात जी अभिव्यक्ती  होते त्यामुळे कधी कधी काही भलत्याच समस्या निर्माण होतात त्यातील एक म्हणजे शिवराळ , अश्लील आणि अर्वाच्य ह्यासंदर्भातील शिवराळ भाषेचे दोन प्रकार होतात १ अपशब्द  शिवराळ : ही भाषा लिंगाशी निगडित असत नाही उदाहरणार्थ मूर्ख , हलकट , नीच ह्यांना आपण अपशब्द म्हणतो व सार्वजनिक जीवनात त्यांना वापरण्याची अनुमती देतो म्हणजेच आपण त्यांना वाच्य ठरवतो मात्र असे अपशब्द जातीवाचक वा वर्णवाचक असतील आणि ते अपमान करण्यासाठी वापरले गेले असतील तर मात्र ते अर्वाच्य मानावे लागतात २ लैंगिक शिवराळ : ह्यात कामेन्द्रियांशी जोडून शिवराळ भाषा निर्माण केली जाते पुरुष लिंग आणि स्त्रीलिंग ह्यांना जोडून ही भाषा निर्माण होते पूरुषकेंद्रित समाजात अशी भाषा ही प्रामुख्याने स्त्रीलिंगाशी निगडित असते त्यामुळे रांडेच्या फोद्रीच्या असे शब्द आपण शिवराळ मानतो लवडू सारखा एखाददुसरा शब्द हा पुरुषलिंगाशी निगडित असतो झवाडा झवाडी असे अपवादात्मक शब्द दोन्ही लिंगाना धरून येतात पण ह्यांची रूपे अनेकदा स्त्रीलिंगाशी निगडित असतात ह्या शब्दांना वा शब्दस
मुक्त गझलला "गझल " म्हणणे का आवश्यक आहे ? गेली ३५ वर्षे तू तुझ्या मुक्त गझलांना गझल म्हणू नकोस बाकी काहीही म्हण असा आग्रह माझे काही मित्र करत असतात त्याच आग्रहाचे प्रतिबिंब फेसबुकवर चित्तरंजन भट ह्यांच्या कंमेंट्समध्ये पडलेले दिसते आमचे गझल क्षेत्रातील काही दिग्गज मित्रही ह्या आग्रहात सामील असतात त्यामुळे फेसबुकवर ह्या विषयावर थोडे दीर्घ लिहिणे आवश्यक झाले आहे सर्वात प्रथम साहित्याच्या क्षेत्रात आकार , प्रकार ,अवतार ह्यांचे नेमके कार्य काय चालते हे नीट लक्ष्यात घेतले पाहिजे सर्वात प्रथम आकार !आकार पुढील असतात १ महा २ बृहद ३ विशाल ४ दीर्घ ५ लघु ६ अतिलघू म्हणजे रामायण महाभारतसारखे महाकाव्य , ज्ञानेश्वरीसारखे बृहदकाव्य , ना धो महानोरांच्या अजिंठा सारखे खंडकाव्य हे विशालकाव्य , पु शि रेगे ह्यांच्या शहनाज सारखे दीर्घकाव्य , ५ शेरांची कुठलीही गझल हे लघुकाव्य . हायकू , चारोळीसारखे अतिलघुकाव्य माझा दशानन हा गझलप्रकार विशाल आकार आहे डेकॅथलॉन मध्ये माझी एक शम्भर वा त्याहून अधिक शेरांची एक गझल आहे तर गझलेत विशालगझल हा आकार शक्य आहे तीस  ते पन्नास शेरांची गझल ही दीर्घ गझल म्ह