Posts

Showing posts from March, 2016
मेल्यानंतर फेसबुक  - श्रीधर तिळवे नाईक  मेल्यानंतर माझं फेसबुक अकौंट  उरेल तेव्हा  रोज पोस्ट टाकून त्याला जिवंत ठेव  मी सुमारे पांच हजार कविता लिहिलेत  रोज एक कविता टाक  आणि बारा वर्षांनी पुन्हा  रिपीट करत जाशील  तेव्हा  कोणालाही ती जुनी कविता आहे हे ओळखता येणार नाही  कारण बारा वर्षांनी कवींची एक नवी जनरेशन उदयाला आलेली असेल  चौथ्या नवतेवर माझी चार हजार क्वोटेशनस निघतील  जी तुला दहा वर्षे पुरतील  आणि दहा वर्षांनी पुन्हा पहिले रिपीट करत जाशील तेव्हा  कोणालाही ते ओळखता येणार नाही  कारण दहा वर्षांनी समीक्षकांची  एक नवी पिढी उदयाला आलेली असेल  कविता आणि समीक्षा पुरत नसेल तर  मी '' अ डॉ  हॉ का बा ना सु ना '' '' धर्म '' '' अर्थ '' ''मोक्ष '' '' ची '' अश्या महाकृतींची वीस हजार पाने मागे सोडली आहेत  आणि दिवसाला पाच पाने टाकलीस तरी  चार  हजार दिवस पुरतील  आणि चार हजार दिवसांनी  पुन्हा पांच पाने रिपीट करत जाशील  तर  कोणालाही ते कळणार नाही  कारण चार हजार दिवसां