Posts

Showing posts from 2022
 चौथी नवता चौथीच का श्रीधर तिळवे नाईक  मराठीत पहिली दुसरी तिसरी चौथी अशा तऱ्हेची इतिहास मांडणी करण्याची परंपराच नाही साहजिकच पहिली नवता दुसरी नवता असं म्हंटल कि लोक दचकतात पाश्चात्य देशात मात्र १९६० नन्तर अशी मांडणी कॉमन होत गेली विशेषतः अल्विन टॉफ्लरच्या थर्ड वेव नंतर अशी मांडणी लोकप्रिय झाली आपल्याकडे द भि कुलकर्णी ह्यांनी पहिली परंपरा दुसरी परंपरा अशी मांडणी केली व ह्या नावाचे ग्रन्थही लिहिले विशेषण वापरण्याऐवजी संख्यात्मक मांडणी का केली गेली ह्याचे कारण एकाच काळात एकच मांडणी निर्माण होण्याचा काळ ओसरला होता मी अगदी सुरवातीला जालता हा शब्द वापरायचो पण तो डोक्यावरून जायला लागल्यावर परिचित काही शोधायला हवे म्हणून मी द भि कुलकर्णी ह्यांचा वारसा पुढे न्हेत १९९२ च्या नव्यांच्या अक्षर चळवळीत (संपादक अरुण म्हात्रे ) प्रथम चौथी परंपरा हा शब्द वापरला होता पण परंपरा हा शब्द कोणीच द भि च्या अर्थाने घेत नाही म्हंटल्यावर नवता हा शब्द वापरायला सुरवात केली त्याआधी विशेषण वापरतांना चौथी हा शब्द वापरला कारण करंट ट्रेंड तसाच होता उदाहरणार्थ ह्या काळात मानसशास्त्रात वर्तनवादी शाखेत वर्तनवादी थेरपीला पह