Posts

Showing posts from 2015
भारतीय समाजरचना  आणि नेमाडें ह्यांची ''हिंदू'' श्रीधर तिळवे /नाईक           १)   भारतीय समाजव्यवस्था   भारतीय समाज व्यवस्था ही एक गुंतागुंतीची समाजव्यवस्था असून भारतात तिला पाहताना   १वर्णाधिष्ठित   २जात अधिष्ठित   ३वर्गाधिष्ठित   अश्या    तीन दृष्टीकोनातून पाहिले जाते . माझ्या मते हे सर्व दृष्टीकोन उथळ असून भारतीय समाजव्यवस्था समजायला त्यांचा काहीही उपयोग होत नाही वैदिक निगम आणि युरोपिअन ह्यांनी प्रचलित केलेले हे मॉडेल आता फेकून देण्याची वेळ झाली आहे . मी माझ्या भारत भ्रमणातून मला सापडलेल्या मॉडेलची मांडणी इथे करत आहे .                  २)   भारतीय दशसमुदायी समाजरचना   माझ्या मते भारतीय समाजव्यवस्था ही दहा समुदायांच्या बृहत जालांनी विणलेले महाजाल असून   ते सातत्याने विकास पावत अपडेट होत असते . त्याच्या अपडेट होण्याची गती मंद असल्याने ते वरकरणी स्थिर वाटत असते पण लॉंग टर्म मध्ये ते इवोल्व झालेलं दिसते .  त्यामुळेच भारतीय समाजरचना ही एक गुंतागुंतीची समाजरचना भासते  आणि गेली दोन दशके ती विच