Posts

Showing posts from October, 2020
    मी सातपाटील कुलवृत्तांत का वाचत नाही श्रीधर तिळवे नाईक   हा प्रश्न प्रथम मला माझा परममित्र किशोर कदम ह्याने विचारला होता ह्या प्रश्नाचे उत्तर कधीतरी मी देणार म्हणून थांबलो होतो आता ते देतो   १ पहिले कारण आजारपणांमुळे मला वाचन पूर्वीसारखे करता येत नाही त्यामुळे जुने लेखक समकालीन लेखक   आणि नवे लेखक अशी मी विभागणी करून नव्या लेखकांना प्रिफरन्स द्यायचा असं धोरण निश्चित केलं आहे प्रणवची   मेट्रोमॉल वाचणे हे मला सातपाटील वाचण्यापेक्षा   अधिक आवश्यक वाटते   २ दुसरे कारण वैयक्तिक आहे प्रत्यय आणि व्यत्यय ह्या पुस्तकात रंगनाथ पठारे ह्यांनी टीकाहरण संदर्भात जे निखालस चुकीचे लिहिले आहे त्यामुळे यदाकदाचित वाचन केले आणि काही लिहिले तर त्याचे रिसेप्शन पठारेंच्याकडून प्रॉपर तरीक्याने होईल ह्याची खात्री मला वाटत नाही अभिधानानंतरशी निगडित तिळवेबद्दल त्यांनी जे लिहिले ते लिहिण्याचा त्यांना नक्कीच अधिकार आहे पण जेव्हा दोन व्यक्तींच्यातला वाद असतो तोही वैयक्तिक   तेव्हा द
 लुईझि ग्लुक : प्लॉटची प्रोसेस बदलणारी कविता श्रीधर तिळवे नाईक  लुईझि ग्लुकला २०२० चे साहित्याचे  नोबेल पारितोषिक मिळाल्याने ती आता प्रकाशित आली असली तरी स्त्रीवादी कविता वाचणाऱ्या लोकांना ती फार पूर्वीपासून परिचित आहे भारतात कम्युनिस्टांच्या प्रभावामुळे जे काही गैरसमज पसरलेत त्यातील एक म्हणजे अमेरिकेत सांस्कृतिक पातळीवर अभिजात असं काहीही घडत नाही प्रत्यक्षात ज्याला आज आपण पोस्टमॉडर्न कला म्हणतो तिच्या संदर्भातील सर्व पायोनियर कलात्मक व सांस्कृतिक घडामोडी अमेरिकेत घडल्या आहेत फ्रांस इंग्लडने अत्यंत जाणीवपूर्वक अमेरिकन लोकांचे योगदान नाकारायचा प्रयत्न केला पण तो फसला आहे त्यामुळेच एका अमेरिकन कवयित्रीला मिळालेल्या ह्या पारितोषिकाने काहींच्या डाव्या भुवयीने आश्चर्य व्यक्त केलं असलं तरी जगभर ह्याचे स्वागतच होईल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही   १९४३ साली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ग्लुकचा जन्म  झाला फर्स्टबॉर्न , अव्हेरनॉ , व्हिलेज लाईफ , हे तिचे गाजलेले संग्रह द वाइल्ड ईरीसला पुलित्झर मिळाले आणि ती प्रकाशात आली सुरवातीला उत्तम गीतांसाठी ती गाजली पण हळूहळू तिच्या आत्मचरित्रात्मक कवितांनी अ
 २८ सप ३ ऑक्टो १२ +२ -१४ २१ ते २६ सप्टें  १२ १४ ते १९ स  १२ ७ ते ११ सप्टें १४ +१ =१५ १ ते ५ सप्टेंबर १० -१० मुंबई विद्यापीठातील ६३ व्याख्यानांचा ज्ञानगोंधळ घालून संपला गेली पाच वर्षे मी हा गोंधळ घालतो आणि बुद्धिमान विध्यार्थ्यांच्यामुळे मजा येते दरवर्षी कुणी ना कुणी अपडेट असणारे विद्यार्थी निघतात  रॉजर बेकन , फ्रान्सिस बेकन , किर्केगार्द , फ्रेडरिक निट्झशे , सिग्मंड फ्रॉइड ,देकार्त , नेमाडे , रुसो , व्हॉल्टेअर , मार्टिन ल्युथर , सार्त्र , काम्यू , ऍडम स्मिथ , विजय तेंडुलकर , मोहन राकेश , गिरीश कर्नार्ड , महात्मा फुले , बाबासाहेब आंबेडकर , बसवेश्वर ,स्ट्रिंडबर्ग , शेक्सपियर , बेंथॅम , मिल , आर्तो , रेम्बो , बोदलेअर , दाली , व्हॅन गॉख ह्यांची सोबत तात्पुरती सम्पली नवीन पिढी वाचत नाही हा समज पुन्हा एकदा धुळीला मिळाला अनेक आडवेतिडवे प्रश्न आले अगदी आयन रॅन्डवरसुद्धा प्रश्न विचारले गेले नेहमीप्रमाणे गुगल घेऊन बसण्याची अनुमती होती त्यामुळे तपशील चुकले कि तपासले जाऊ लागले कंगना राणावत , नसिरुद्दीन शाह , सत्गुरू जग्गी वासुदेव , रेप केस , सिरीयात मुस्लिम ,ह्यांच्यावर वाद झाले हे सर्व रेकॉर्डेड