Posts

Showing posts from May, 2020
देशीवादाचा इंग्लंडमधील मूळपुरुष श्रीधर तिळवे नाईक  मर्ढेकर आणि अभिरुची नियतकालिकाने आणलेल्या आणि सत्यकथेने विस्तार केलेल्या  मार्गी आधुनिकतेला पूर्ण छेद देणारी देशी आधुनिकता साठोत्तरी पिढीने आणली ह्यातील काहीजण पक्के देशीवादी म्हणवून घेत होते जसे कि नेमाडे चंद्रकांत पाटील अशोक वाजपेयी रंगनाथ पाठारे राजन गवस तर काहीजण मार्गी आणि देशी ह्यांचा समतोल साधणारे होते जसे कि दिलीप चित्रे आणि अरुण कोल्हटकर ! काहींनी मात्र मार्गी आधुनिकता मिरवणे अधिक पसंत केले जसे विलास सारंग वसंत आबाजी डहाके गुरुनाथ धुरी वैग्रे देशीवादावर पडलेल्या अमेरिकन प्रभावाची चर्चा मी चौथी नवता ह्या पुस्तकात केली आहे आणि त्यात मी सिद्ध केलंय कि नेमाडेंचा देशीवाद हा पूर्ण विदेशी आहे आपल्याकडे पहिला देशीवादी म्हणून महात्मा फुले ह्यांचे नाव घ्यावे लागते दुर्देवाने त्यांनी त्याची मांडणी देशीवाद म्हणून न करता आर्य आणि अनार्य ह्या संघर्षांसन्दर्भात केली आणि खंडोबा आदी देशी शैव दैवतांचा प्रचार केला ही मांडणी ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात पुढे गोते खात राहिली आणि देशीवादाची मांडणी मग आर्य संस्कृतीने बळकावली आणि नेमाडे ह्या आर्य
मतांच्या कॅटेगरीत न बसणारे मतकरी श्रीधर तिळवे नाईक रत्नाकर मतकरी गेले मराठी समीक्षेला सर्वाधिक गोंधळात टाकणारा आणि दिलीप चित्रेंच्याप्रमाणे अष्टपैलू असणारा साठोत्तरी पिढीतील दुसरा अष्टपैलू गेला जो साठोत्तरी असूनही देशीवादी न्हवता आणि तरीही ज्याने देशी नाटकेही लिहिली मतकरींचा पिंड कलावादी आणि स्वतःला जे योग्य वाटते ते करणाऱ्या लेखकाचा होता साहजिकच झेंडे हातात घेतलेल्या युगात त्यांची कदर जितकी व्हायला हवी तितकी झाली नाही त्यातच गूढकथा लिहिणे म्हणजे लोकप्रिय कथाकार बनणे असा गैरसमज असणाऱ्या मराठी समीक्षेचा गोंधळ त्यांनी त्यात सातत्याने काम करून वाढवला अंधश्रद्धा निर्मूलन समिती जोरावर येत असतांना अंधश्रद्धांच्या आधारे उभा असणारा फॉर्म त्यांनी उत्कृष्ट हाताळला ज्याला लोकमान्यता मिळाली पण विचारवंतमान्यता मिळाली नाही त्यातच ते ज्या काळात लिहीत होते त्या काळात विजय तेंडुलकर सतीश आळेकर आणि महेश एलकुंचवार असे त्याकाळचे सुनील गावस्कर हे ह्या गुंडाप्पा विश्वनाथला सन्मान देत न्हवते ह्यात आणखी एक गोंधळ होता ते मुंबईकर असूनही त्याच्या नाटकात मुंबईचे जे मॉडर्न चित्रण आवश्यक होते ते आलेच नाही ते कुठे
फ्रान्सिस बेकन आणि कला श्रीधर तिळवे नाईक  प्रबोधनाचा आरंभ बसवेश्वर आणि रॉजर बेकन ह्यांनी केला असला तरी प्रबोधनाचा कणा असणाऱ्या विज्ञानाच्या पद्धतीची सुरवात फ्रान्सिस बेकन ह्यानेच केली ग्रेट इंस्टारेशन द वर्क्स ऑफ फ्रान्सिस बेकन खंड ४ संपादक जेम्स स्पिडिंग लॉंगमन लंडन १८६० पान क्रमांक १९ ते ३२ ,३३   मध्ये त्याने म्हंटले होते कि  “For God forbid we should give out a dream of our own imagination for a pattern of the world and must keep “the eye steadily fixed upon the facts of nature in order to grasp the image of things “simply as they are.” वस्तू जशा आहेत तशा पाहणे हे त्याने विज्ञानाचे मुख्य तत्व मानले स्वतःशिवाय जग जसे आहे तसे पाहणे विज्ञानात आवश्यक आहे असे त्याला वाटे आपल्याकडे हेच नेमाडेंनी वास्तववादाची व्याख्या करतांना मांडले स्वतःशिवाय अस्तित्वात असलेले जग ही वास्तवाची व्याख्या बेकनपासून सुरु होते प्रयोग बेकन आवश्यक मानतो त्यातूनच पुढे रंगमंचावरही प्रयोग होऊ लागले आणि कवितेतही ! प्रायोगिक कविता प्रायोगिक नाटक ही प्रबोधनाची देणगी  तत्वज्ञानात एक्सपिरिमेंटल डिस्कोर्सेस म्हणतात त्
मार्क्सवादी कवी आणि प्रकाशनशीलता श्रीधर तिळवे नाईक IGNATIUS DIAS ह्यांच्या वॉलवर प्रकाश जाधव ह्यांच्या संदर्भात एक पोस्ट पाहिली त्यात लिहलंय 'दस्तखत' हा संग्रह 1977 साली प्रकाशीत झाला होता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी 'खेळ' मध्ये प्रकाश जाधव यांच्या काही कविता एकत्रीत प्रकाशीत करण्यात आल्या होत्या. खेळमूळे मला आणि माझ्या समवयीन कवीमित्रांना प्रकाश जाधव ह्यांच्या कवितेची ओळख झाली. 2010 की 11 मध्ये एक स्मरणपूस्तिका काढण्यात आली होती त्या पुस्तिकेत त्यांच्या काही निवडक कविता छापण्यात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांचं दुसरं पुस्तक 'दस्तखतनंतरच्या कविता' या नावाने प्रकाशीत करणार असं कॉ. सुबोध मोरे यांनी जाहीर केलं होतं. तो दुसरा संग्रह आजतागायत आलेला नाहीये. कारण काय हे फक्त कॉम्रेड स्वत:च सांगू शकतील. दस्तखत प्रकाशीत होऊन 40 वर्षे होऊन गेलीयेत. त्यानंतरच्या त्यांच्या मराठी आणि हिंदी दोन्ही मिळून दीड-दोनशे कविता अप्रकाशीत आहेत. असं असूनही या कविता संग्रहरूपात येऊ नयेत ही बाब अत्यंंत दुर्दैवी आणि पिडादायक आहे. हे लिहीण्याचं कारण विनायक येवले याच्या वॉ
ऋषी आणि इरफान एक कमर्शियल एक प्रोफेशनल श्रीधर तिळवे नाईक  इरफान खान गेला आणि त्यातून बाहेर पडतो न पडतो तोच ऋषी कपूर ! आमच्या थिएटर अकादमीत ज्या काही मोजक्या अभिनेत्यांची चर्चा करण्याची माझ्याकडे मागणी झाली होती त्यातील एक इरफान ! ऋषी कपूर त्यामानाने अभिनेता म्हणून दुर्लक्षित  ! नवीन पिढीच्या मते ऋषी कपूरची रौफलाला ही अग्निपथमधली भूमिका हीच सर्वश्रेष्ठ !  सुदैवाने दोघांच्याकडे जे बेस्ट होते ते त्यांनी दृश्यकलांना दिले होते दोघेही अभिनेते होते त्यामुळे त्यांचा विचार अभिनयाच्या दृष्टीने करणे योग्य होय शंकर स्वतः नटराज असल्याने शैवाचार्यांना अनेक गोष्टी याव्या लागतात त्यातील एक अभिनय ! अभिनयाचे १ बाह्यकारणात्मक अभिनय २ अंतःकरणात्मक अभिनय ३ आहार्यकरणात्मक अभिनय असे तीन मुख्य प्रकार होतात ह्यातील बाह्यकरणात्मक अभिनयाचे दोन उपप्रकार होतात १ देहमौद्रीक  अभिनय २ ध्वनिमौद्रीक  अभिनय अंतःकरणात्मक अभिनयाचे १ मानसिक अभिनय २ बौद्धिक विचारात्मक अभिनय आणि ३ अहंकारात्मक अभिनय असे तीन उपप्रकार होतात आहार्य अभिनयाचे १ रंगभूषात्मक २ वेषभुषात्मक ३ अलंकारात्मक ४ शस्त्रात्मक ५ अ