Posts

Showing posts from November, 2020
 अलीकडच्या काळात कलावंताने काय करायचे ह्याबाबत एक गोंधळ उडालाय कि काय अशी शंका येते आहे कलावंताने सत्याच्या बाजूने उभे राहणे आवश्यक असते राजकीय बाजूंच्या बाजूने न्हवे जे पोलिटिकल पार्टीत आहेत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका हीच आपली भूमिका म्हंटली तर ते नैसर्गिक आहे पण जे राजकीय पक्षात नाही त्यांनी पक्षीय हितसंबंधात न अडकता सत्य काय आहे ते तपासायला नको का ?  सध्या जणू काय मोदी आणि मोदीविरोधी अशा दोनच बाजू समाजाला आहेत अशा थाटात काही लोक वैचारिक पैलवानकी करतायत मोदीवादी लोकांचे एका अर्थाने हे यशच म्हंटले पाहिजे मोदींनी  काहीही केलं तरी ही मंडळी त्याला हे लोक चांगलंच म्हणतात त्याउलट मोदीविरोधी लोक मोदींनी  काहीही केलं तरी ते चूक असं ठरवतात जणू काय विरोधी पक्षात बसले आहेत समाजवादी , साम्यवादी , आंबेडकरवादी आणि मुस्लिमवादी असे सगळे एकत्र आले आहेत धर्मवादी राजवटीला विरोध हा ह्या लोकांचा अजेंडा आहे  ह्याउलट ब्राम्हणांची झुंडशाही ही गायब झालेली मध्ययुगीन व पेशवेकालीन गोष्ट पुन्हा जिवंत झाली आहे काहींना तर मनुस्मृतीप्रधान राज्य परत आणण्याचे स्वप्न पडायला लागले आहे मंदिरे खुली करण्याचे आंदोलन हे
 बरेच झाले छापील दिवाळी अंक मेले श्रीधर तिळवे नाईक  हल्ली छापील दिवाळी अंकांच्या नावाने गळा काढणारे वाढतायत म्हणून हे लिहितोय एकतर मुळात छापीलतेची गरज संपलेली आहे आपण सर्व जितक्या लवकर डिजिटल होऊ तितके बरे त्यामुळे डिजिटल नियतकालिकांची व अनियतकालिकांची व दिवाळी अंकांची सध्या गरज आहे अनेकांना छापील म्हणजे परमानंद वाटणे साहजिक आहे पण जेव्हा छापील तंत्रज्ञान आले तेव्हा अनेकांना हस्तलिखितात परमानंद मिळत होताच जुन्या गोष्टींचा कुरवाळआनंद सर्वकाळात असतो पण त्याने काळ थोडाच थांबतो ? दिवाळी अंक जेवढ्या लवकर डिजिटल होतील तेव्हढ बरं ! ह्याबाबत मी ऐसी अक्षरे चा आवर्जून उल्लेख करेन (ते मला शत्रू मानत असूनही ) ते सातत्याने डिजिटल अंक देतायत त्यांची ब्राम्हणकेन्द्रियता ही शंकास्पद करते हे खरं पण त्यातले अनेक लेख लक्षणीय असतात दुसरे उदाहरण अक्षरनामाचे हेही  उल्लेखनीय ! मला वाटतं अशा उपक्रमांची मांदियाळी वाढणे आवश्यक आहे  आजच्या काळात ट्विटर , फेसबुक पोस्ट , ब्लॉगर ह्या फक्त वेगवेगळ्या साईट्स राहिलेल्या नाहीत तर त्या नव्या जानर बनलेल्या दिसतायत  ट्विटर साधारण पोस्टकार्डाची चारोळीटाइप कवितेची अल्पवाक्य
 मी अर्णब गोस्वामीबद्दल लिहीत नाही कारण मी रिपब्लिक टीव्ही पहात नाही अर्णब गोस्वामी अँकर म्हणून समोरच्या माणसाला त्याची बाजू मांडायची संधीच देत नाही आणि समोरच्याला बोलायला संधी न देणारा अँकर माझ्या तत्वात बसत नाही निखिल वागळेंनीं नंतरच्या काळात हाच उद्योग करायचे त्यामुळे मी त्यांनाही पाहणे सोडून दिले होते पत्रकाराचे काम सत्य शोधणे आणि मांडणे हे आहे स्वतःची आयडियालॉजी मांडणे नाही असं माझं मत आहे सध्याच्या प्रोपोगंडिस्ट पत्रकारितेत ते आऊटडेटेड आहे असो  मात्र फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याने अर्णब ह्यांनी  घेतलेली कंगना राणावतची मुलाखत मात्र मी पाहिली होती माझे विद्यार्थी व टीममेट मात्र त्यांना आवर्जून पहात असतात  श्रीधर तिळवे नाईक  व्यवहारी आहात ह्याचा अर्थ शहाणे आहात असा होत नाही  श्रीधर तिळवे नाईक