Posts

Showing posts from November, 2019
आपण स्तुतीने भुलून वा हुरळून का जातो किंवा निंदेने व्यथित का होतो ? वास्तविक भाषा म्हणजे काही आईस्क्रीम न्हवे कि शस्त्र न्हवे पण तरीही आपण भाषेने मधाळतो वा जखमी होतो आपण भाषेला फक्त भाषा म्हणून पाहिले तर भाषा फक्त भाषाच राहते पण आपण तसे पाहत नाही मग भाषा शस्त्र बनते आईस्क्रीम बनते भाषेला ताकद आपण देतो एरव्ही भाषा फक्त भाषांग असते 
काही  टिपणे श्रीधर तिळवे बहुयथातथ्यवाद  आणि एकजालवाद सत्य हे शब्दाबाहेर असते चिन्हाबाहेर असते त्यामुळे ते चिन्हांना प्राप्त होण्याची शक्यता नाही पण वास्तव मात्र चिन्हात आणता येते पण वास्तव आपणास संपूर्ण दिसत नाही त्यामुळे जे वास्तव दिसते ते तथ्य असते आणि आपण सर्व आपल्या आपल्या तथ्यांच्या आधारे बोलत असतो . मात्र ही सर्व तथ्ये एका वास्तवासंदर्भात आहेत ह्याची आपणाला कल्पना असते हे जे दिसणारे तथ्य असते तेही संपूर्णपणे चिन्हात व्यक्त होत नाही किंवा करता येत नाहीत त्यामुळे आपण सर्व आंशिक तथ्यांच्या आधारे एकमेकांशी बोलायला लागतो ह्यांना आपण यथातथ्ये म्हणतो फेसबुक हे यथातथ्यांचे भांडार म्हणून आपल्यापुढे सादर होत असते आणि ह्या यथातथ्यांच्या वरून आपण हमरीतुमरीवर येऊन भांडत असतो जे अनेकदा विनोदी वाटायला लागते . डिजिटल युगांचा इतिहास हा यथातथ्यांचा इतिहास असतो आणि तो अनेक आवाजात बोलत असतो आंबेडकरवादी आवाज हिंदुत्ववादी आवाज शैव आवाज आगमवादी आवाज असे अनेक आवाज सतत निनादत असतात आणि त्यातून प्रचंड मोठा कोलाहल निर्माण होत असतो हा कोलाहल अनेकदा कर्कश म्हणावा इतका वाढत जातो आणि कानात तेलासारखा खरखर