Posts

Showing posts from October, 2019
साहित्यिक टिपण्या नितीन चांदोरकर ह्यांस शुभेच्छा आहेतच  भविष्य डिजिटलला आहे छापीलला नाही तेव्हा तुम्ही इ अंक काढताय त्याला माझा फुल्ल सपोर्ट ! नव्वदोत्तर पिढीने एकदा आमच्यासाठी मार्गदर्शनपर लिही म्हणून लेख मागितला होता त्यावेळी मी तसा लेख लिहिला होता आता पुन्हा तेच कसं लिहिणार मला रिपीट करायला आवडत नाही मी दिवाळी अंकात लिहीत नाही अनेक धुरंधरांना नकार देऊन मी नकार दिलाय अपवाद फक्त चळवळीचे अंक तरीही काही नवीन सुचले तर नक्की देईन आम्ही महापंच चालू केलंय त्याला आठवड्याला किमान एक लेख देणे आवश्यक आहे त्यालाही विषय सद्या सापडलेला नाही नाराज नको होऊस तुझ्या अंकाला मनापासून शुभेच्छा ! मला नेहमीच तरुण पिढीचं अप्रूप असतं कारण ती बदलाची वाहक असते तुमचा अंक हा नवीन बदलांना आविष्कृत करेल अशी आशा वाटते . धन्यवाद ! तू मी विश्रामच्या लेखकाची गोष्ट ह्या कादंबरीवर दिलेले व्याख्यान शब्दांकन करून तेच का छापत नाहीस सुरवात तू केलीच आहेस ते पूर्ण कर -------------------------------------------------------------------------------------------------------------------- जातीपाती सोडतील पण धर्म सोडणार
भारतात क्लास फक्त श्रीमंत व गर्भश्रीमंतांना असतो बाकींच्यांसाठी फक्त जात असते श्रीधर तिळवे नाईक 
इस्थेर डिफ्लॉ व अभिजित बॅनर्जींचं नोबल श्रीधर तिळवे नाईक अमर्त्य सेन ह्यांना नोबल मिळालं तेव्हा मी त्यांचं दिलखुलास अभिनंदन केलं होत पण अभिजित बॅनर्जी व इस्थर डिफ्लो (मायकेल क्रॅमर सह )ह्यांना मिळालेल्या नोबलबाबत मात्र सावध राहूनच अभिनंदन करावं असा माझा फील आहे अर्थशास्त्रातील काहीही न कळणारा पंतप्रधान व अर्थशास्त्रात जेमतेम गती असणारी अर्थमंत्रीण ह्या अजिबोगरीब पार्श्वभूमीवर थोडी अर्थतज्ज्ञांची मदत घ्या असा सल्ला देण्याचा हेतू ह्या नोबलमागे असू शकतो आंतरराष्ट्रीय आर्थिक समुदाय हा आपले अर्थकारण रेटण्यात फार वाकबगार असतो त्यामुळे भारतात भाजपमध्ये राज्यकारभार चालवायला योग्य असणारे प्रमोद महाजन , अटलबिहारी वाजपेयी , सुश्मिता स्वराज्य , अरुण जेटली असे चारही नेते निघून गेलेत आणि आता ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण कळत नाही अशा नेत्यांचा सुळसुळाट झालाय असं जर ह्या समुदायाला वाटत असेल तर त्याने खेळलेली ही खेळी असू शकते अभिजित बॅनर्जींनी काही महिन्यापूर्वी (१८ जान २०१६ ला)  भारतातील श्रीमंतावरील कर वाढवा अशी सूचना केली होती विशेषतः सुपर श्रीमंतावरील  त्या पार्श्वभ
जोकर :क्रेझी केऑस आणि सायकेऑस श्रीधर तिळवे नाईक  जॅक निकोलसन हा सेल्फस्टायिल्ड  अभिनयाचा बादशहा (आपल्याकडे असा राजेश खन्ना होता  ज्याचा नीट वापरच केला गेला नाही अभिनेता उत्तम असणे पुरत नाही त्याच्या देहबोलीचा नीट वापर करणारे प्रतिभावंत दिग्दर्शकही असावे लागतात उदाहरणार्थ ह्याबाबत देव आनंद नशीबवान ठरला त्याच्या  मर्यादित कुवतीचा असाधारण वापर विजय आनंद वैग्रे प्रभुतींनी केला   ) त्यामुळेच जेव्हा तो बॅटमॅन मध्ये खलनायक करतोय हे कळले तेव्हा बॅटमॅन बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली बॅटमॅन हा माझा आवडता सुपरहिरो आहे कारण तो मानवी आहे आईवडिलांच्या डोळ्यादेखत झालेल्या खुनाने भांबावून गेलेला आणि घाबरून गेलेला , शहराच्या भंपकपणाची पूर्ण खात्री पटूनही शहराच्या भल्याचा विचार करणारा , स्वतःच्या आतील भयाला नीट पाहणारा आणि मुख्य म्हणजे प्रसिद्धी फाट्यावर मारणारा असा हा सुपरहिरो आहे मला प्रसिद्धी फाट्यावर मारणारे लोक आवडतात कारण आजच्या युगाचे खरे हिरो तेच आहेत त्यामुळे बॅटमॅनचा माझ्या मेंदूतील प्रवेश हा नैसर्गिक आहे  पण जोकरने माझ्या आत केलेला प्रवेश हा मात्र अनपेक्षित होता त्याने हा प्रवे
छापीलतेला माझा फारसा सपोर्ट नसला तरी ही छापीलता सजग असेल तर मला आवडते त्यामुळे सजगला त्याने अधिकाधिक समकालीन जाणिवेची समीक्षा छापावी अशी सजग शुभेच्छा कीर्तिकुमार शिंदे हा माझ्या परममित्रांपैकी एक आहे त्यामुळे त्याच्या पाठीशी असणे मी मित्रकर्तव्य समजतो आशा बाळगतो कि हा महापंच योग्य जागी योग्य कारणांसाठी असेल महापंचलाही माझ्या हार्दिक शुभेच्छा काळ असा आला आहे कि दृश्यांच्या साहाय्याने तुम्हाला आंधळे केले जाते अशावेळी प्रथम सजग असणे गरजेचे अन्यथा पंच हवेला आणि ज्याला सुधारायचे तो हवेत गायब असे होऊ शकते श्रीधर तिळवे नाईक 
फादर दिब्रिटो , ख्रिश्चनिटी व साहित्य श्रीधर तिळवे नाईक मी झोपी गेलोय माझी आई प्रेग्नन्ट आहे नववा महिना भरला आहे आता ती कधीही बाळंत होऊ शकते आम्ही माळी गल्लीत राहतोय पवारांच्या घरी पवारांची रविवार पेठेत फेमस असलेली गिरण रात्र झाल्याने बंद आहे रात्रीचे बारा वाजलेत आईचा व्हीव्हळण्याचा आवाज ऐकून भाऊ म्हणजे माझे वडील जागे झालेत आई आत्ता बाळन्त होणार आहे काय हा  प्रश्न त्यांना सतावतोय मागचे बाळंतपण त्रासाचे न्हवते पण ह्या बाळन्तपणात डॉक्टर जोशींनी जी खात्री दिली होती तशी खात्री त्या आत्ताच्या केसमध्ये देत नाहीयेत त्यामुळे एक अस्वस्थता आहे आणि अचानक घराचा दरवाजा प्रकाशाने उघडला जातोय चप्पला उतरल्या जातायत  प्रकाशात माझा पूर्वज रामपुरुष उभा आहे सखाराम तिळवे तो आत येतो तो आईला म्हणतोय ," घाबरू नकोस सगळं काही सुरळीत होईल पोटात जुळी आहेत म्हणून त्रास होतोय " पुन्हा चपला घातल्या जातायत दरवाजा बंद होतोय माझा बाप चकित तर आई निवांत होतिये दुसऱ्या दिवशी ती बाळंत होतीये तिला जुळी झालेत मी आईकडून हा किस्सा लहानपणापासून ऐकतोय एरव्ही नास्तिक असणारे माझे वडील हा किस्सा आला कि गप्प व्ह
पृथ्वीला माता समजणाऱ्या माणसाचा मृत्यू झाला असून पृथ्वीला पत्नी समजणाऱ्या माणसाचा उदय झाला आहे नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार पृथ्वीला वेश्या समजणाऱ्या माणसानेही आता आपले स्थान निश्चित केले आहे पृथ्वी ह्या संदर्भात काहीच कृती करणार नाही अशी ह्या नव्या माणसाची खात्री आहे खांडव वन जाळणाऱ्या महान वैष्णव परंपरेचा ह्यामुळे विजय झाला असून ह्या सोहळ्या प्रित्यर्थ व्याध गीता सांगणाऱ्या श्री व्याध ह्यांना आमंत्रित करण्यात आले आहे पशुपक्ष्यांना अन्नातून बेशुद्ध करून मग अहिंसकपणे त्यांना कापणे हे कसे धर्मसिद्ध आहे हे ते पटवतील झाडांच्याबाबतीत त्यांना बेशुद्ध करण्याचा प्रश्नच येत नसल्याने त्यांच्या संदर्भात हिंसा किंवा अहिंसा ह्यांचा प्रश्नच उद्भवत नसल्याची ते मांडणी करतील वाढ पशु पक्ष्यांची होते तर विकास हा फक्त मानवी समाजाचा होतो माणसांच्या वाढत्या संख्येला सुविधा पुरवायच्या कि झाडांची संख्या शाबूत ठेवण्यासाठी माणसाला असुविधेत ढकलायचे ह्याचा विचार शेवटी शासनाला करावा लागतो झाडे मतदार नसल्याने निवडून येणाऱ्यांनी त्यांचा विचार का करावा ? श्रीधर तिळवे नाईक