Posts

Showing posts from February, 2018
कलेचे सैनिकीकरण  वैगरे श्रीधर तिळवे नाईक च प्र  देशपांडे ह्यांनी आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये कलेचे  सैनिकीकरण ह्या नावाने लेख लिहून  कलावादी भूमिका पुन्हा एकदा पुढे आणली  आहे ह्या लेखात त्यांनी एकूणच सर्व भूमिका घेणाऱ्या लोकांच्याविरुद्ध सणसणीत तोफ डागलीये . आमच्या थिएटर अकॅडमी ऑफ मुंबई  युनिव्हर्सिटी ने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल २२ -२३ सप्टेंबर २०१६ मध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ थिएटर पर्सन ह्या चर्चासत्रात भूमिकांची सविस्तर आणि सांगोपांग चर्चा झाली होती आणि त्या सर्व भाषणांचा समारोप मंगेश बनसोडने भूमिका आवश्यक आहे म्हणूनच केला होता ज्याची अधिक तपशीलवार मांडणी लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी केली . त्यावेळच्या माझ्या भाषणात(ते मी फेसबुकवर दिले आहे ) अश्या प्रकारची तोफ डागणारा आणि कलावादी भूमिका मांडणारा च प्र सारखा कुणीतरी हवा होता असे मी म्हंटले होते ह्या शिळ्या आणि मागासलेल्या कढीला पुन्हा एकदा ऊत आलेला आहे जीवनासाठी कला कि कलेसाठी कला हा मराठीतील एक फार प्राचीन  वाद आहे आणि त्याचे मूळ बुद्धिप्रामाण्यवाद निसर्गवाद विरुद्ध स्वछंदवाद ह्यांच्यात झालेल्या वादात आहे . आ
महाकाव्य कालबाह्य झाले आहे का आणि असल्यास कवींना महाकाव्य का लिहावेसे वाटते ? श्रीधर तिळवे नाईक एक कवी म्हणून मला कायमच महाकाव्याचे आकर्षण वाटत राहिले आहे हा देशच मुळात रामायण महाभारत ह्या महाकाव्यातल्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या आधारे घडलेला आहे किंबहुना भारताची वाट लावण्यात ह्या दोन महाकाव्यांचा किंबहुना महाकाव्याचा प्रचंड वाटा आहे हा वाटा इतका प्रचंड आहे कि ह्या देशाचा इतिहास महाकाव्यपुर्व भारत आणि महाकाव्योत्तर भारत अशी विभागणी करून लिहिता येतो हा देशच असा आहे कि इथे वास्तवापेक्षा फिक्शन अधिक टिकते आणि त्याला जबाबदार पुराणे रामायण आणि महाभारत आहेत त्यामुळे साहजिकच इतिहासाचे रूपांतरही इथे फिक्शनमध्ये होते . लोक फिक्शनसाठी आणि मिथसाठी मरायला तयार होतात पडद्यावरचे हिरो जनतेसाठी काहीच न करता निवडणूक जिंकतात अश्या पार्श्वभूमीवर एखाद्या कवीने महाकाव्य लिहावे कि नाही आणि लिहायचे असल्यास त्याचे स्वरूप काय असावे ? माझ्या आयुष्यात १९८३ ते २००७ ह्या दरम्यान मी आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण आणि श्रीवाहिनी अशी दोन महाकाव्ये लिहिली पहिले आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण हे कोल्हापूरशी निगड
कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता   ( SOCIAL RESPONSIBILITY OF THEATRE PERSON )२२ ते २३ सप्टेंबर २०१६ INTERNATIONAL THEATRE  फेस्टिवल ) श्रीधर तिळवे नाईक प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो , कलावंताच्या उत्तरदायित्वावर हे चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मंगेश बनसोड ह्याचे प्रथम आभार तुम्ही गेले काही तास ह्या विषयावर अनेकांचे मौलिक विचार ऐकत आहातच आणि आता  आम्ही फॅकल्टीचे लोक समारोपाचे सेशन  सादर करतो आहोत मी नेहमीच एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो आहे ती म्हणजे प्रश्न विचारा कोणी कितीही मोठा माणूस असो श्रद्धा ठेऊ नका  प्रश्न विचारा प्रश्नक व्हा त्यामुळे पहिला प्रश्न हे चर्चासत्र  कशासाठी ?तुम्ही आता सर्वच अभ्यासक्रमानंतर समाजात उतरणार आहात आणि समाज आणि कला ह्यासंदर्भात तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागणार आहे ही भूमिका घेण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार करणे हा ह्या चर्चासत्राचा उद्देश  आहे. भूमिका कोणतीही असो ती प्रामाणिक असणे हे फार गरजेचे आहे बनावट भूमिका  बनावट कला निर्माण करतात त्यामुळे बनावट भूमिका घेऊ नका अस्तित्ववाद शिकवताना मी तुम्हाला ऑथेन्टिसिटी विषयी प्रदीर
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग १ श्रीधर तिळवे नाईक  इंडियात चार भारत आहेत ही चौथ्या नवतेची सुरवातीपासून भूमिका आहे . हे चार भारत पुढीलप्रमाणे १ मार्गी भारत २ देशी भारत ३ पोटी भारत ४ जमाती भारत मार्गी भारत हा भारत शैव संस्कृतीत आकार घ्यायला लागला आणि नगरे निर्माण व्हायला लागली आणि मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून त्यांचे स्वरूपही स्पष्ट झाले ह्या नगरांची मार्गी संस्कृती नेमकी काय होती हे पुरेसे स्पष्ट झालेले नाही पुढे वैदिकांनी विजय मिळवला खरा पण त्यांच्या नगरांचे खरे स्वरूप काय होते ते आजतागायत कळलेले नाही पुढे आगमवादाने उचल खाल्ली आणि भारतातील पहिले साम्राज्य नंदानी उभे केले ज्याचे रूपांतर चंद्रगुप्त मौर्याने मौर्यसम्राज्यात केले पण चंद्रगुप्त येण्यापूर्वीच पाटलीपुत्र सारखी नगरे तयार झाली होती नंतर वैदिकांनी वैष्णव नावाचा धर्म पुढे करत शैवांना गिळायला केली आणि नंतर शंकराचार्यांना पुढे टाकत बौद्ध आणि जैनांची वाट लावली नेमाडेंनी बौद्ध धम्म हा नागरकेंद्री असल्याने नष्ट झाला असे प्रमेय मांडले ज्याचे निवारण मी केले होते
Image
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने काही टिपणे श्रीधर तिळवे नाईक टिपण १ सौष्ठवच्या पहिल्या अंकाला निघून  पंचवीस वर्षे पूर्ण होतायत . सर्व संबंधितांचे जाहीर आभार . विशेषतः भालचंद्र कुबल , जयराज साळगावकर , आशुतोष आपटे , मंगेश बनसोड , आल्हाद भावसार , राहुल सरवटे , अविनाश धर्माधिकारी , मंदार फणसे , कीर्तिकुमार शिंदे ,सतीश पाध्ये ,  सलील वाघ , मनोज जोशी , अभिजीत देशपांडे , नितीन रिंढे ,निवि कुलकर्णी , सचिन केतकर , ज्ञानदा ,हेमंत दिवटे , मंगेश काळे , भुजंग मेश्राम , संतोष क्षीरसागर , ऋत्विक काळसेकर , महेश म्हात्रे , दिलीप लाठी , शंकर सारडा , केशव मेश्राम  ह्या साऱ्यांच्याशिवाय हे अशक्य होते . ह्या साऱ्यांचे मनापासून आभार !सौष्ठवचे साहित्यात योगदान आहे कि नाही आणि असलेच तर त्याचे स्वरूप काय ह्याची चर्चा मराठी साहित्य करेल न करेल कदाचित सौष्ठव काळाच्या उदरात कसलीही चर्चा न होता नाहीसे होईल पण एक नक्की आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि खिशातले पैसे टाकून अंक काढले गेले . मंगेश बनसोड व राहुल सरवटे ह्यांनी प्रत्येकी एका अंकाचे उत्कृष्ट संपादन केले त्यांचे कधीतरी जाहीर आभार मानायचे