Posts

Showing posts from February, 2021
 अब्सर्ड कविता  प्रबोधनात्मक युगाचा औद्योगिक क्रांतीने अंत करायला सुरवात केली आणि मानवी इतिहासातला आधुनिक टप्पा सुरु झाला ह्या आधुनिकतेचे व्यक्तिगत आविष्कृत रूप म्हणजे अस्तित्ववाद ! अस्तित्ववादाचे सात टप्पे आहेत  १ आदि अस्तित्ववाद हा प्रामुख्याने सोरेन किर्केगार्द व फ्रेडरिक नित्शे ह्यांनी मांडला अस्तित्ववादाच्या सर्व मूळ थीम्स ह्या दोघांनी शोधल्या मराठी साहित्यावर ह्या दोघांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना आधुनिक युगाचे पाच तत्वज्ञ निवडले तर त्यात ह्या दोघांचा समावेश करावाच लागतो इतके ह्या दोघांचे कार्य महत्वाचे आहे ह्यातील किर्केगार्दच्या प्रभावामुळेच इब्सेन इब्सेन बनला  २ मानसघटित अस्तित्ववाद हा एडमंड हुसेर्ल ने मांडला ह्याने हेतुगर्भतेचे इंटेन्शनलिटीचे तत्वज्ञान मांडले प्रत्येक मानवी कृती ही हेतू ठेऊन जन्मते आपले ज्ञानही हेतुग्रस्त असते अशी त्याची मांडणी पुढे अनसर्टन्टीच्या तत्वज्ञानाला जन्म देणारी ठरली हुसेर्लने भूमितीच्या तत्वज्ञानाची जी मांडणी केली तिचा थेट प्रभाव जॅकस देरिदावर आहे  ३ मनोविश्लेषणात्मक अस्तित्ववाद हा जास्पर्स व सिगमंड फ्रॉइड ह्यांनी मांडला  ४ नवअस्तित्ववाद हा प्रथम
 अर्बन लिरिकॅलीटीच्या शोधात  श्रीधर तिळवे नाईक  गीतात्मकता (लिरिकॅलीटी)ही कवितेतली एक अपरिहार्य गोष्ट आहे आणि अक्षरवृत्त आणि मात्रावृत्तात लिहिणाऱ्या लोकांना ती माहित असतेच मात्र प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुमचा एथॉस अरबन असतो सुदैवाने ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुरवातीलाच सापडले -स्वच्छन्द आणि अर्बन स्लॅन्ग ! माझा कवितेचा झटका तेव्हाही एका फ्लो मध्ये वीस पंचवीस कविता लिहणारा होता आणि अर्बन लिरिकॅलीटीबाबत हेच घडले  चालले आहे xx माझे कुमारीशी xx भोग करायला बहरून  तुमची काही नैतिक हरकत बाप म्हणून बाप म्हणून  अशी सुरवात होऊन ही अर्बन लिरिकॅलीटी सुरु झाली आणि  कर डिस्को  हो फियास्को  कुठले न बंधन काचू दे  देह अवघा नाचू दे  अशी रचना करत ती संपली ह्यातील चालले आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार मध्ये आहे तर कर डिस्को डेकॅथलॉन मध्ये ! कोल्हापुरी स्लॅन्गचा वापर अटळ होता तो झाला काही गझलांच्यातही अर्बन लिरिकॅलीटी मेंटेन झाली आता ह्या कवितांच्याकडे बघताना जाणवते कि चालले आहे ही लॉन्ग ओळींची तर कर डिस्को शॉर्ट ओळींची आहे चालले आहे ला माझ्या बापाने केलेल्या मनाईची पार्श्वभूमी आहे तर कर डिस
स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे १ श्रीधर तिळवे नाईक  आपण कशासाठी जगतो का जगतो कुणासाठी जगतो काय जगतो केव्हा जगतो हे प्रश्न कायमच माणसाचा पाठलाग करत असतात त्यातूनच माणसाने स्वतःचे मूल्यमापन स्वतःच्या व्हॅल्यू व स्टॅन्डर्डनं करावं कि इतरांनी दिलेल्या फूटपट्ट्या वापराव्यात ? हे प्रश्न निर्माण होतात व स्वमूल्यमापनाचाही  प्रश्न निर्माण होतो व  माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रश्न बनतो  जगण्याचे चारच प्रकार असतात  मोक्षिक : ह्या प्रकारात तुम्ही फूटपट्ट्या फाट्यावर मारून फूटपट्ट्या नाकारून जगता  आत्मिक : जिथे तुम्ही स्वतःच्या फुटपट्ट्यानी जगता  आर्थिक : जिथे तुम्ही समाजाच्या फुटपट्ट्यानी जगता  कामिक : जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या फुटपट्ट्यांप्रमाणे स्टॅण्डर्डप्रमाणे जगता  फूटपट्ट्या म्हणजे तुमचे फूट कुठे उभे आहेत कुठल्या मूल्यात उभे आहेत त्याची पट्टी म्हणजे इलाका म्हणजे क्षेत्र ! ही पट्टी हे क्षेत्र आपल्या अंतःकरणात तयार होत असते वावरत असते ते स्थावर आणि जंगम असे दोन्ही असते आपण आपला मोबाईल कॅरी करावा तसे हे क्षेत्र ही पट्टी कॅरी करत असतो आपली कुठल्याही विषयाबाबतची पोझिशन त्यामुळे प्रज्वल
रोमँटिसिझमचे वाकपुरुष ते वावदूकपुरुष श्रीधर तिळवे नाईक  सुभाष अवचट , खानोलकर , जी ए , पु ल हे सगळेच मिडलक्लास रोमँटिसिझममध्ये वावरत असतात वा होते भावनाविलास आणि किस्सेगिरी ह्यातुन हिरोगिरी प्रकट करण्याची दांडगी हौस हीही ह्या रोमँटिसिझमची वैशिष्ट्ये ! मेलोड्रामा हा कणा आणि कधीकधी तो क्रिएट करण्याच्या नादात वास्तवाला काल्पनिक डगला चढवणे हेही अटळ ! ह्याहून काही वेगळी अपेक्षा मला तरी न्हवती लेखकाचं प्रत्यक्ष दारिद्र्य आणि त्याच्या लिखाणातील कल्पनाश्रीमंती ह्यांच्यातले ताणेबाणे आपण सादर करतोय अशा कैफात झालेला हा लेख आहे प्रयत्न हिरो बनवायचा होता तो फसला  आणि वाद निर्माण झाला  रोमँटिसिझमने अर्वाचीन फॅमिली केंद्रस्थानी आणून शेक्सपियरच्या राजेशाही फॅमिलीला छेद दिला खरा पण मध्ययुगीन स्वप्नविभोर माहोलमधून त्याची सुटका  झाली नाही इमोशनल लटके आणि झटके ह्यावर तो तगला खरा पण हळूहळू त्यातले नावीन्य संपले मराठीत ही इंतेहा ८० लाच झाली अशावेळी २०२१ साली ही मेन्टॅलिटी सदर म्हणून सादर करायची म्हणजे एकता कपूरला फिलॉसॉफर म्हणून नेमणे आहे असो कुबेरांची कुबेरगिरी ही अशी एटीच्या एटीकेटमध्ये कधीकधी अडकत असते आप