Posts

Showing posts from January, 2017
ओबीसी साहित्याची चळवळ आणि स्त्रीवाद  भारतातील विचारप्रणालीत्व  खालील टप्प्यातून गेलेलं दिसतं १ नवजागरणवाद : ह्याची सुरवात बसवेश्वरापासून झाली . छत्रपती शिवाजी , पहिला बाजीराव पेशवा , गुरु नानक , सम्राट अकबर , दयानंद सरस्वती ह्यांनी हा टप्पा अधिक विकसित केला आणि त्याची धार वाढवली . जागरणवादाला पडलेल्या सामाजिक मर्यादा ह्यांनी ओलांडल्या आणि वर्णजातिव्यवस्थेविरुद्ध एक ठाम भूमिका घेतली प्रस्थापित धर्मांना ठाम नकार दिला . २ सुधारणावाद : ह्याची सुरवात राजाराम मोहन रॉय ह्यांनी केली . न्यायमूर्ती रानडे , लोकहितवादी , बाळशास्त्री जांभेकर ह्यासारख्यांनी त्याचा विस्तार केला  विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार केला आणि समाजात सुधारणा झाली पाहिजे असा आग्रह धरला ३ प्रबोधनवाद : ह्याची सुरवात महात्मा फुले ह्यांनी केली आणि आज ज्याला बहुजनवाद म्हणतात त्याची स्थापनाही महात्मा फुले ह्यांनी केली . ब्राह्मण्याविरुद्ध ठाम बुद्धिवादी भूमिका घेऊन बहुजनांच्या सामाजिक संघटनाची आवश्यकता मांडली ४ दलितवाद : सवर्णवादाने केलेल्या शोषणाला अधोरेखित करून त्याविरुद्ध बंड केले . ह्याची सुरवात आंबेडकरांनी केली दलि
अस्ताचं युग आणि नवनिर्माणाचे प्रयत्न मी नागेशी बांदिवड्याचा आहे किंवा कोल्हापूरचा आहे म्हणजे काय आहे ह्या प्रश्नाने माझा न्यू कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यापासून सतत  पाठलाग केला आहे १९८० ते १९८८ हा माझा कालखंड मोक्ष आणि त्यासाठी स्वतःचे संस्कारण म्हणजे कंडिशनिंग तपासणारा आणि तासणारा कालखंड आहे माझ्या मिलिंद गुर्जर , जयसिंग पाटील , बाळकृष्ण शिर्के , महेश पुसाळकर , विश्वजित जाधव , अजय कोंडेकर , शरावती यादव , श्रीराम पचिंद्रे , राजकुमार यादव , निनाद काळे , विलास कांबळे , शेखर जाधव , काशिनाथ मंगल , श्रीनिवास एकसंबेकर , अवधूत भट , विजय पवार अशा अनेक कलावंत वा कलासक्त मित्रांना त्याकाळात कोल्हापूरने भारावून टाकले होते आणि जवळपास दिवसातून एकदा महाद्वार रोडला  किंवा रंकाळ्याला  गेल्याशिवाय दिवस सफल झालाय असं आम्हाला वाटत न्हवते एक अस्तंगत चाललेले कोल्हापूर शेवटचे नागरिक म्हणून जणूकाही आम्ही आमच्या डोळ्यात साठवून घेत होतो हे कोल्हापूर शाहू महाराजांच्या प्रबोधनाचं , गोविंद पानसरेंच्या मार्क्सवादाचं , शैवांच्या अंबाबाईचं , आली रे आली गाडी आली म्हणत गर्जणाऱ्या श्रमिकांच्या शेकाप  चळवळीचं होतं त्या
गडकरी, संभाजी आणि राजसंन्यास श्रीधर तिळवे नाईक  चिन्हसृष्टीयतेचा सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे चिन्हसृष्टीयतेत कधीकधी चिन्ह , प्रतिमा , प्रतीक आणि ब्रँड ह्यांना मिळणारे अवाजवी महत्व , त्यांचे होणारे अपवाचन आणि त्यातून मुद्दाम घडवून आणि घडून जाणाऱ्या अपकृती . राम गणेश गडकरी ह्यांचा राजसंन्यासमधील लिखाणामुळे हलवला गेलेला पुतळा हे त्याचे उत्तम उदाहरण होय . प्रतिसृष्टीत उत्तराधुनिकतेने इतिहास हे एक रचित असते अशी मांडणी केली आणि इतिहास हा कायमच उघडा (ओपन ) असतो अशी मांडणी केली . ह्या मांडणीमुळे इतिहास हवा तसा रचू पाहण्याऱ्यांना सैद्धांतिक आधार मिळाला ह्याला प्रतिशह मिळाला तो चौथ्या नवतेकडून ! पण परंपरेत अडकलेल्या उत्तराधुनिक मानसिकतेने इतिहासातील व्यक्तींना प्रतीक बनवून अस्मितेचे राजकारण खेळायला सुरवात केली आणि पुराव्यांचे उत्तर पुराव्यांनी द्यायचे सोडून अपकृती करायलाच सुरवात केली वास्तविक कुठलाही कलावंत त्याला उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे ऐतिहासिक नाटक लिहितो आणि इतिहासकारांच्या प्रमाणे काही वेळा ऐत्याहासिक चुकाही करतो . शेक्सपिअरने ज्युलियस सीझर , अँटनी , क्लि
ओबीसी साहित्याची चळवळ आणि देशी संस्कृती श्रीधर तिळवे  ओबीसी साहित्याची  (ओसा )चळवळ ही साठोत्तरी साहित्यात उदयास  आलेल्या  १ ग्रामीण साहित्याची चळवळ  आणि  २ देशीवादी चळवळ  ह्या दोन साहित्यिक चळवळीच्या पुढचे पाऊल आहे . अनेकांच्या मनात १ ग्रामीण साहित्याची चळवळ  आणि २ देशीवादी चळवळ ह्या दोन चळवळी ऑलरेडी अस्तित्वात असतांना ह्या चळवळीची आवश्यकता काय असा प्रश्न येऊ शकतो . अनेक ओबीसी साहित्यिक हसतखेळत देशीवादी झालेले असतांना तर हा प्रश्न आधिकच सार्थक वाटू शकतो पण सध्याच्या देशी संस्कृतीचे ज्यांना भान आहे त्यांना देशीवाद हा देशी संस्कृतीच्या संदर्भात आऊटडेटेड झालाय हे कळणे अवघड नाही एकतर देशी संस्कृतीतील शासक समूहाने हा देशीवाद अमेरिकेतून आयात केलाय आणि आणि त्याची अंतिम परिणीती भाजपला सत्येवर आणण्यात झालीये . परंपरेचे भान किती ताणवायचे ह्याचे भान परंपरेकडे कधीच नसते परंपरा आपसुखपणे काहीच करत नाही परंपरा चांगल्या गोष्टीचे रक्षण करते आणि वाईट गोष्टी फेकते हा एक भ्रम आहे वस्तुस्थिती अशी आहे कि परंपरा ही नेहमीच परस्परविरोधी हितसंबंधात अडकून पडलेली असते आणि अनेक लोक तिला स्वतःच्या हित
ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ आणि तुकाराम ह्यांना फक्त कवी मानणे हे पलायन आहे . चौघेही निर्वाणाला पोहचले होते आणि त्यांची काव्यसाधना ही काही त्यांनी रसिकांना मनोरंजन देण्यासाठी केली न्हवती ती त्यांच्या निर्वाणसाधनेची भाग होती ज्यांना भक्ती मार्गाने निर्वाण प्राप्त करायचे आहे त्यांच्यासाठी ती आचरणाचा पाठ आहे साठोत्तरी लोकांना आणि कवी लोकांना अनेकदा साधना करायची नसते साधनेपासून पळायचे असते म्हणून मग त्यांचा कवी म्हणून अभ्यास वगैरे फॅडे निघतात . बसवेश्वर , कबीर , गुरुनानक , सोपान , मुक्ताबाई जनाबाई सहजोबाई लेहला रहीम रोहिदास असे एकापेक्षा एक श्रेष्ठ मोक्षधारी लोक ह्या भक्ती चळवळीने दिलेत गोरख सरहपा तिलोपा नरोपा निवृत्ती अश्या योग्यांनीही (तंत्रयोगी आणि राजयोगी )काव्यरचना केली आहे ह्यांचा फक्त कवी म्हणून अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांनी करावा पण ह्या लोकांना तो अपेक्षित नाही . तुम्ही निर्वाणाची साधना करावी हेच त्यांना अपेक्षित आहे तेव्हा कवी म्हणून अभ्यास फिभ्यास ह्या तुमच्या वावड्या आहेत उठसूठ शिवाजीचे नाव घेणारे राजकारणी आणि कवी म्हणून ह्यांचे नाव घेणारे कवी ह्यांच्यात काहीच फरक नाही श्रीध
भारतीय संस्कृती ही चार उपमुख्य संस्कृतींनी युक्त आहे मार्गी , देशी , पोटी आणि जमाती ह्या चारही संस्कृती भारतीय आहेत त्यातील कुठल्यातरी एका उपमुख्य संस्कृतीला संपूर्ण चेहरा मानणे हाच खरेतर नतद्रष्टेपणा !पण सांस्कृतिक राजकारण करणारे लोक हे वारंवार करतात . बॉलीवूड ही मार्गी संस्कृतीचे प्रॉडक्ट आहे म्हणून तो भारतीय संस्कृतीचा चेहरा नाही काय ?जमाती आदिवासी संस्कृतीची अस्मिता कुर्वाळण्याऱ्यांनी तिचा जेवढा सत्यानाश केला तेवढा कुणीच केला नाही त्यातूनच भुजंग मेश्रामासारखा अव्वल भारतीय दर्जाचा साहित्यिक मर्यादित केला गेलाय . एकीकडे जमातीचा गंधही नसलेले बॉलीवूडवाले आणि दुसरीकडे मार्गी म्हणजे काहीतरी भीषण आहे असा धसका घेणारे जमातीवाले दोघांनीही आदिवासी संस्कृती म्हणजे मजाक बनवून टाकलीये . जगातील अनेक संस्कृतींचा जमाती हा एक उपमुख्य चेहरा आहे अगदी तथाकथित हॉलिवूडवादी  यू एस ए चाही ! संपूर्ण जगाची म्हणून एक जागतिक जमाती संस्कृती उदयाला येणे अटळ आहे त्यांच्यात देवाणघेवाण अटळ आहे . जग म्हणजे केवळ हॉलिवूड किंवा बॉलीवूड न्हवे जग म्हणजे भारतीय आणि मेसोअमेरिकन जमातीतील कलासंस्कृतीही !हा जागतिक चेहरा एक
ओबीसी साहित्याची चळवळ श्रीधर तिळवे नाईक  साठोत्तरी साहित्यात ज्या काही महत्वाच्या चळवळी निर्माण झाल्या त्या सर्वच मार्गी साहित्य चळवळीविरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या १ देशीवादी चळवळ २ दलित चळवळ ३ आदिवासी साहित्याची चळवळ ४ अल्पसंख्यांक साहित्य चळवळ उदा ख्रिस्ती व मुस्लिम साहित्य चळवळ ५ ग्रामीण साहित्य चळवळ ६ स्त्रीवादी चळवळ १९९० नंतर मात्र एक नवीन चळवळ उभी राहिलीये ती म्हणजे ओबीसी साहित्य चळवळ मंडल आयोगामुळे नव्याने संघटित झालेल्या ओबीसी जाती यात येतात आणि पारंपरिक क्षत्रिय(कुणबी , लेवा पाटील व धनगर ) , वैश्य(तेली व इतर ) आणि शूद्र (अलुतेदार आणि बलुतेदार )वर्णातील अनेक जाती ह्यात येतात . ११०० च्या आसपास ब्राह्मणांनी सर्वच ब्राह्मणेतरांना शूद्र ठरवल्याने ब्राह्मणेतर टायटलखाली साहित्यिक चळवळी संघटित झाल्या पण मंडल  आयोगाने नेमक्या अप्रगत जातीजमाती वेचून काढून आरक्षण सवलतपात्र ओबीसी समाज नव्याने निर्माण केला आणि ह्या समाजातून ही चळवळ निर्माण झाली आहे .   प्रश्न असा आहे कि ह्या चळवळीचा वर उल्लेख केलेल्या चळवळींशी नेमका काय संबंध आहे आणि ती वरील चळवळीपासून कशी कुठे आणि का वेगळी आहे .