Posts

Showing posts from December, 2016
साठोत्तरी लेखकांची समीक्षा करताना केवळ त्यांची स्तुती करणे ह्याला काय अर्थ आहे ? ह्यांच्या मर्यादाही दाखवायला नकोत काय ? समीक्षेचे काम जे झाले ते सांगणे एवढेच नसते तर काय झाले नाही हेही सांगणे असते . ऐंशोत्तरीनी नुसती फॅनगिरी केली म्हणून तर ह्यांचे लेखन साठोत्तरीत अडकून पडले जागतिकीकरणाचा रेटा आला नसता तर हे लेखक फक्त साठोत्तरीचे बांडगुळ म्हणूनच वाढले असते .  नव्वदोत्तरीत   चौथ्या नवतेचे  बंड आकांतून व्हायला होते पण  काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही चळवळ दिलीप चित्रेंच्या आणि इतरांच्या गळ्यात बांधली एडजस्टमेंटवादी प्रवृत्तीनी मराठी साहित्यिक चळवळीचा नेहमीच घात केला आहे . क्रांतिकारक म्हणून श्रेय हवे आणि ऍडजस्टमेन्टचा मेवा पण खायला मिळायला हवा अशी ही वृत्ती ! हिचे काय करायचे हाच खरा प्रश्न आहे . Anand Thatte  ह्यांनी  हे कुठल्याही काळाला लागू नाही का? असा प्रश्न विचारला म्हणून आणि राजेंद्र बाणाईत ह्यांनी त्यांच्या ह्या प्रश्नाला सहमती दर्शवली म्हणून ह्या प्रश्नाला हे माझ्या अल्प कुवतीनुसार दिलेले उत्तर  प्रत्येक कालखंड स्वतःची नवता घेऊन येतो जसे कि १८२० ते १८६० = सुधारणावादी नवत
कविता आणि छंद १ श्रीधर तिळवे नाईक   मराठीत कविता आणि छंद ह्यांचा सांगोपांग विचार अनेकांनी केला आहे ग्रेस आणि सुरेश भट ह्यांच्यामुळे मराठीत वृत्त आणि छंद ह्यांचा कमबॅक झाला विशेषतः ग्रेस ह्यांनी अनेक पारंपारीक वृते समर्थपणाने वापरून वृत्त आऊटडेटेड झालंय ही कल्पना मोडीत काढीत काढली निसर्गिय युगात माणसाने अक्षरवृत्ते आणि मात्रावृत्ते ह्यांचा शोध लावला पुढे विश्वीय युगाने त्यांचा आधीक विस्तार केला ह्यांना प्रथम  छेद दिला तो सृष्टीय युगाने ! विज्ञानाने भारावलेल्या ह्या युगात स्व महत्वाचा झाला आणि स्वछंद ही नव्या युगाची भाषाशैली झाली (freeverse ) विशेषतः शेक्सपियर ने स्वछंदाचा जबरदस्त वापर केला त्याची नाटके स्वछंदांच्या वापराची मिसाल बनली स्वछंदात छंद सोडला जात नाही मात्र मात्रांची गणिती मात्रा भिरकावली जाते मात्रिक लय सोडली जात नाही पण मात्रांचे अंकगणित भिरकावले जाते आणि स्व प्रमाण मानून रचनेत सैलपणा आला तर त्याला दुरुस्त न करता तो तसाच ठेवला जातो . उदाहरणार्थ  अनुष्टुभची मात्रिक लय सोडायची नाही पण मात्रा कमीजास्त झाल्या तरी त्याविषयी बॉदर करायचे नाही अशी ही प्रवृत्ती असते प्रतिसृष्टीय