Posts

Showing posts from February, 2020
काही प्रश्नांना शॉर्टकट मध्ये दिलेली उत्तरे आता अधिक दीर्घ लॉंगकटमध्ये श्रीधर तिळवे नाईक प्रथम नाव सांगतो श्रीधर शांताराम नलिनी तिळवे नाईक कवितेचे किंबहुना कुठल्याही कलेचे मुख्य काम अनुभव देणे वा सादर करणे हे आहे आणि अनुभव हा आपल्या आसपास होत असतो घडत असतो घडवला जात असतो आणि सादरही केला जात असतो कला अनुभव सादर करत असते मीडियाही अलीकडे अनुभव सादर करत असतो किंबहुना मीडियाची अनुभव सादर करण्याची लाईव्ह टेलिकास्ट पद्धत हे एक चौथ्या नवतेचे वैशिष्ट्य आहे अशावेळी कलेचे नेमके काम काय हा प्रश्न पडतो आपण आपल्या जीवनाचे मीडियाही असतो कारण आपले अनुभव इतरांच्यापुढे सादर करण्याची खाज आपल्यालाही असते आणि इतरांच्या अनुभवात डोकावून बघण्याची खुजलीही आपण अंतिमतः मोक्षिक किंवा सामाजिक असतो हे सामाजिक अलीकडे आपण लँग्वेज ऍनिमल आहोत असे सांगत असते नो डाउट आपण प्रोग्रामेबल एंटीटी आहोत नो डाउट आपल्यातच कल्चर नामक एक अलिएन आपले डीएनए घेऊन वावरत असतो आणि रहातही  असतो पण आपल्यात हे महत्वाचे आपण न्हवे त्यामुळे हया प्रोगॅमेबल बरोबर आपण मांसल आहोत हे लक्ष्यात घ्यायला हवे मांसल ह्या शब्दाचा माझ्यासाठी असलेला अर्थ