Posts

Showing posts from September, 2018
कविता महाजन गेल्या !काहीश्या अनपेक्षित ! ऐंशोत्तर पिढीतील एक अतिशय दमदार कादंबरीकार गेली माझ्या संपूर्ण आयुष्यात मी त्यांना फक्त एकदाच भेटलो तेही म सु पाटील ह्यांच्यामुळे रुईया कॉलेजवर त्यांच्या  काव्यसंग्रहावर बोलताना ! आमचे वैयक्तिक संबंध फारसे न्हवते आणि फ्रेंडलिस्ट छोटी करण्याच्या माझ्या अतिरेकी प्रोजेक्टमध्ये  माझ्या फ्रेंड लिस्टींतून काही फारच महत्वाच्या व्यक्ती कमी केल्या गेल्या त्यात त्याही असल्याने जो फेसबुकमधून संबंध यायचा तोही गेला त्यामुळे माझ्याजवळ त्यांच्या वैयक्तिक आठवणी नाहीतच पण कलेच्या पातळीवर मात्र मी त्यांच्या सर्व हिकमतींच्या कडे लक्ष्य ठेवून होता मला व्यक्तिशः त्यांची ब्र ही कादंबरी फार महत्वाची वाटते नेमाडे ह्यांचा देशीवाद आणि अवचटांचा खास मराठी डॉक्युमेंटेशनचा सामाजिक अवतार ह्यांच्या दरम्यान दोन्हीचा समतोल साधणारा एक वास्तववाद आहे ज्याला द्वंद्वात्मक वास्तववाद म्हणता येईल  ज्याची परिवर्तनवादाशी घट्ट नाळ आहे मराठीत दीनानाथ मनोहर , प्रभाकर पेंढारकर , विलास मनोहर ह्यांसारख्या कादंबरीकारांनी तो विकसित केला आणि कविता महाजन ह्या ह्या कुळातील हा वास्तववाद विकसित करण
अस्ताचं युग आणि नवनिर्माणाचे प्रयत्न श्रीधर तिळवे नाईक  मी नागेशी बांदिवड्याचा आहे किंवा कोल्हापूरचा आहे म्हणजे काय आहे ह्या प्रश्नाने माझा न्यू कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यापासून सतत   पाठलाग केला आहे १९८० ते १९८७   हा माझा कालखंड मोक्ष आणि त्यासाठी स्वतःचे संस्कारण म्हणजे कंडिशनिंग तपासणारा आणि तासणारा कालखंड आहे माझ्या मिलिंद गुर्जर , जयसिंग पाटील , बाळकृष्ण शिर्के , महेश पुसाळकर , विश्वजित जाधव , अजय कोंडेकर , शरावती यादव ,  श्रीराम पचिंद्रे , राजकुमार यादव , निनाद काळे , विलास कांबळे , शेखर जाधव , काशिनाथ मंगल , श्रीनिवास एकसंबेकर , अवधूत भट , विजय पवार अशा अनेक कलावंत वा कलासक्त मित्रांना त्याकाळात कोल्हापूरने भारावून टाकले होते आणि जवळपास दिवसातून एकदा महाद्वार रोडला    किंवा रंकाळ्याला    गेल्याशिवाय दिवस सफल झालाय असं आम्हाला वाटत न्हवते एक अस्तंगत चाललेले कोल्हापूर शेवटचे नागरिक म्हणून जणूकाही आम्ही आमच्या डोळ्यात साठवून घेत होतो हे कोल्हापूर शाहू महाराजांच