Posts

Showing posts from January, 2019

Marathi literature | Wikipedia audio article

Image
प्रजासत्ताकदिनी थोडे चिंतन व्हावे म्हणून श्रीधर तिळवे नाईक भारतीय प्रजासत्ताक हे कधीच सर्व भारतीयांनी पाठिंबा दिलेले प्रजासत्ताक न्हवते तर बहुसंख्याक भारतीयांनी पाठिंबा दिलेले प्रजासत्ताक होते . हा बहुमताचा पाठिंबा काँग्रेसला होता आणि काँग्रेसने तिला अभिप्रेत असलेले प्रजासत्ताक निर्माण करण्यासाठी संविधानाची निर्मिती केली जिला बाबासाहेब आंबेडकरांचाही पाठिंबा होता किंबहुना ह्या संविधान निर्मितीत त्यांचा सिंहांचा वाटा होता काँग्रेस आणि आंबेडकर ह्यांच्यात सहमतीचे मुद्दे तब्बल ९० % होते आणि जिथे सहमती न्हवती अशा मुद्द्यांची चर्चा बाबासाहेबांनी नंतर केली काँग्रेसने तयार केलेलं हे संविधान हिंदुत्ववाद्यांच्या सहमतीने तयार करण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी ह्या काळात संविधानाबाबत हिंदुत्ववादी गोंधळलेले होते स्मृतींच्या परंपरेकडे सरकणे शक्य नाही आणि आधुनिकता पेलत नाही अशी त्यांची गोची होती साहजिकच जिला ते आता भीमस्मृती म्हणतात आणि परंपरेत बसवू पाहतात तिच्याशी तडजोड करण्यावाचून त्यांच्याकडे ह्या काळात तरी पर्याय न्हवता असे दिसते त्यांना अभिप्रेत असलेले हिंदू राष्ट्र हा एक भावनिक परंपराब
१९९० नंतर जगाच्या इतिहासात इतके विविध धक्कादायक शोध लागलेत की आधीचे इतिहास कचऱ्याच्या पेटित टाकायच्या लायकीचे झालेत पण मराठी लोकांचा ह्याबाबतीतला अनभिज्ञपणा तारीफेकाबील ! महान विचारवंतांना दुखवायची भारतीय विचारवंतांची तयारी नाही त्यामुळे तडजोडीचे इतिहास पुन्हा पुन्हा सांगितले जातात अस्मितांचे इतिहास घेऊन राजकारण खेळले जाते  सत्य काय आहे त्यापेक्षा कोणतं सत्य मांडले म्हणजे लाईक्स मिळतील फॅनफॉलोइंग मिळेल मते मिळतील त्याचा विचार करून कालबाह्य झालेला इतिहास सादर केला जातोय गोड बोलणं आणि खोटं बोलणं ह्यातील अंतर सर्वांना कळो ह्याच शुभेच्छा श्रीधर तिळवे नाईक 
मराठी साहित्याची उलटी गंगा :श्रीधर तिळवे नाईक  कुठलेही युग अद्ययावयता जोपासण्यासाठी अद्ययावत माध्यमे वापरत पुढे जात असते किंबहुना जितके माध्यम अद्ययावत तितके ते युग अद्ययावत ! प्रत्येक युगात अद्ययावत माध्यमे वापरणाऱ्यांना सहजासहजी जागा मिळत नाही त्यामुळे अद्ययावत लोकांना बंड करावे लागते आणि आपल्या युगाची नवता तिच्यातील अद्ययावतता विश्लेषण करून मांडावी लागते चौथ्या नवतेला हा संघर्ष हा अटळ होता आणि तिने तो केलाही ! कुठल्याही  नवतेतील दुसरी व तिसरी पिढी ही पहिल्या पिढीपेक्षा आपली नवता अधिक चांगल्या रित्या पेलते हा इतिहास असल्यानेच मी चौथ्या नवतेची मांडणी करतांना आमच्या ऎशोत्तर पिढीपेक्षा नव्वदोत्तर पिढी आणि नव्वदोत्तर पिढीपेक्षा दोन हजारोत्तर पिढी आमच्यापेक्षा ताकदीने लिखाण करेल अशी मांडणी केली होती प्रत्यक्षातही आमच्यापेक्षा नव्वदोत्तरीत सलील वाघांच्या पासून नितीन वाघ संतोष पवारपर्यंत आणि  आत्ता ओंकार कुलकर्णी प्रणव सुखदेव पासून स्वप्नील शेळकेपर्यंत अनेकजण अतिशय अव्वल लिखाण करतांना दिसतायत पण एक गोष्ट जी बदलेल असं वाटलं होतं ती मात्र बदललेली दिसत नाही ती म्हणजे माध्यम ! वास्तविक च