Posts

Showing posts from October, 2018
सागर तळाशीकर दुराव्यातून जिव्हाळ्याकडे श्रीधर तिळवे नाईक सागरची आणि माझी पहिली भेट नेमकी कधी झाली हे आता आठवणं कठीण आहे इतकी ती जुनी आहे भेटल्यापासून हे नाते अंतर ठेवून जिव्हाळा राखणे ह्या कॅटेगरीतील आहे ह्याला आम्ही दोघेही जबाबदार आहोत माझी स्वतःची जीवनशैली म्हणजे जो ज्या समूहातील आहे त्याला त्या समूहाच्या अंगाने भेटणे कविंना कवी म्हणून संन्याश्यांना संन्याशी म्हणून शैवांना शैवाचार्य म्हणून इतिहासकारांना इतिहासकार म्हणून भविष्यावैज्ञानिकांना भविष्यावैज्ञानिक म्हणून ज्योतिष्यांना ज्योतिषी म्हणून समाजशास्त्रज्ञांना समाजशास्त्री म्हणून फिल्म नाटकवाल्यांना फिल्म नाटकवाला म्हणून ! सागर मला भेटला तो नाटकवाला म्हणून ! साहजिकच आमच्या भेटी नाटक , सिरीयल आणि फिल्मच्या पार्श्वभूमीवरच होत राहिल्या तो सुरवातीला एक मितभाषी , माझ्या तथाकथित सिनियॉरिटीचा आदर ठेवणारा म्हणून भेटत असला तरी लवकरच आमची भेट मित्र म्हणून व्हायला लागली त्याने त्यावेळी आंतरमहाविद्यालयीन नाट्यकात काम करायला सुरवात केली होती आणि तो लॉचे शिक्षण घेत होता त्यावेळीही  तो स्वतःचे लाईफ कधीच उघड्यावर आणायचा नाही किंवा त्याचे
प्रत्यय , शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन ३ श्रीधर तिळवे नाईक कोपेनहेगेन माझ्या आयुष्यात मी इतिहासाचा अभ्यास पाच वेळा केला प्रथम शैवाचार्य म्हणून  भारतीय दर्शनाच्या संदर्भात मग बीएला इतिहास हा माझा मुख्य विषय होता तेव्हा जागतिक इतिहासापासून महाराष्ट्राच्या इतिहासापर्यंत वैज्ञानिक पद्धतीने पुढे पीएचडीला प्रायोगिक रंगभूमीचा अभ्यास करतांना  सरंचनावाद उत्तरसंरचनावाद आणि पोस्टमॉडर्निज्मच्या संदर्भात ,  चौथ्यांदा जेव्हा जेएनयूला पेपर सादर केल्यानंतर शैव पॅरॅडाईम्स आणि युरोपियन पॅरॅडाईम्स हा इतिहासविषयीचा  ग्रंथ सिद्ध केला तेव्हा पुन्हा शैव पद्धतीने आणि पाचव्यांदा जेव्हा थिएटर अकॅडमीत सगळे इजम शिकवायची जबाबदारी मंगेशने टाकली तेव्हा थिएट्रिकल संदर्भात  ! कोपेनहेगेन ट्क्करले ते चौथ्या इतिहासाच्या अभ्यासावेळी ज्यांना कॉन्टिनेन्टल फिलॉसॉफी माहित आहे त्यांना  जर्मन आणि डेन आयडेन्टीटीचे प्रश्न माहित आहेत त्यांना कोपेनहेगेनला टक्करावेच लागते वास्तविक इंग्लिश जर्मन आणि डेन तिन्हीही जर्मनीक तरीही त्यांच्यातले पेच इतिहासकारांना आव्हान देणारे ! ऍटोमिक संरचनेचे रुदरफोर्ड मॉडेल , बोहर मॉडेल आणि नंतरचे आईझ
प्रत्यय ,शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन २  शरद भुताडिया आणि आत्मनिष्ठ अभिनयघराणे श्रीधर तिळवे नाईक संगीताची जशी स्पष्ट घराणी असतात तशी अभिनयाचीही घराणी असतात एक शैवाचार्य म्हणून अभिनय शिकणे गरजेचे असल्याने ते शिकताना आणि गेली कित्येक वर्षे अभिनय शिकवताना मी हे सत्य शिकलो आहे शैव परंपरेने अभिनयाचे दोन प्रकार केलेले आहेत १ नाट्यधर्मी वा कलाधर्मी अभिनय २ लोकधर्मी म्हणजे लोकांचे अनुकरण करून करावयाचा अभिनय इंग्लिशमध्ये ज्याला BECOMING म्हणतात त्याला शैव शब्द आहे भव आणि ह्या भवण्याची शक्ती  ती भवानी ! हे भवणे मानवी पार्थिव पातळीवर  भवन भुवन  आणि भव्यता निर्माण करते त्याचा अंतःकरणात्मक व्यवहार व चलनवलन म्हणजे भाव होय अभिनेत्याने त्या त्या सीनप्रमाणे स्वतःला भावांनी संचरित करावयाचे आणि त्या त्या सीननुसार नाट्यधर्मी वा कलाधर्मी किंवा लोकधर्मी अभिनय करावयाचा अशी शैव कल्पना आहे ह्या अभिनयानुसार मग रसिकांच्यात रस निर्माण होतात आणि रसनिष्पती हे कलेचे प्रधान कार्य आहे असे शैव मानतात शैव परंपरेनुसार अभिनयाची दोन घराणी आहेत १ अभिजात घराणे २ लोक घराणे शैव दोन्ही घराणी महत्वाची मानतात आणि अनेकदा
प्रत्यय . शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन १ परवा आमच्या थिएटर अकॅडमीत कोपेनहेगेन चा अतिशय सुंदर असा प्रयोग झाला आणि कोल्हापूरच्या माझ्या वास्तव्यातील एक मोठा कालखंड झर्र्कन सरकला . हे नाटक व्हावे  अशी मंगेश बनसोड आणि माझी फार इच्छा होती . परिवर्तनवादाला प्रोत्साहन देणारे प्रत्येक नाटक अकॅडेमित झाले पाहिजे ही आम्हा दोघांचीही मनापासून इच्छा आहे आणि मंगेशच्या हातात अकॅडेमिचे नेतृत्व आल्याने हे आता थोडे सोपेही झाले आहे अर्थात मंगेशला हे सोपे जात नाहीये पण तरीही मार्ग काढत तो हे करतो आहे . त्यामुळे प्रथम त्याचे अभिनंदन ! हा प्रयोग झाल्यानंतर आणि मी भुताडियांना सलाम केल्याबद्दल काही प्रश्न निर्माण केले गेलेत  त्याची प्रथम उत्तरे देतो  तू एकेकाळी प्रत्ययला कट्टर विरोध केला होतास कि नाही मग आता हे कौतूक का  ? मी विरोध केला होता  ही वस्तुस्थिती आहे ह्या विरोधाची कारणे वैचारिक होती व आहेत ही कारणे पुढीलप्रमाणे १ माझा मार्क्सवादाला ठाम विरोध होता आणि आहे आणि तो मी कधीही लपवलेला नाही मात्र श्रमांना प्रतिष्ठा देण्यात मार्क्सचा वाटा आहे हे मला मान्य आहे श्रमिकांना न्याय देण्याचा मार्क
दिनकर मनवरांच्या कवितेवरून सध्या सुरु झालेला वाद हा केवळ प्रतिक्रिया नाही तर त्यात अस्मितांच्या बोचक्यात मानवता बांधू पाहणाऱ्या मानसिकतेचा झैलझपाटा आहे त्याचा आदर राखूनही मी म्हणेन कि अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी दिनकर मनवरांना पाठिंबा देणे आवश्यक आहे भारतीय प्रबोधनाचे युग अजून संपलेले नाही किंबहुना त्यातील खरे संघर्ष आता अधिक उफाळून आले आहेत प्रबोधन काय आहे ? प्रबोधनाचा राजकीय प्रोजेक्ट कोणता ? तर हा प्रोजेक्ट आहे नेशन बिल्डिंगचा राष्ट्र निर्माणाचा प्रत्येक व्यक्तीतील साऱ्या अस्मितांचा अंत करून त्याला भारतीय नावाची राष्ट्रीय अस्मिता पुरवण्याचा ! युरोपने प्रथम आपली राष्ट्रे निर्माण करायला सुरवात केली आणि तिथेही अनेक देशांच्या अस्मितेवरून फाळण्या झाल्या आणि स्वातंत्र्यवादी चळवळीही लढल्या गेल्या तिथल्या वांशिक आणि आदिवासी अस्मिता तर राज्यकर्त्यांनी अक्षरशः चिरडल्या आणि ख्रिश्चन धर्माने एकधर्मीयत्व लादून आपल्या आपल्या राजांना प्रचंड मदतच केली भारतात एकधर्मीयत्वाचा अभाव होता आणि तो भरून काढण्यासाठी सावरकरांनी एकंहिन्दुत्ववादी अस्मिता निर्माण केली तर काँग्रेसने सेक्युलर भारतीय अस्मिता !ह्य