Posts

Showing posts from August, 2019
आल्हाद भावसार ह्याच्या एका कॉमेन्टला दिलेले उत्तर आल्हाद म्हणून तर मी आधीपासूनच चौथी नवता किंवा जालीय नवता असा शब्दप्रयोग वापरूया म्हणत होतो कारण साठोत्तरीत शेवटी ग्रेस सारखा रोमँटिक कवीही शिरला काळ धरून लिहिले कि हे हमखास होते कविता बदलते ती अवकाश कायापालट करतो तेव्हा ! संवेदनशीलता भावशीलता शरीरशीलता विचारशीलता आत्मशिलता अवकाशशीलता काळशीलता स्थितिशीलता गतिशीलता जेव्हा कायापालट करतात आणि  अवकाशाचा भूगोल कायापालट करतो बदलतो जागा बदलते कायापालट करते आपला मी  कायापालट करतो शरीराच्या ऍक्सेसरीज आणि वापर कायापालट करतो विचार कायापालट करतो  भाव कायापालट करतो शक्तीचा ऊर्जेचा प्रतिभेचा झोत कायापालट करतो स्थितीचा ताणाबाणा कायापालट करतो गतीचा वेग आणि संवेग कायापालट करतो  तेव्हा कला बदलते केवळ मानवी काळाने कायापालट करून  कविता बदलत नाही म्हणूनच साठोत्तरी प्रमाणे नव्वदोत्तरी म्हणून प्रचार करू नका  म्हणून सगळ्या चौथ्या नवतेच्या कविंना सांगत होतो सांगत होतो कि नव्वदोत्तरी ह्या शब्दाने पुढे जी भाऊबहीणगर्दी तयार होईल त्यात तुमची विशेषता हरवून जाईल पण श्रीधरने दिलेला शब्द स्वीकारायचा नाही म्हणून आणि स
आंबेडकरवादी , दलित कविता आणि मी श्रीधर तिळवे नाईक कॉलेज जीवनात आंबेडकरवादी असल्याने आपण दलित कविता लिहिलीच पाहिजे अशी माझी धारणा होती त्यावेळी जातीपातीचे राजकारण जोरात असल्याने सर्व दलितेतर लोकांनी आंबेडकरवाद स्वीकारून दलित कविता लिहल्यास अस्पृश्यतेचा कलंक दूर करण्यास मदत होऊ शकते असे माझे ठाम मत होते १९८० नंतर मला वाटतं हा एक माहोल निर्माण झाला होता आणि अनेक दलितेतर कविंनी आंबेड्करांच्यावर आणि अस्पृश्यांच्यावर कविता लिहल्या दुर्देवाने ह्याचा परिणाम काही लोकांच्यावर फारच विपरीत झाला काही दलित कविंनी व समीक्षकांनी तुम्हाला अनुभव नसतांना तुम्हांला अशी कविता लिहिण्याचा अधिकारच नाही अशी भूमिका घेतली ज्याने दलित जातीत जन्म घेतला तोच फक्त दलित अशी व्याख्या केली त्यामुळे बहिष्कृत केलेल्या आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडांना दलित मानता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली गेली ह्याचा एक विपरीत परिणाम असा झाला कि दलितेतर लोकांनी आंबेडकरवादी होणे हे खुद्द दलितांना मान्य नाही असा मेसेज गेला जो तरीही दलितेतर असूनही आंबेडकरवादी आहे त्याला सणकी , मूर्ख अशी विशेषणं चिटकायला लागली