Posts

Showing posts from May, 2019
वैयक्तिक पातळीवर काव्यव्यवहार कसा हाताळावा हे मला कधीही कळलं नाही . अगदी कुणी कविता चांगली आहे म्हंटल तरी त्याला काय उत्तर द्यायचं ? कविता लिहाव्यात पण काव्यव्यवहार टाळावा हा माझा बहुदा पिंड असावा नाहीतर प्रिंट माध्यमात कविता पाठवण्याबाबत मी एव्हढा उदासीन राहिलो नसतो मला वैयक्तिक संवाद आवडायचा पण कवितेवर सार्वजनिक बोलणं फार आवडत नव्हतं त्यामुळं माझे समकालीन जेव्हा अनुष्टुभला किंवा पुढारीला कविता पाठवायचे तेव्हा त्यांचं काय करायचं हे मला कधीही कळलं नाही कवितेचा व्यवहार आपल्याविनाच चाललेला बरा असे मला वाटत होते फेसबुकने व ब्लॉगने ( ब्लॉगवर जवळ जवळ माझ्या सर्व टाईप केलेल्या कविता एकत्र उपलब्ध आहेत )हा प्रश्न सुटला इथे जे वैयक्तिक आहे तेच सार्वजनिक आहे त्यामुळे प्रिंट माध्यमात फारश्या कविता न पाठवणारा मी फेसबुकवर मात्र सुसाट सुटलो निदान लाईक किंवा धन्यवाद देणे इतका व्यवहार मला जमू लागला कविता व इतर लेखन टाकण्याचे वडिलांना दिलेले वचन कसे पूर्ण करायचे हा प्रश्न सुटला माझा इनबॉक्समधला व्यवहार फार लांबडा झाला नाही पण काही तरी झाला अनेकांना माझा प्रतिसाद फार थंड वाटला हा धन्यवादवर बोळवण कर