Posts

Showing posts from July, 2019
कोल्हापुरात असतांना शाहिरी परंपरेशी घट्ट नातं होतं साहजिकच अण्णाभाऊ साठेंच्या काही रचना त्यावेळी गंमतीगमतीत कम्पोज केल्या होत्या त्यातील जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव इथे देतोय ही माझी आदरांजली दाखवण्याची पद्धत आहे असं समजू शकता अण्णांच्यावर एक लेख लिहायचा विचार आहे जी के ऐनापुरेने हा आग्रह केलाय बघू कसं जमतं ते !
कवितेचा थाट श्रीधर तिळवे नाईक मराठीला पु शि रेगे ह्यांच्या ज्या काय देणग्या आहेत त्यातील एक म्हणजे स्वतःच्या कवितेवर कसं काम करायचं ह्याचा त्यांनी घालून दिलेला आदर्श पाठ पारंपारिक वृत्तावर कसं काम करायचं हे आपणाला बोरकर कुसुमाग्रज करंदीकर मर्ढेकर ह्यांनी दाखवून दिलं आणि पुढे ग्रेस व आरती प्रभू ह्यांनी पण मुक्तछंदावरही काम करायचं असतं ह्याची पहिली तीव्र जाणीव रेगे आणि करंदीकर ह्यांनाच होती असे दिसते ह्यातील रेगे ज्याला ठाणमंडित थाट म्हणता येईल तो सतत विकसित करतांना दिसतात त्यासाठी ते पाश्च्यात्य कविंचे थाटही कसे मराठीत विकसित करतात हे मी कमिंग्ज ची एक थाटरचना त्यांनी मराठीत  पक्षी जे झाडावर गाणे गातो असते झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात वैग्रे मध्ये कशी आणली ते मी सप्रमाण सिद्ध केले होते आपल्याकडे ह्याला चोरी म्हणणारे मूर्ख आहेत वास्तविक ही एक आवश्यक आयात असते आणि एखादा कवी त्या थाटाचे मराठी रूपांतर कसे करतो हे महत्वाचे असते गाथा सप्तशतीचे सौष्ठव तर ज्या तर्हेने पु शि नीं नवीन मराठीत आणले त्याला तोड नाही अरुण कोल्हटकर हे पु शिंच्या खांद्यावर उभे असलेले कवी आहेत १९४० ते १९६० मध्ये अमे
मला अनुवादाचा अनुभव नाही पण पुनर्वाचन करावे लागते कधीकधी ! शेक्सपिअर कॉलेजातच समग्र वाचला होता पण पीचडीच्या वेळी पुन्हा वाचावा लागला पुढे पीटर ब्रुकने ऑथेल्लोचा अर्थ एक दिग्दर्शक म्हणून कसा पलटवला ते वाचले आणि ब्रुकच्या नजरेतून ऑथेल्लो वाचायची वेळ आली त्यानंतर पुन्हा सलमान रश्दीने मूरस लास्ट साय लिहिली आणि ती वाचतांना पुन्हा ऑथेल्लो वाचायची वेळ आली ब्रुकने वंशभेदाच्या अंगाने तर रश्दीने तो मूर असल्याच्या अंगाने ऑथेल्लो पाहिला होता आता हा युवल हे अनएन्डिंग आहे मॅट्रिक्सवर मी दैनिक प्रहारमध्ये लेखमालिका लिहिली तेव्हाही त्याचे काही तुकडे पुन्हा पाहावे लागले होते नंतर त्यात एक बॉद्रीलार्द चा संदर्भ आहे म्हणून तो कन्फर्म करायला पहावा लागला होता सर्वाधिक वाचन अर्थातच महाभारताचे करावे लागते महाभारताने सगळ्या भारतीय लेखकांची ठासलेली आहे सर्वात वाईट म्हणजे महाभारत अथपासून इतिपर्यंत ब्राम्हण्यवादाचे  समर्थन करत असल्याने त्याची धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी प्रत्येक वाचनात अवस्था असते युवल भारतीय नाही हेच बरे ------------------------------------ सर्वोत्कृष्टतेची आस ही एकतर तुमच्यात असते
Image
भारतीय प्रबोधन आधी सुरु होऊनही का वाढले नाही हा भारतीय इतिहासातील एक कळीचा प्रश्न आहे ह्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण म्हणजे भारतीय प्रबोधनाला इथल्या राज्यकर्त्यांनी आधार पुरवला नाही आणि ज्यांनी आधार पुरवला त्या राजांना अतिशय पद्धतशीरपणे संपवले गेले शंकराचार्यांनी हिंदू धर्म स्थापन करून पंचायतन देऊन हिंदूंचा गाभारा वसवला तर वेदांत सांगून मोक्षाची वाट वसवली समाजरचनेत वर्णजातिव्यवस्थेचा पुरस्कार करून वर्णजातीअधिष्ठित समाज निर्माण केला आणि अर्थकारणही वर्णजातिप्रधान केले शैवांचे धर्मांतर घडवून त्यांना हिंदू करून टाकले आणि वैदिक समाजरचना व धर्मरचना त्यांच्यावर लादली ह्याला शैव उत्तर देणे अपरिहार्य होते शैवांचे उत्तर दक्षिणेत बसवेश्वर व उत्तरेत नानक ह्यांच्या रूपाने उदयाला आले आणि ह्यांच्या आधारे शैव राजवटी उभ्या करण्याचा प्रयत्न झाला मुस्लिमांच्यात प्रबोधनाचा राजकीय घाट घातला तो अकबराने ! त्याने दिनेईलाही हा नवीन धर्म उभा केला तर शिवाजींनी पुन्हा एकदा शैव राजवटींचा आदर्श निर्माण केला पण मग माशी शिंकली कुठं ? ह्यापैकी कुणी शंकराचार्यांना नाकारण्याचा प्रयत्नच केला  नाही ह्या
दलितांचा पॅन्थर गेला श्रीधर तिळवे नाईक पॅन्थर गेला खरेतर एकमेवाद्वितीय पॅन्थर गेला अनेकजण गवत खाण्यात धन्यता मानत असण्याच्या काळात पॅन्थर गेला तो जाणार होता अटळ होते वय खुणावत होते पण तरीही त्याचे जाणे मराठी साहित्यासाठी दुःख दायक आहे आता त्याच्यावर खूप छान छान लिखाण येईल पण त्याने काय होणार हयात असतांना आपल्या संस्कृतीनं त्याला काय दिलं ? सत्यकथा जाळायला काय अक्कल लागते ?घेतली काडी लाव आग !सत्यकथा का जाळायची हे कळायला अक्कल लागते आणि ती अक्कल राजा ढालेंना मोठं करते .  ढालेंनी अगदी सविस्तर सांगितले सत्यकथा का जाळायची ते आणि का जाळली ते ! राजा ढाले नामदेव ढसाळ आणि अरुण कांबळे ह्या तिघांनी दलित पँथरची स्थापना केली हे तर सर्वश्रुत आहे ह्यातील अरुण कांबळे माझे मुंबई विद्यापीठातील PROFESSOR होते माझ्या पाठीमागे ठाम उभे असलेले PROFESSOR !दलित पँथरचा त्यांच्या दृष्टिकोनातला इतिहास त्यांनी मला ऐकवला होता आणि त्यात राजा ढालेंचे स्थान अढळ होते समाज बदलायचा असेल तर विचार बदलायला हवा आणि विचार बदलण्यासाठी आंदोलन हे त्यांच्या परिवर्तनवादाचे  मुख्य सूत्र होते जे फुल्यांच्यापासून सुरु होत हो
मी फेसबुकवर  अनेकदा सांगितले आहे तेच इथे पुन्हा सांगतो माझ्या कवितांचे चार टप्पे पडतात १ १९८२ ते १९८७ ह्या कालखंडातल्या कविता मी एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार आणि डेकॅथलॉन ह्या दोन सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता कोल्हापूरशी व अपवादात्मक गोव्याशी निगडित आहेत २  १९८७ ते २००७ ह्या कालखंडातल्या कविता मी चॅनेल  ह्या  सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता मुंबईशी  व अपवादात्मक कोल्हापूर गोव्याशी निगडित आहेत ३ २००८ ते २०१४ह्या कालखंडातल्या कविता मी नेट   ह्या सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता बॉलिवूड  व अपवादात्मक कोल्हापूर गोव्याशी निगडित आहेत ४ २०१४ ते ह्या क्षणापर्यंतच्या  कविता निर्वाण  सिरीजमध्ये प्रकाशित करतो ह्या सर्वच कविता अध्यात्म  व अपवादात्मक कोल्हापूर  गोव्याशी निगडित आहेत एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार मध्ये कोल्हापुरी भाषा अटळपणे येते त्यामुळे न्हेले न्हवते हाय असे शब्दही येतात ------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकीबाबच्या आठवणीत अर्थात पंडित कवी , रोमँटिसिझम आणि बा भ बोरकरांची कविता  श्रीधर तिळवे नाईक मराठी कवितेच्या इतिहासात पंडित कवितेचं एक स्कूल आहे त्यात अनेक पंडितांच्या स्वयंवरकविता आणि हरणकविता येतात ह्या पंडितांनी रामायण महाभारताचे मराठीकरण घडवून ते मराठी घराघरात न्हेले ह्या पंडितांच्यात दोन प्रवाह होते १ ब्राम्हणी संस्कृतीधार्जिणी मार्गी कविता ज्याचे सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व मोरोपंतांच्यात आढळते २ देशी पंडिती  मराठीधार्जिणी आख्यानक कविता जी क्षत्रियांचे प्रतिनिधित्व करते विशेषतः वैष्णव क्षत्रिय ज्याचे प्रतिनिधित्व स्वामी श्रीधर ब्रम्हानंद नाझरेकर ह्यांच्या कवितेत आढळते अनेक गावात श्रीधरांच्या आख्यानक कवितांची पारायणे मी ऐकली आहेत मार्गी पंडिती  कविता वृत्तकेंद्री आणि शब्दकळा केंद्री तर देशी पंडिती  कविता ही वृत्तकेंद्री पण आशयकळाकेंद्री ! मोरोपंतांनी मीटर वापरले तेही आर्या जे संस्कृत होते आणि फक्त ब्राम्हणांनाच तेही संस्कृत येणाऱ्या कळायचे  त्यामुळेच संस्कृत ब्राम्हणांच्यात मोरोपंतांची लोकप्रियता वाढली तर देशी ब्राम्हण (उदा देशस्थ व कऱ्हाडे ब्राम्हण) व ब्राम्हणेतरांच्यात  श्र
उदारमतवादाचा अस्त  आणि पुतीन श्रीधर तिळवे नाईक रशियाचे प्रमुख पुतीन ह्यांनी उदारमतवादाचा अस्त झालाय अशी घोषणा केल्याने जगभर खळबळ माजली आहे साहजिकच ह्या विषयावर चर्चा सुरु होणे अटळ आहे उदारमतवादाचे बीज जगात प्रथम शैवांनी टाकले शैवांचा बहुउपायवाद म्हणजे मोक्ष व निर्वाण हे केवळ एकाच उपायाने मिळते ह्या एकउपायवादी  प्रवृत्तीला दिलेले आव्हान आहे जैन आणि बौद्ध ह्यांनी फक्त ज्ञानोपायानेच मोक्ष वा निर्वाण मिळते असे सांगितले तर  ज्यू ख्रिश्चन इस्लामने फक्त भक्तीचा एकांगी आग्रह धरला शिवांनी मात्र सुरवातीपासूनच भक्तोपाय ज्ञानोपाय कर्मोपाय तंत्रोपाय योगोपाय अश्या सर्वच उपायांनी मोक्ष वा निर्वाण मिळते असे सांगितले आणि सर्वच उपायांचा सन्मान केला पुढे वैज्ञानिक युगात यूरोपात सृष्टीयतेत उदारमतवादाने असेच एकमतवादाला आव्हान दिले आणि विविध विचारप्रणालींना आयुष्यात जागा दिली पाहिजे असे सांगितले त्यातूनच धर्मनिरपेक्षवाद जन्मला आणि अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गॅरंटी देण्यात आली दुर्दवाने मुस्लिम राज्यकर्त्यांनी आणि राजवटींनी धर्मनिरपेक्षतावाद स्वीकारला नाही आणि त्यातूनच आजचा क्रायसिस जन
आदरणीय अरुंधतीजी नमस्कार ! ह्या प्रोजेक्ट्चा वेग हा सामुदायिक प्रयत्नावर अवलंबून आहे त्यामुळे कोण कोण कुठे आहे हे स्पष्ट होत जाईल . माझे इंग्लिश आमच्या गावरान भाषेत सांगायचं तर डबडा आहे नितीनने प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला होता एकट्या नितीनवर भार टाकता येईल का ? तो त्याचे काम चोख करेल अशी मला खात्री आहे इतरांशी माझे बोलणे झालेले नाही पण प्रणवला अनुवादाचा अनुभव असल्याने तो इंग्लिश अनुवादाबाबत काही काम करू शकेल असे वाटते मी इंग्लिश ट्रान्सलेशनला मदत देण्याचा प्रयत्न करू शकतो मी प्रयत्न म्हणतोय कारण तस्लिमाच्या तीन कवितांचा अनुवाद तोही हिंदीतुन मराठी एव्हढाच माझा अनुभव त्यामुळे ह्या विषयात अधिकारवाणीने बोलण्याचा मला अधिकार नाही तुम्ही हातात घेतलेलं काम शिव धनुष्यासारखे झालेले दिसत असले तरी ते हळूहळू पेलेल अशी मला खात्री वाटते मला प्रामाणिकपणे वाटते कि इंग्लिश अनुवाद तुमच्याइतका चांगला कुणी करू शकणार नाही ज्यांना अडचणी कळतात त्यांनाच त्यांच्या निवारणाचे मार्गही सापडायला लागतात अशा कित्येक कविता आहेत ज्या इंग्लिशमध्ये सहज होऊ शकतील असे मला वाटते मी माझ्या बाजूने मला शक्य असले
हरणे सहन झाले नाही कि आपणाला परकीय हात दिसू लागतो इंग्लंडविरुद्धचे हरणे हे नवे उदाहरण इंग्लंडने काल आपल्या स्पिनचा कचरा केला बुमराह कसा शांतपणे खेळायचा आणि बाकींच्यांवर कसे तुटून पडायचे ह्याचा नीट अभ्यास करून इंग्लडचे खेळाडू उतरले भारतीय अभ्यास न करता उतरले आम्ही काय भक्कमच आहोत ह्या थाटात इंग्लंडच्या कप्तानाने जो भारताला हरवेल तो विश्वचषक जिंकेल असे सामन्याआधी सांगितले होते तिथेच हे लोक अभ्यास करून उतरणार हे स्पष्ट होते रेग्युलर स्पिनर्सची धुलाई होत असतांना केदार जाधव जास्त वापरायला हवा होता आणि जर त्याला वापरायचे नसेल तर मग घेतला कशाला ? विराट कोहली मला कप्तान म्हणून कधीच ग्रेट वाटला नाही ढापणं लावलेली स्ट्रॅटेजी तो राबवत असतो (अपवाद तो धोनीचा सल्ला घेतो तेव्हा अफगाणिस्तानविरुद्ध शेवटच्या दोन षटकात ते दिसले होते  )कालचा सामना ह्याचे उत्तम उदाहरण खरेतर आयपीएल मध्ये विराटच्या कॅप्टनशिपची लक्तरे निघाली होती टीम वाईट असली कि त्याचे काहीच चालत नाही माझं स्वतःच स्पष्ट मत असं कि भारतीयांना नेतृत्वाचा बुद्धयांक कळत नाही आणि मग टीमच्या खेळाचे श्रेय आपण नेतृत्वाला देतो खरे नेतृत्व कच्चा संघ