Posts

Showing posts from January, 2021
 शंकर सारडा :चौथ्या नवतेला प्रोत्साहन देणारा पहिला ज्येष्ठ समीक्षक  नव्यांची अक्षर चळवळीत माझा लेख आला आणि सगळीकडून टीका सुरु झाली ही चौथ्या नवतेच्या चळवळीची जाहीर सुरवात होती जे आतापर्यंत पर्सनल होते ते आता पब्लिकमध्ये आले अरुण म्हात्रेने लेख छापला पण विरोधही केला हा विरोध पुढे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्धही झाला त्यावेळी  नव्यांची अक्षर चळवळ हा एक नव्या कवींना मोठाच आधार होता आणि नेमका तोच चौथ्या नवतेच्या चळवळीला पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झाले म सु पाटलांनी अनुष्टुभच्यावतीने आधीच नकार दिला होता सत्यकथा बंद पडली होती आणि अनियतकालिकांच्या चळवळीने दम तोडला होता अशावेळी आता आपणच हातपाय हलवायला हवे हे स्पष्ट झाले आणि मी सौष्ठव नावाचे अनियत्कालिक सुरु करायचे निश्चित केले भालचंद्र कुबल ह्या माझ्या परममित्राने ह्या निर्णयाला केवळ पाठिंबा दिला नाही तर अंकाची प्रकाशक म्हणून जबाबदारी स्वीकारली आशुतोष आपटे , संतोष क्षीरसागर (हा आता जेजेचा डीन झालाय ) ह्यासारखे जेजेईट व मंगेश बनसोड  आल्हाद भावसार महेश म्हात्रे ह्यांच्यासारखे हॉस्टेलाईट जॉईन झाले पुढे कालनिर्णयच्या (बहुधा जयराज) साळगावकरांनी अंक छा
कवींनी गद्य वाचावे श्रीधर तिळवे नाईक  जगाचा वाङ्मयीन इतिहास एक गोष्ट नेहमीच सांगत आलाय ती म्हणजे कुठल्याही नवतेची सुरवात प्रथम ज्ञानाच्या क्षेत्रात होते मग साहित्यात ती प्रथम कवितेत प्रकट होते मग कथेत मग चित्रशिल्पकलेत मग कादंबरी नाटकात मग सिनेमा टीव्ही वेबमधे  साहित्याच्या क्षेत्रात एखादी नवता कवितेत अवतरल्यावर नंतरच्या कविंच्याकडून एक साधी अपेक्षा असते कि त्यांनी आधी ती नवता पचवावी पण अनेकदा असे होत नाही आमच्या पिढीने साठोत्तरी देशी नवता पचवणे आवश्यक होते बहुतांश लोकांनी हे न करता साठोत्तरीचा देशीवादी हिंदू नवबौद्ध हमरस्ता पकडला  भालचंद्र नेमाडे अरुण कोलटकर नामदेव ढसाळ दिलीप चित्रे रघु दंडवते ह्यांनी ती निर्माण केली  ,राजन गवस , रंगनाथ पाठारे श्याम मनोहर वृंदावन दंडवते ह्या सारख्या लोकांनी कादंबरीनाटकात ही देशी नवता विस्तारली  समांतर केली आणि सदानंद देशमुख इंद्रजीत भालेराव आसाराम लोमटे कृष्णान खोत ह्वैग्रेंनी ती प्रस्थापित केली  प्रॉब्लेम तेव्हा निर्माण झाला जेव्हा कादंबरीत आलेला आशय काही कवींनी कवितेतून प्रकट करायला सुरवात केली आता ज्यांनी गद्य वाचले आहे त्यांना ह्यात काय रस येणार ?
 यशवंत मनोहर आणि सरस्वती श्रीधर तिळवे नाईक  उथ्यानगुंफा हा माझ्या कॉलेजजीवनातला एक आवडता काव्यसंग्रह कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही ही त्यातली गाजलेली ओळ पु ल देशपांडेंच्या लेखामुळे ती अधिकच सर्वत्र पसरली त्यातला लखलखाट पुढे डेव्हलप झाला नाही कदाचित जीवनायन अपवाद आंबेड्करांच्यावर नामदेव ढसाळ ह्यांनी असं काही जबरदस्त लिहून ठेवलंय कि त्याच्या आसपासही कोणी जाऊच शकत नाही यशवंत मनोहर त्याला अपवाद नाही त्यामुळे त्यानंतरचे यशवंत मनोहर हे तितकेसे अपील नाही झाले सौंदर्यशास्त्रावरचे त्यांचे लेखन नक्कीच दखलपात्र विशेषतः मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राची त्यांनी केलेली उलटतपासणी सौंदर्यशास्त्रावर लिखाण करणारा दलित हा ब्राह्मणी असतो अशी गैरसमजूत असणाऱ्या दलितांच्यात त्यांना ब्राम्हणी समजणारे काही महाभाग असावेत  साठोत्तरी फुलेआंबेडकरवाद दोन  मार्गाने जातो  फुलेकेंद्री फुलेआंबेडकरवाद  आंबेड्करकेंद्री फुलेआंबेडकरवाद  यशवंत मनोहर हे दुसऱ्या मार्गाने गेलेले ! फुले आंबेडकरवादाची त्यांनी केलेली आंबेड्करकेंद्री मांडणी सातत्याने पुढे आलेली !  नामदेव ढसाळने कवितेत अनेकांना खुजे करून टाकले त्यात एक यशवंत मनो
 इब्सेन आणि बेकेट श्रीधर तिळवे नाईक  सर्वसाधारणपणे मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत मी दरवर्षी इजम शिकवतो पण ह्यावर्षी ऐनवेळी मंगेश बनसोड ह्याने दोन लेखक शिकवण्याची दोस्तीगळ घातली आणि मला हेन्रिक इब्सेन आणि सॅम्युएल बेकेट हे दोन लेखक शिकवण्याची वेळ आली आजारपणामुळे तयारीला वेळच मिळाला नाही आणि कमी होत चाललेल्या स्मरणशक्तीच्या जीवावर एक तासाची आठ व्याख्याने देण्याची वेळ आली पीएचडीला केलेले संशोधन ऐनवेळी स्मरत गेले आणि व्याख्याने रंगली एखादा लेखक प्राध्यापक लोक कसा शिकवतात हे मला माहित नाही पण दोन तास त्या लेखकाची क्रिएटिव्ह प्रोसेस उलगडायची आणि दोन तास प्रत्यक्ष कलाकृती असे काहीतरी झाले हेन्रिक इब्सेनची क्रिएटिव्ह प्रोसेस विलक्षण !अस्तित्ववादाचा प्रभाव किर्केगार्द वाचून त्याच्यावर पडला आणि पन्नासाव्या वर्षी त्याला त्याचे क्रांतिकारी नाटक सापडले आयुष्यभर आपल्या ईल्लेजिमेंट मुलाच्या परतण्याच्या  शक्यतेचे भय त्याचा कायमच पाठलाग करत राहिले नित्शेच्या ट्रॅजेडीवरच्या विचारांनी ग्रीक ट्रॅजेडीविषयीचे त्याचे आकलन बदलले आणि शेक्सपियरन ट्रॅजेडीतून त्याची प्रतिभा मुक्त झाली लिखाणाचा ढाचा कधी वास्त
 ग्रेस , बालम आणि रोमँटिक श्रीधर तिळवे नाईक  बालम गेल्याविषयी फार शोक कुणाला झाला नाही कारण तो काही स्वयंभू प्रज्ञेचा कवी न्हवता ज्यांना स्वतःची कल्पनाशीलता सापडली पण ज्यांना त्या कल्पनाशीलतेचे स्वायत्त दर्शन बनवता आले नाही अश्या ग्रेसच्या सावलीत किंवा रोमँटिक भाषेत सांगायचे तर ग्रेसच्या हंसध्वनित वाढलेल्या कवींच्या मांडणमंडीतला तो एक घायाळ अन उदास पक्षी होता  मुळात ग्रेसचे कुळ सुरु होते ते पंडिती कविंच्यापासून ! मार्गी व देशी वृत्तांच्यावर कमालीचे प्रभुत्व , अनेक शब्द जोडून नवीन शब्द तयार करण्याचे कौशल्य ह्यांच्या आधारे उभी राहिलेली ही पंडिती शब्दकळा मराठी साहित्यावर अवकळा आणणारी होती व तिचे जीवनाशी नाते तुटलेले होते मराठी संस्कृतीतील उत्तर पेशवाईची बामणी व्रतवैकल्याची पुराणप्रधान कथांची शाळा  मराठी साहित्यातील दरबारी दालनात पेश केली गेली आणि शब्दकळा व प्रतिमाविलास म्हणजे साहित्य समजणारे एक स्कूलच सुरु झाले ह्या स्कूलचे प्रधान अध्यापक कवी मोरोपंत होते पंतपंडित कवींचे सरपंत ! ह्याच काळात थोडेसे उशिराने सुरु झालेले उर्दू व इंग्रजी भाषेचे रोमँटिक स्कुल स्पॉंटनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिल