Posts

Showing posts from July, 2018
मेघना भुस्कुटे ह्यांचा प्रयत्न आणि त्याचे यशापयश कुठल्याही साहित्याच्या  काळकेंद्री अभ्यासाच्या दोन महत्वाच्या पद्धती असतात १ नवताकेंद्री १ पिढ्याकेंद्री ह्यातील पिढयंकेंद्री अभ्यासपद्धतीत पिढ्या कुठल्या तारखेपासून सुरु करायच्या आणि कुठे त्यांचा अस्त धरायचा हा एक कळीचा प्रश्न आहे साठोत्तरी पिढीत प्रथम हा प्रश्न केंद्रीय स्थानी आला आणि मराठी आधुनिक साहित्याचे १ स्वातंत्र्यपूर्व २ स्वातंत्र्योत्तर आणि ३ साठोत्तरी अशा तीन कालखंडात वर्गीकरण झाले आणि पुढे नव्वदोत्तर पिढीने स्वतःची नव्वदोत्तरी पिढी असे बारसे केले . प्रत्यक्षात दिलीप चित्रे सारख्यांना त्यांची पिढी १९५५ नंतर सुरु झाली असे वाटे मात्र त्यांनी पंचावन्नोत्तरी पिढी अशी काही संकल्पना मांडली नाही मला स्वतःला मात्र अलीकडे १ पंचेचाळीसोत्तरी २ पंचावन्नोत्तरी पिढी ३ पासष्टोत्तरी पिढी ४ पंचाहत्तरी पिढी ५ पंच्याऐंशोत्तरी पिढी ६ पंचान्नवोत्तरी पिढी ७ दोनहजार पाचोत्तरी (दोपाचोत्तरी )पिढी ८ दोनहजार पंधरोत्तरी (दोपंधरोत्तरी )पिढी अशी पिढ्यांची मांडणी  अधिक योग्य वाटते मेघना भुस्कुटे ह्यांनी गेल्या काही वर्षात दमदार काम केल्याने मी