Posts

Showing posts from July, 2020
फेक आणि मायेचे तीन पदन्यास भारतात माया माहित नसलेला माणूस दुर्मिळ !! शैवांच्यात मायेचे तीन पदन्यास महत्वाचे १  मूळ पदन्यास : माया म्हणजे वास्तव सत्य आणि माया असे हे ज्ञानिक जोडपे सत्य शून्य तर त्यातून असणारी माया अनंत जी अवकाश आणि काळ ह्यासारख्या डायमेन्शन्स म्हणजे मितींनी कैद ! मितींनी बद्ध सत्य ते माया २ दुसरा पदन्यास ह्या मायेची  माया म्हणजे साक्षात आपली जैविक आई तिची ममता ही माया लावते ३ तिसरा पदन्यास असा आभास जो दुसऱ्या पदन्यासातून  जन्मतो ममतेतून जन्मतो त्याचे नाव ममत्व ममतेला वास्तवाचा आधार असतो ममत्वाला तो नसतो ते वास्तवापेक्षा अधिक वास्तव आहे पण जे  सत्य  नाही आजच्या मीडियात ह्या मायेचा सर्वाधिक बोलबाला आहे सत्य महत्वाचे नाही माया महत्वाची कारण मायेला टी आर पी आहे माया चटकदार असणे ही मायेची शक्ती आहे सुवर्णमृग नावाची गोष्ट जगात नसते ही गोष्ट का सीतेला माहीत नसते पण समोर सतत जाहिरातीसारख्या त्याच्या येरझाऱ्या सुरु झाल्यावर सुवर्णमृग खरा वाटायला लागतो हा खरा वाटायला लागणारा सुवर्णमृग ही माया ह्यातून निर्माण होतो माया पुरवण्याचा हट्ट आकाश मागण्याची तऱ्हा मग राज्यकर्ते अस
फेक आणि रिस्पॉन्सिबिलिटी श्रीधर तिळवे नाईक पोस्टकॉर्पोरेटीझमने  ब्रँड ही संकल्पना इतक्या प्रचंड प्रमाणात संपूर्ण व्यवस्थेवर लादली कि व्यक्तिगतता त्याखाली चिरडली जाऊन मेली ह्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले मुख्य म्हणजे १ श्रेय कुणाला २ आणि कायदेशीर जबाबदारी कुणाची ह्या प्रश्नाचे उत्तर त्या त्या कॉर्पोरेट कम्पनीला श्रेय व कायदेशीर जबाबदारीही त्या कार्पोरेट कम्पनीची असे देण्यात आले आहे पण उत्तराधुनिकतेचा अस्त होत असतांना आणि जालतेचा आणि जालीयतेचा उदय होत असतांना ह्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा नव्याने बघणे आवश्यक झाले आहे फिल्म इंडस्ट्रीत अनेक लेखक दिग्दर्शक संगीतदिग्दर्शक सर्रास चोऱ्या करतात आणि चित्रपटसाक्षर नसलेल्या निर्मात्यांना हे लोक सर्रास हे माझे ओरिजनल काम म्हणून सर्रास गंडवतात ही चोरी पकडली जाते तेव्हा निर्माते फसतात कारण कायदेशीर जबाबदारी त्यांच्यावरही पडते अनेकदा मूळ लेखक संगीतदिग्दर्शकाला पैसे देऊन निर्माते ही चोरीची प्रकरणे मिटवतात आणि निर्मात्याचा दोष नाही म्हणून बहुतांश कलावंत पैसे घेऊन सोडून देतात चोरी पचते आणि चोर पुन्हा चोरी करायला मोकळे होतात साहजिकच अलीकडे मी बॉल
शंकर कलेवर का बोलले आणि बुद्ध का बोलला नाही ? श्रीधर तिळवे नाईक कुठल्याही काळातले सिद्धबुद्ध हे त्यांच्या आसपासच्या माणसांशी त्यांना ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत बोलतात भगवान शंकर फारच सिम्पल आणि पशुपालक लोकांशी बोलत होते अपवादात्मक वेळा शेतकरी लोकांशी जी उदयाला येत होती भगवान शंकरांचा वेगळेपण असे कि ते स्वतः अष्टपैलू कलावंत होते साहजिकच सर्व कलेविषयी त्यांनी सातत्याने चर्चा केलेल्या आहेत आणि त्यातूनच नाट्यवेद तयार झाला आणि नाट्यशास्त्रही ! इतर सिद्धबुद्धांना अशी चर्चा करावी लागली नाही कारण ते कलावंत न्हवते बुद्धाने तर कलेला मनाईच केली आहे शंकर नाचतात म्हणूनही त्यांची टवाळी करणारे लोक होते आणि आहेत अनेक नवबौद्ध निर्वाण प्राप्त झालेला मनुष्य नाचू कसा शकतो म्हणून प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्या प्रश्नामागे बौद्ध ढाचा असतो भक्तीत कविता खूप महत्वाची होती म्हणून ज्ञानेश्वर तुकाराम शब्दाची चर्चा करतात त्याउलट नानक रचायचे संगीत रचना करायचे आणि गायाचेही परिणामी पंजाबी शिखांच्यात संगीत दिगदर्शन व गायन महत्वाचे झाले आजही सर्वाधिक संगीतकार व गायक पंजाबी आहेत त्याचे मूळ गुरु नानकांच्यात आहे भ
नेमाडे आणि मूल्ये नेमाडे ह्यांनी पॉप्युलर प्रकाशनाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय मूल्यांना साफ नकार देऊन मूल्ये देशीच असतात आणि देशपरत्वे ती बदलतात असा पोस्टमॉडर्न आग्रह धरला मी गेली कित्येक वर्षे अशी मराठी म्हणावीत अशा मूल्यांची वाट पाहतोय पण नेमाडे काही ती सांगायला तयार नाहीत राजकीय सामाजिक आर्थिक समता हे युरोपियन मूल्य आहे तर अध्यात्मिक समता वारकऱ्यांच्या वारीत समता पण गावात वस्तीत प्रकट आल्यावर विषमता हे देशी मराठी मूल्य आहे तर इथं देशीवादी म्हणवणारे लोक हे देशी मूल्य स्वीकारायला तयार आहेत का आणि नसेल तर उगाच युरोपियन मूल्यांच्यावर जी आता जागतिक झालेत उगाच टीका करू नका राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य हेही असेच युरोपियन मूल्य आहे मराठीत त्याचा मागमूस नाही असेल तर दाखवा आणि हो तुकारामांचं नाव घेऊ नका तुम्ही त्यांना वैकुठंसदनी पाठवलेले आहे बरं त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही ते स्वीकारलंय असं दिसत नाही मी वाट पाहतोय तुमच्या देशी मूल्यांची कोव्हीड हाताळण्याची देशी मूल्यव्यवस्था सांगा कि थाळ्या वाजवणं आणि रस्त्यावर येणं हे देशी मूल्य आहे ? मी वाट पाहतोय आणि हो मोक
नृत्य भाग १ श्रीधर तिळवे नाईक मी सरोज खान ह्यांच्यावर लिहिलेल्या पोस्टवर आशुतोष दिवाण ह्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे "मला नाचता पण येत नाही आणि सिनेमे पण फार पहात नाही. पण नाच करणे व नाच बसवणे याबद्दल मला कुतुहल आहे. १)नाचायचा एक जीन असावा असे वाटते.ज्यांना आपल्या शरीराबद्दलचा काॅन्शन्स पूर्ण विसरता येतो,आपण माकडासारखे नाचत नाही आहोतना अशी शंका येत नाही तेच नाचू शकतात असे वाटते. २)वैद्यकीय व्यवसायात फार स्पर्धा असते.त्यात ऊच्च लेव्हलला पुढे रहायचे तर पुढची पुढची सर्जीकल टेकनीक्स मास्टर करुन काॅन्फरन्समधे शानमधे प्रेझेंट करणे हा सर्वात यशस्वी राजमार्ग आहे.आपोआप नाव होते,तुमचा रथ उंचावरुन,रटच्या वरुन उडू लागतो,काम वाढत राहते.अश्या काॅन्फरन्सेस मधे येणारे. सामान्य सर्जन्स मौजमजा सुद्धा करायला येत असतात(अडाॅक्टरांना कल्पना येणार नाही पण सर्जीकल काॅन्फरन्सेस ॲबसोल्यूटली ग्रूएलींग असतात.दुपारनंतर अती अभ्यासाने मला मळमळत असते).ते रात्री बॅंक्वेटला माफक पिऊन नाचत असतात.तर हे असे फ्रंटरनर सर्जन असतात ना ते मी पण कसा तुमच्यासारखाच आहे(भारी सर्जन असलो तरी)हे सामान्यांना सां
Image
मनमोहन आणि हिंदुत्ववाद कोल्हापूर स्कूलमध्ये जे काही कवी झाले त्यात मनमोहन नातू ह्यांचे नाव महत्वाचे आहे त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव गावी १९११ साली झाला कोल्हापूर स्कूलमध्ये संत परंपरेत बहिणाबाई रोमँटिसिजम मध्ये रेंदाळकर हे कवी झाल्यानंतर आधुनिक कवितेचे जे तीन प्रवर्तक झाले त्यात मर्ढेकर आणि मुक्तिबोधांच्या बरोबरीने आपणाला कोल्हापूर स्कूलमधील मनमोहनांचे नाव घ्यावे लागते पुढे करंदीकर , सारंग आणि अरुण कोलटकर ही नावे येतात एक प्रकारचा धुसमुसळेपणा आणि रग हे कोल्हापुरी स्कूलचे वैशिष्ट्य मनमोहनांच्यात ओतप्रोत भरलेले आहे तरीही त्यांचे नाव घेतले जात नाही कारण ते हिंदुत्ववादी मानले जातात कारण त्यांनी सावरकरांच्यावर लिहिलेली  दगडाची पार्थिव  भिंत ही कविता मी कागद झाले आहे चल लिही असे ती वदली ही त्यातील एक दमदार ओळ !  ही एक दमदार कविता असल्याने तिचा प्रभाव व्यापक पडला आणि बिचारे मनमोहन हिंदुत्ववादी झाले ते कायमचे ! प्रश्न असा कि मग हिंदुत्ववाद्यांनी त्यांना का आपला कवी म्हणून पुढे आणले नाही तर त्याला कारण गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी गांधिजिंच्यावर लिहिलेली कविता जी