Posts

Showing posts from January, 2018
गेली तीन वर्षे इझम शिकवताना आपण फेमिनिझम शिकवत नाही आहोत ह्याची विलक्षण बोच लागून राहायची त्यामुळे मी पहिल्या वर्षापासूनच  मंगेशच्या (मंगेश बनसोड ) मागे लागलो होतो कि यार आपल्या विभागात  मुली येतात आणि आपण त्यांना स्त्रीवाद शिकवत नाही हे काही बरे नाही सरतेशेवटी मागील आठवड्यात चर्चा होऊन आणि विद्यार्थिनींची मागणी लक्ष्यात घेऊन आजपासून  चौथी नवता आणि स्त्रीवाद ह्या टायटलखाली सगळ्या प्रकारचे स्त्रीवाद शिकवायला सुरवात केली गेली कित्येक वर्षे ताराबाई शिंदे ह्यांच्या स्त्रीपुरुष तुलना ह्या पुस्तकावर सविस्तर बोलायचे होते ते बोलून झाले . व्याख्यान इतर इझमच्या व्याख्यानाप्रमाणे रंगले पण अनपेक्षितपणे मुलींच्याइतकाच प्रतिसाद मुलांचाही होता नवीन पिढी पुरुषसत्ताकवाद नाकारेल अशी स्पष्ट चिन्हे दिसतायत . मंगेश बनसोडचे औपचारिक आभार ते मानण्याची गरज नाही तरीही ! आणि विद्यार्थ्यांचेही !मंगेशला तीन वर्षाचे मैत्रीवचन दिले होते त्याची परिपूर्ती ह्या आठवड्यात होईल . नवनवीन विद्यार्थ्यांचाबरोबर ही वर्षे कशी गेली ते कळलेही नाही . प्राध्यापकगिरी मी एन्जॉय करेन असं वाटलं न्हवतं पण केली . मंगेश बनसोड , श्यामल गर