Posts

Showing posts from August, 2020
आमच्या पिढीच्या गोची श्रीधर तिळवे आमच्या पिढीची सर्वात मोठी गोचि कुठली असेल तर ती म्हणजे एकाचवेळी आमची पिढी नव्या इंटरनेट क्रांतीला जन्म देत होती आणि त्याच वेळी आम्हीच निर्माण केलेल्या मीडियाला वापरून कर्मठ लोकांनी निर्माण केलेला धार्मिक हैदोशी अनुभवत होती  आधीच्या पोस्टमॉडर्नने रिटर्न टू ट्रॅडीशन आणि रिलीजनचा जो अजेंडा राबवला त्याला पूरक हा धार्मिक हैदोस होता आणि ह्या हैदोसापुढे आम्ही ठाकल्यामुळे आम्हाला त्या हैदोसाचे काही करणे भाग होते त्यातून चार  पर्याय उभे ठाकले  १ धर्माला व परंपरेला शरण जा व पोस्टमॉडर्न वा देशीवादाची मान्यता मिळवा आणि ह्या सिस्टीममध्ये सेटल व्हा  २ ह्यातून अनिष्ट हे पुर्णं नष्ट करण्यासाठी हल्ले करून नवे धर्म निर्माण करा  ३ सर्व धर्मं नाकारा व नवे धम्म  व नवे अध्यात्म निर्माण करा  ४ धर्म व अध्यात्म संपूर्ण नाकारा  आमच्या पिढीत ९९ टक्के लोक पहिल्या मार्गाने गेले आणि विविध जागी सेटल झाले एक टक्का संघर्ष करत राहिले मी तिसरा पर्याय निवडला व चौथी नवता आणि चिन्हआगमता (ह्यात चिन्हशैवता चिन्हासांख्यता चिन्हजैनता व चिन्हबौद्धता ह्या चारी येतात  )असा कम