Posts

Showing posts from April, 2020
आधुनिकतावादी  कवितेची  पायोनियरशिप आणि इतिहासाच्या बदलत्या पोझिशन्स श्रीधर तिळवे नाईक  लॉकडाऊनमुळे मिळालेल्या अधिकतम काळात काही अधिक डीजीफेऱ्या मारल्या तर आधुनिक कवितेचे प्रवर्तक म्हणून टी एस एलियटचे(इलियट)  नाव  घेणाऱ्या दोन पोस्ट वाचल्या आणि आश्चर्य वाटले . मर्ढेकरांनी हे म्हंटले तर समजू शकते कारण त्यांच्या सिलॅब्समध्ये हे शिकवले जात होते पण मराठीतील आत्ताच्या पिढीनेही हे म्हणावे ? हे लोक साहित्याचा कोणत्या काळातला इतिहास वाचतात  ? युरोपियन साम्राज्यवादी राजवटींच्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वसाहतींच्यामध्ये डिक्लोनाईझ होण्याची प्रोसेस जगात सर्वत्रच सुरु झाली (गोव्यात स्वातंत्र्य उशिरा मिळाल्याने थोडी उशिरा )आम्हा गोवेकरांच्यावर पोर्तुगीज कवितेचा प्रभाव जास्त आहे म्हणजे बोरकरांची जपानी रमलाची रात्र ही कविता इंग्लिश परंपरेच्या प्रभावातून निर्माण होणे अशक्य त्यामुळेच तीची जातकुळी स्पॅनिश पोर्तुगीजशी अधिक मिळत होती त्यामुळे  गोव्यासारख्या प्रदेशात डी -पोर्तुगिझाइझ (ह्या विषयावर पुन्हा कधीतरी सविस्तर !) तर  ब्रिटिश भारताच्या संदर्भात देशीवाद्यांनी कितीही बोंब मारली तरी १९५०
उत्तम बंडू तुपे : काट्यावरचे पोट शेवटी गेले श्रीधर तिळवे नाईक  उत्तम बंडू तुपे गेले मराठीतला पोटी संस्कृतीतील एक दमदार कादंबरीकार काट्यावर पोट ठेवत नाहीसा झाला साठोत्तरी पिढीने जसे मार्गी लेखक जन्माला घातले देशी लेखक जन्माला घातले तसे पोटी लेखकही जन्माला घातले मार्गी आणि देशी संस्कृतीत ज्यांचे पोट कापड आरोग्य शिक्षण आणि घर काट्यावरच असते अशा लोकांची संस्कृती म्हणजे पोटी संस्कृती होय मुंबईत धारावी संस्कृती किंवा अंडरवर्ल्ड किंवा शहरात वा गावात दलित आणि स्त्रिया ह्या ह्या पोटी संस्कृतीच्या पाया असतात तुपे हे गावातील दलित संस्कृतीतून शहरातील दलित संस्कृतीत दाखल झालेले लेखक होते ह्या दलित संस्कृतीचा पहिला गद्य अविष्कार ज्यांनी मोठ्या ताकदीने केला त्या अण्णाभाऊ साठेंच्या मांग गटातून ते आलेले होते पूर्वी गावात जसे महारवाडा असे तसे मांगवाडाही असे औद्योगिक संस्कृतीत चांभाराबरोबर त्यांचेही उद्योगधंदे मोडकळीस आले आणि ते देशोधडीला लागले चांभार गांधीजींच्या नेतृत्वाखाली दुकानं टाकून थोडेफार सेटल झाले आणि काहींनी तर गांधीजींच्या संदेशानुसार अधिक मोठ्या धंद्यात प्रवेश केला महारांनी शिका संघटित
करोना, निर्मितीप्रक्रिया आणि खंडकाव्य श्रीधर तिळवे नाईक निर्मितीप्रक्रियेचा वेग आणि ठहराव किती काळासाठी असावा हा एक सनातन वाद आहे ह्याबाबत माझे मत मी पुढीलप्रमाणे मांडले होते "अनुभव येणे आणि अनुभव व्यक्त करणे ह्यांच्यातील अंतर किती असावं ह्याविषयी कुणीही कुणाला उपदेश करू नये एखादा कवी अनुभव येण्याबरोबर ताबडतोब व्यक्त झाला तर तो प्रतिक्रियावादी असतो असा कुणाचाच  गोंडस गैरसमज नसावा एखाद्या कवीची अनुभव रिचवण्याची एक पद्धत असेल आणि ती स्लो असेलही पण म्हणून तीच योग्य हे कुणी ठरवलं आणि कोण ठरवणार ? " दुसरी गोष्ट एखादा फास्ट मोशनवाला असला तरी प्रत्येकवेळी तो फास्टमोशनवाला राहील ह्याची काय खात्री आणि जो स्लो  मोशनवाला असला तरी प्रत्येकवेळी तो स्लो  मोशनवाला राहील ह्याची काय खात्री ? एकाच कलाकृतीतील अनुभवांच्याबाबत मोशन वेगवेगळी असू शकते तीव्रता अनुभव मुरून निर्माण होऊ शकते तशी तातडीमुळेही निर्माण होऊ शकते सर्वसाधारणपणे २०१४ पर्यंत माझी कवितानिर्मितीची प्रक्रिया ही धबधब्यासारखी होती आल्या कि एकदम  २४ २५ कविता किंवा  दीर्घकविता ! २०१४ नंतर अपवाद वगळता एखाद दुसरी छोटी वा दीर्
विचारप्रणाली ह्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टमध्ये फार महत्वाच्या असतात आणि होत्या त्यांची सुरवात ज्ञानकारणापासून व ज्ञानकेंद्री विचारप्रणालींनीपासून झाली पायोनियर होते रिचर्ड बेकन व  फ्रान्सिस बेकन रिचर्डने निसर्गवाद आणला तर फ्रान्सिसने  ज्ञानात इंद्रियप्रामाण्यवाद आणला त्याला शह म्हणून देकार्तने भूमिती व गणितकेंद्री बुद्धिप्रामाण्यवाद आणला ह्या तीन विचारप्रणालीतून ज्याला आज आपण विज्ञान पद्धत म्हणतो तिची पायाभरणी झाली राजकारणात मग हॉब्ज , लॉक , व्हॉल्टेअर , मिल ह्यांच्यामुळे राजकीय विचारप्रणाल्या अस्तित्वात आल्या ऑगस्ट कॉम्ट दुर्खाइम ह्यांनी सामाजिक विचारप्रणाल्या मांडल्या क्लास हा शब्द यूरोपात प्रचलित तितकासा न्हवता त्याऐवजी इस्टेट वा तत्सम शब्द प्रचलित असे फर्स्ट इस्टेट चर्च दुसरी मोनार्च तिसरी ज्यात व्यापारी शेतकरी कारागीर पशुपालक होते ह्यातील व्यापाऱ्यांना प्रचंड पैसे मिळू लागले साहजिकच त्यांच्यात अस्वस्थता वाढायला लागली व्यापारात राजाराणीला द्यावा लागणारा शेअर प्रचंड होता (५० ते ८० टक्के ) रिस्क आम्ही घ्यायची आणि पैसे राजाराणीला हे का हा प्रश्न निर्माण झाला ईस्ट इंडिया कम्पनीने स्
कोव्हीडमुळं दोन व्यक्तींच्यामध्ये अंतर असणे गरजेचे आहे साहजिकच ह्या अंतराला काही अर्थवाही शब्द देणे गरजेचे होते माझ्या मते इंग्लिशमध्येच HEALTHY DISTANCE हा शब्दप्रयोग वापरला जायला हवा होता आणि मराठीत त्याला आरोग्य अंतर किंवा स्वास्थता/स्वास्थ  अंतर म्हंटल जायला हवं होतं म्हणजे हे अंतर कशासाठी हेही स्पष्ट झालं असतं सध्याचा काळ भाषिक निष्काळजीपणाचा काळ असल्याने फार खोलात न जाता SOCIAL DISTANCE हा शब्द वापरला गेला आणि कोणा ब्राम्हण्याने ग्रासलेल्या व्यक्तीने साथ सोवळे असा सुनील तांबे म्हणतात तसा घाणेरडा शब्द वापरला आणि वातावरण बिघडवून टाकले माध्यमांनी व लोकांनी  हा शब्द वापरू नये ही नम्र विनंती  श्रीधर तिळवे नाईक  ================================================================ चला तर आम्ही तुम्हाला देशीवादी म्हणतो जागतिक राहू द्या देशी मानदंड कोणते कि तेही तुम्हाला माहित नाहीत मग कशाच्या आधारे तुम्ही मूल्यमापन करता ? 
शरावती इंगवले गेली आमच्या कोल्हापूरच्या कविमंडळातील एकुलती एक कवयत्री आणि चित्रकार गेली संवेदनशीलता हाच स्वभाव होऊन गेला आणि बेपर्वाई हीच मुख्य वृत्ती झाली कि जे बेबंद आयुष्य जन्मते ते शरावती सहज जगली वेदना झाल्या नाहीत असं नाही पण हे एक पॅकेज डील आहे ह्याची तिला पूर्ण कल्पना होती माझ्यावर तिचं बेइंतेहा प्रेम होतं आणि ह्या प्रेमानं मला जशी भरघोस आंघोळ घातली (तिच्यावरच्या एका कवितेत ती तांब्यानं मला न्हाऊ घालत नाही ती थेट नदीने मला अंघोळ घालते असं मी म्हंटल आहे ) तसं अनेकदा मला अडचणीतही आणलं तिचा पती राजकुमार यादव माझा जानी दोस्त होता आणि त्या दोघांचे आंतरजातीय लग्न मी माझ्या घरातच लावले होते माझा ह्या लग्नाला विरोध असूनही ! शेवटपर्यंत मी ही दोस्ती निभावली आणि दोस्तीतली सर्व कर्तव्ये इमानदारीने पार पाडली राजकुमारचा ऐन तारुण्यात झालेल्या मृत्यूने ही दोस्ती त्रिकोणी न राहता द्विकोनी झाली आमची पिढी रजनीशांच्या पूर्ण आहारी गेलेली पहिली पिढी होती आणि राजकुमार शरावती आणि मी आम्ही तिघांनीही त्याकाळात जगण्यावर अनेक प्रयोग केले मी रजनीशांच्या मोहातून बाहेर पडलो पण हे दोघे बाहेर पडले नाहीत राज
अनुभव येणे आणि अनुभव व्यक्त करणे ह्यांच्यातील अंतर किती असावं ह्याविषयी कुणीही कुणाला उपदेश करू नये एखादा कवी अनुभव येण्याबरोबर ताबडतोब व्यक्त झाला तर तो प्रतिक्रियावादी असतो असा सलील वाघांचा गोंडस गैरसमज नसावा अशी आशा व्यक्त करतो सलील वाघांची अनुभव रिचवण्याची एक पद्धत असेल आणि ती स्लो असेलही पण म्हणून तीच योग्य हे कुणी ठरवलं आणि कोण ठरवणार ? ------------------ ही भाषा माझ्याबाबत असेल तर नो रिऍक्शन पण ही सलील वाघांच्याबाबत असेल तर ऑब्जेक्शन आहे वैचारिक मतभेद आपल्या जागी असावेत आणि ते कडाडून घालावेत पण भाषा थोडी जपून ही विनंती आहे आपले केस आता पांढरे व्हायला लागले महेश नाही का ? ================================================================ निर्मितीप्रक्रियेबाबत एक साधारण गोष्ट अशी दिसते कि अमेरिकन किंवा युरोपियन लेखक सगळं आयुष्य पणाला लावून एक शैली कमवतात आणि मराठी कवी ह्या सगळ्या लेखककविंच्या शैलीची नक्कल मारून बहुशैलीवादी होतात अशा बहुशैलीवादी नक्कलमारु लेखकाचा सांस्कृतिक गवगवाही होता अनेकदा तर स्वतःची अस्सल शैली घेऊन आलेला लेखक मराठीला चालत नाही त्याऐवजी नक्कलमारु लेखक लगेच
धूर्तता  , हुशारी , बुद्धिमत्ता ,प्रज्ञा आणि परमप्रज्ञा श्रीधर तिळवे नाईक अलीकडच्या काळात धूर्ततेला आणि हुशारीला म्हणजेच स्मार्टनेसला जरा जास्तच महत्व आल्याने धूर्तता , हुशारी , बुद्धिमत्ता ,प्रज्ञा आणि परमप्रज्ञा ह्यांच्यातील फरक सांगणे गरजेचे झाले धूर्तता म्हणजे येनकेनप्रकारे यश मिळवण्यासाठी व्यवहार व दुनियादारी ह्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी पुरेपूर वापर करणे धूर्त  मनुष्य म्हणजे धूर्ततेचा  पुरेपूर वापर करून त्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ! मी प्रयत्न करणारा म्हणतो कारण हल्ली बहुसंख्य लोक धूर्त  झाल्याने अंतिम लढाईत जो अधिक धूर्त  व नशीबवान तो विजयी ठरतो हुशारी मध्ये व्यवहार आणि दुनियादारी कशी हाताळायची हे कळणे धूर्ततेजवळ नीतिमत्ता नसते हुशारी मात्र कायद्याच्या चौकटीत सर्व बसवून किंवा कायद्यातील पळवाटांचा पुरेपूर फायदा घेणारी असते बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या गोष्टीला समजून घेण्याची आकलन करण्याची क्षमता ! व्यवहारात अनेकदा धूर्तता  आणि हुशारी बुद्धिमत्तेवर मात करते आणि धूर्त व हुशार माणसे बुद्धिमान माणसावर मात करतांना दिसतात कारण बुद्धिमान माणसाल