Posts

Showing posts from March, 2018
फेसबुकवरील पुरोगामी विचारवंत आणि राजकीय परिस्थिती ह्यांचा अनेकदा एकमेकांशी काडीचाही संबंध राहिलेला नाही हे अनेकदा सिद्ध झालेले आहे त्रिपुरा निवडणूक हे आणखी एक उदाहरण !स्वतःच्या आशांना स्वतःचे विचार आणि लोकांचेही विचार म्हणून प्रस्तुत करणाऱ्या महाभागांची संख्या इथे प्रचंड आहे . भारतीय मतदार हा स्वभावतः आयडियॉलॉजीत अडकून पडलेला मतदारच न्हवे तो स्वतःच्या तात्कालिक स्वार्थाला महत्व देणारा आणि त्याला झालेल्या तात्कालिक तापानुसार कलणारा मतदार आहे त्याला धर्माचे प्रचंड आकर्षण आहे भले मग कुणीही कितीही टीर्ऱ्या वाजवोत किंबहुना भारतीय आणि उत्तरपश्चिम आशियाचे ते वैशिष्ट्य आहे त्यामुळे खोमेनीने सुरु केलेली प्रतिक्रांती आज ना उद्या भारतात पोहचणे अटळ होते ह्याबाबतीत मी १९८३ पासून इशारे दिलेले आहेत नेमाडे हे अंतिमतः मोदींना जाऊन मिळतात हे तर मी कधीपासून सांगतो आहे साहित्य अकॅडमीच्या निवडणुकीत ते थोडेसेच दिसले जी माझ्या मते फक्त झाँकी आहे मार्क्सवाद कोसळणार हे तर माझे फार पूर्वीपासूनचे भविष्य ! फक्त एकच भविष्य बाकी आहे ते म्हणजे आंबेडकरवादी हिंदू समाजापासून तुटून मुस्लिमांबरोबरीने एकटे पडत जाणार हे ह