Posts

Showing posts from August, 2021
 चौथ्या नवतेच्या चार  कादंबऱ्या इंट्रो श्रीधर तिळवे नाईक  अडाहॉकाबानासुना आल्यानंतर काहींनी  विचारलं होतं इतकंच ? नुसत्या एका कादंबरीनं काय होतं ? मी म्हणालो होतो मी नुसती ओपनिंग करून देतोय पुढच्या खऱ्या खेळ्या पुढची पिढी खेळेल आणि आता चार कादंबऱ्या स्पष्टपणे आलेल्या दिसतायत (विश्राम गुप्तेच्या कादंबरीवर मी आधीच बोललो आहे त्यामुळे तिचा विचार मी इथे करत नाहीये ) नितीन वाघ ह्यांची व्हर्जिन  सुधीर देवरेंची मी गोष्टीत मावत नाही  प्रणव सखदेवची मेट्रोमॉल  अविनाश उषा वसंताची पटेली  ह्यातील सुधीरची कादंबरी अनपेक्षितपणे आली कारण तो ज्या अहिराणीच्या संदर्भात काम करतोय तिच्यातून तो असं काही लिहिल हे अनपेक्षित होतं . नितिनकडून तो भेटल्यापासूनच अपेक्षा होत्या प्रणव मात्र थेट फेसबुकवर (आम्ही अजून एकदाही भेटलेलो नाही ) त्यामुळं माहिती न्हवतं अविनाश कादंबरीकडे आस्तेकदम सरकेलच अशी अपेक्षा होती कारण त्याच्या कविता मी वाचल्या होत्या आणि त्याच्या कवितेच्या भाषेतच पटेलीच्या भाषेची शक्यता स्पष्ट दिसत होती  ह्या चारही कादंबऱ्या अल्टर्नेटीव्ह व्हिजन घेऊन येतात नितीन सेलेबिलिटीची , सुधीर गोष्टीची , प्रणव मॉलची