Posts

Showing posts from October, 2016
बा सी मर्ढेकर  मर्ढेकर हे व्यक्तिमत्व एक विलक्षण रसायन होते . एकीकडे जुन्या छंदात विशेषतः पादाकुलक अभंग ओवीत  ते नवी कविता लिहीत होते आणि दुसरीकडे नवे सोंदर्यशास्त्र रचत होते मराठीची एक परंपरा अशी कि दोन पातळीवर कोणी काम करत असेल तर त्या कवीची कविता साईडलाईन करायची आणि आणि त्याला समीक्षक म्हणून जास्तीत जास्त गाजवायचे मर्ढेकरांच्या बाबत हेच घडले आणि मराठीत त्यांच्या कवितांची चर्चा कमी आणि सौन्दर्यशास्त्राची चर्चा जास्त झाली ह्याला छेद साठोत्तरी पिढीने दिला आणि मर्ढेकरांच्या कविता चर्चेत आणायला सुरवात केली त्यांनी मर्ढेकरांचे सौन्दर्यशास्त्र साईडलाईन केले आणि कवितेतला आधुनिकतावादी आशय केंद्रस्थानी आणला . मात्र एका मुद्दयांवर चर्चा झालीच नाही तो मुद्दा म्हणजे कवितेत पक्के आशयवादी असणारे मर्ढेकर समीक्षेत आकृतिवादी का झाले ? ह्या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन कवितेच्या स्थितीत आहे . रोमँटिसिझमने भारावलेल्या त्या कालखंडात रोमँटिक भावना असली म्हणजे काम भागते अशी गैरसमजूत पसरली आणि रविकिरण मंडळाच्या त्याच त्याच प्रतिमा जुन्या  कढीला नवा ऊत आणावा तश्या नवा ऊत आणून सादर होऊ लागल्या आणि कवितां