Posts

Showing posts from March, 2020
मंगेश बनसोड जरतरचे प्रश्न काल्पनिक असतात आणि मी कल्पनांच्यात रमत नाही लोक जाती घेऊन येतात का ? तर कधी येतात कधी नाही काहीलोक आयुष्यभर येतात काही आयुष्यभर नाही तुझ्याबाबतीत जे काही झालं त्यात जातीयतेचा वाटा प्रभावी आहे हे तर उघड उघड मी मान्य केले आहे प्रश्न आहे उपाय काय तर सतत वर्ण जातिव्यवस्थेविरुद्ध ठाकणे शेवटी हजार वर्षाचा संस्कार आहे सहजासहजी जाणार नाही कचरा टाकायला दोन क्षण पुरतात साफ करायला दहा मिनटं कधी दहा तास लागतात त्यामुळे सफाई ही ह्या देशात सतत कन्विन्स करावी लागते तू दमून जाऊ नकोस कारण तू मी आपण सर्व सफाई कामगार आहोत आणि आपण दमून चालणार नाही अन्यथा गावच्या गावं शहराच्या शहरं कचऱ्याने भरून जातील आणि माणसं कचऱ्याखाली दबून ठार मरतील थकू नको मित्रा लढत राहू सफाई अटळ आहे कितीकाळ कचऱ्याचा वास घेत राहणार आहे ही व्यवस्था ? मुद्दा वैयक्तिक नाही सार्वजनिकच आहे तुझी केसही वैयक्तिक नाहीच आहे उलट आपली सामाजिक नीतिमत्ता किती किडलीये तेच त्यात दिसतं असो भेटीत बोलूच नेहमीप्रमाणं