Posts

Showing posts from 2016
साठोत्तरी लेखकांची समीक्षा करताना केवळ त्यांची स्तुती करणे ह्याला काय अर्थ आहे ? ह्यांच्या मर्यादाही दाखवायला नकोत काय ? समीक्षेचे काम जे झाले ते सांगणे एवढेच नसते तर काय झाले नाही हेही सांगणे असते . ऐंशोत्तरीनी नुसती फॅनगिरी केली म्हणून तर ह्यांचे लेखन साठोत्तरीत अडकून पडले जागतिकीकरणाचा रेटा आला नसता तर हे लेखक फक्त साठोत्तरीचे बांडगुळ म्हणूनच वाढले असते .  नव्वदोत्तरीत   चौथ्या नवतेचे  बंड आकांतून व्हायला होते पण  काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही चळवळ दिलीप चित्रेंच्या आणि इतरांच्या गळ्यात बांधली एडजस्टमेंटवादी प्रवृत्तीनी मराठी साहित्यिक चळवळीचा नेहमीच घात केला आहे . क्रांतिकारक म्हणून श्रेय हवे आणि ऍडजस्टमेन्टचा मेवा पण खायला मिळायला हवा अशी ही वृत्ती ! हिचे काय करायचे हाच खरा प्रश्न आहे . Anand Thatte  ह्यांनी  हे कुठल्याही काळाला लागू नाही का? असा प्रश्न विचारला म्हणून आणि राजेंद्र बाणाईत ह्यांनी त्यांच्या ह्या प्रश्नाला सहमती दर्शवली म्हणून ह्या प्रश्नाला हे माझ्या अल्प कुवतीनुसार दिलेले उत्तर  प्रत्येक कालखंड स्वतःची नवता घेऊन येतो जसे कि १८२० ते १८६० = सुधारणावादी नवत
कविता आणि छंद १ श्रीधर तिळवे नाईक   मराठीत कविता आणि छंद ह्यांचा सांगोपांग विचार अनेकांनी केला आहे ग्रेस आणि सुरेश भट ह्यांच्यामुळे मराठीत वृत्त आणि छंद ह्यांचा कमबॅक झाला विशेषतः ग्रेस ह्यांनी अनेक पारंपारीक वृते समर्थपणाने वापरून वृत्त आऊटडेटेड झालंय ही कल्पना मोडीत काढीत काढली निसर्गिय युगात माणसाने अक्षरवृत्ते आणि मात्रावृत्ते ह्यांचा शोध लावला पुढे विश्वीय युगाने त्यांचा आधीक विस्तार केला ह्यांना प्रथम  छेद दिला तो सृष्टीय युगाने ! विज्ञानाने भारावलेल्या ह्या युगात स्व महत्वाचा झाला आणि स्वछंद ही नव्या युगाची भाषाशैली झाली (freeverse ) विशेषतः शेक्सपियर ने स्वछंदाचा जबरदस्त वापर केला त्याची नाटके स्वछंदांच्या वापराची मिसाल बनली स्वछंदात छंद सोडला जात नाही मात्र मात्रांची गणिती मात्रा भिरकावली जाते मात्रिक लय सोडली जात नाही पण मात्रांचे अंकगणित भिरकावले जाते आणि स्व प्रमाण मानून रचनेत सैलपणा आला तर त्याला दुरुस्त न करता तो तसाच ठेवला जातो . उदाहरणार्थ  अनुष्टुभची मात्रिक लय सोडायची नाही पण मात्रा कमीजास्त झाल्या तरी त्याविषयी बॉदर करायचे नाही अशी ही प्रवृत्ती असते प्रतिसृष्टीय
बा सी मर्ढेकर  मर्ढेकर हे व्यक्तिमत्व एक विलक्षण रसायन होते . एकीकडे जुन्या छंदात विशेषतः पादाकुलक अभंग ओवीत  ते नवी कविता लिहीत होते आणि दुसरीकडे नवे सोंदर्यशास्त्र रचत होते मराठीची एक परंपरा अशी कि दोन पातळीवर कोणी काम करत असेल तर त्या कवीची कविता साईडलाईन करायची आणि आणि त्याला समीक्षक म्हणून जास्तीत जास्त गाजवायचे मर्ढेकरांच्या बाबत हेच घडले आणि मराठीत त्यांच्या कवितांची चर्चा कमी आणि सौन्दर्यशास्त्राची चर्चा जास्त झाली ह्याला छेद साठोत्तरी पिढीने दिला आणि मर्ढेकरांच्या कविता चर्चेत आणायला सुरवात केली त्यांनी मर्ढेकरांचे सौन्दर्यशास्त्र साईडलाईन केले आणि कवितेतला आधुनिकतावादी आशय केंद्रस्थानी आणला . मात्र एका मुद्दयांवर चर्चा झालीच नाही तो मुद्दा म्हणजे कवितेत पक्के आशयवादी असणारे मर्ढेकर समीक्षेत आकृतिवादी का झाले ? ह्या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन कवितेच्या स्थितीत आहे . रोमँटिसिझमने भारावलेल्या त्या कालखंडात रोमँटिक भावना असली म्हणजे काम भागते अशी गैरसमजूत पसरली आणि रविकिरण मंडळाच्या त्याच त्याच प्रतिमा जुन्या  कढीला नवा ऊत आणावा तश्या नवा ऊत आणून सादर होऊ लागल्या आणि कवितां
ESSENCE OF  TIKAHARAN : A CRITIQUE OF BHALCHANDRA NEMADE NATIVVISM: REALITY AND APPEARANCE Mr.Bhalchandra Nemade has retraditionalised the concept of NATIVISM against the concept of INTERNATIONALISM   borne out of anglo-marathi contact [In his language; compelled by ] .In his essay ‘Sahityatil Deshiyta’;now published in his book TEEKAS WAYANWAR   he has discussed it vehementally,and I think it’s milestone discourse in the history of Marathi Criticism . Hence it has become necessary to scrutinize every paragraph of this essay. [I.e. KHANDAN-MANDAN]The essay is the poweric slap on the face of SATYAKTHIY cock; who was trying to hatch the international eggs in the                magazinic poultry farm of Brahmanical Consciousness.The people who are not outinfluencing from their caste-conditioning were discussing internationalism. It’s like talking by a player about breaking the Olympic records who has not completed the 100 meters hurdles in his Mohalla’s competition. This dose of
बोधनशीलतेची नऊ अंगे आणि मराठी बौद्धिक कविता :श्रीधर तिळवे -नाईक बोधनशीलता ही शारीरिक , बौद्धिक , भावनिक , आत्मिक , काल्पनिक , कृतीक , कालिक ,अवकाशीक ,अवस्थिक अशा नऊ अंगानी अभिव्यक्त होत असली तरी फेसबुकवर आणि मराठी साहित्यात  अद्यापही भावनिक आणि काल्पनिक अंगाचा गवगवा आहे . रोमँटीसिझमने भावनिक काव्याचा आणि सररिऍलिझमने काल्पनिक काव्याचा गवगवा प्रचंड वाढवला आणि साठोत्तरी मराठी कवी ह्यां  गवगव्याच्या कचाट्यात सापडले . नवीन पिढी ह्यातून सुटलेली दिसत नाही . अपवाद मार्क्सवादी आणि दलित कवितेचा . प्रतिमावादी सत्यकथीय  समीक्षेने कायमच  भावनिक आणि काल्पनिक कवितेला  पाठिंबा दिला . ह्यांनी  मार्क्सवादी आणि दलित कवितेतील भावनिक आणि काल्पनिक कवितेला प्रमोट केले . फेसबूकवरील अनेक लोक हाच उद्योग करतायत आणि त्यामुळे नवीन कविता बौद्धिक कवितेपासून पळून जाणार कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे . हे होणे योग्य न्हवे कारण त्यातून कविता एकाच अंगाने वाढण्याचा धोखा निर्माण होतो . कवितेवरचा बौद्धिक अंकुश नष्ट झाला कि प्रतिमावादी साहित्याचे पेव फुटते हा इतिहास आहे . मला कवितांचे वर्गीकरण करतांना जाणवलेली गोष्
मेल्यानंतर फेसबुक  - श्रीधर तिळवे नाईक  मेल्यानंतर माझं फेसबुक अकौंट  उरेल तेव्हा  रोज पोस्ट टाकून त्याला जिवंत ठेव  मी सुमारे पांच हजार कविता लिहिलेत  रोज एक कविता टाक  आणि बारा वर्षांनी पुन्हा  रिपीट करत जाशील  तेव्हा  कोणालाही ती जुनी कविता आहे हे ओळखता येणार नाही  कारण बारा वर्षांनी कवींची एक नवी जनरेशन उदयाला आलेली असेल  चौथ्या नवतेवर माझी चार हजार क्वोटेशनस निघतील  जी तुला दहा वर्षे पुरतील  आणि दहा वर्षांनी पुन्हा पहिले रिपीट करत जाशील तेव्हा  कोणालाही ते ओळखता येणार नाही  कारण दहा वर्षांनी समीक्षकांची  एक नवी पिढी उदयाला आलेली असेल  कविता आणि समीक्षा पुरत नसेल तर  मी '' अ डॉ  हॉ का बा ना सु ना '' '' धर्म '' '' अर्थ '' ''मोक्ष '' '' ची '' अश्या महाकृतींची वीस हजार पाने मागे सोडली आहेत  आणि दिवसाला पाच पाने टाकलीस तरी  चार  हजार दिवस पुरतील  आणि चार हजार दिवसांनी  पुन्हा पांच पाने रिपीट करत जाशील  तर  कोणालाही ते कळणार नाही  कारण चार हजार दिवसां

DIVYAMARATHI SCIENCE AND LITERATURE

Image
जेव्हा प्रस्थापित तुमच्या लेखनाला चटकन स्वीकारून मान्यता देतात तेव्हा त्याचा स्पष्ट आणि स्वच्छ् अर्थ तुम्ही त्यांना फारसे च्यालेन्जींग वाटत नाही असा असतो . ·          alt="माझे शहर|Local" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1026"> माझे शहर ·          alt="महाराष्ट्र|Maharashtra" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1027"> महाराष्ट्र ·          alt="क्रिकेट|Cricket" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1028"> क्रिकेट ·          alt="देश|National" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1029"> देश ·          alt="ओरिजनल|DvM Originals" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1030"> ओरिजनल ·          alt="विदेश|International" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1031"> विदेश ·          alt="मनोरंजन|Entertainment" loading=lazy class=e86bf44b v:shapes="_x0000_i1032"&