नज्म आणि मराठी कविता श्रीधर तिळवे नाईक उर्दूतून मराठीत आलेले दोन प्रकार म्हणजे गझल व नज्म ! ह्यातील गझलवर अनेक लेख मी लिहिले आता इथे आपणाला थोडा नज्मचा विचार करावयाचा आहे माझ्या काव्यवाचनाची सुरवात गालिबपासून झाली पण मी आयुष्यात प्रथम नज्म वाचली ती साहिर लुधियानवीची तल्ख़िया मधली ! त्याआधी ऐकली होती ती अभिताभ बच्चनच्या आवाजातील कभी कभी चित्रपटात कभी कभी मेरे दिलमे खयाल आता हैं ही ! तल्ख़ियातील किसीको उदास देखकर ह्या नज्मने त्या वयात माझ्या डोळ्यात पाणी आणलं होतं ही नज्म मुद्दामच इथं देतोय तुम्हे उदास सी पाता हूं मैं कई दिन से , न जाने कौन से सदमे उठा रही हो तुम ? वो शोखियां वो तबस्सुम वो कहकहे न रहे हर एक चीज को हसरत से देखती हो तुम। छुपा - छुपा के खमोशी मे अपनी बेचैनी , खुद अपने राज़ की तशहीर बन गई हो तुम। मेरी उम्मीद अगर मिट गई तो मिटने दो , उम्मीद क्या है बस इक पेशो - पस है कुछ भी
Posts
Showing posts from April, 2019