Posts

Showing posts from April, 2021
 कोल्हापूर व पाया पडणे वैग्रे  Alka Gandhi-Aserkar कोल्हापूर - स्त्रियांसाठी फार प्रतिगामी विचार असणारं शहर?? 20 एक वर्षांपूर्वी गेले होते. ज्यांच्याकडे गेले होते त्या घरातील बायका माझ्याच वयाच्या, डोक्यावर पदर घेऊन राबत होत्या.. नि नवऱ्याच्या पायावर रीतसर डोकं ठेवून पाया पडत होत्या.. नवरे इंजेनीअर होते. श्रीधर तिळवे नाईक  प्रथम धन्यवाद ! प्रत्येक विकसनशील शहराप्रमाणे १९८५ला कोल्हापुरवर सरंजामशाहीचा पगडा होता त्यावेळी लिहिलेली ही कविता आहे मात्र कोल्हापूरातही ह्याकाळात आधुनिक विचार करणारे लोक होते व आहेत मात्र ते अल्पसंख्य आहेत पुणे मुंबईतही ह्या काळात किती आधुनिक लोक होते हा संशोधनाचा विषय आहे युरोपअमेरिकेतही प्रबोधनाचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही आजही तिथे शाळेत न गेलेल्या स्त्रिया आहेत प्रश्न प्रमाणाचा असतो आपल्याकडे पुरोगामी लोकांचे प्रमाण धड २० टक्केही नाही आधुनिक म्हणावेत असे ५ टक्केही नाहीत आणि उत्तराधुनिक १ टक्काही नाहीत  प्रत्येक संस्कृतीत आदर व्यक्त करण्याच्या पद्धती असतात आपल्याकडे चरणस्पर्श ही आदर दाखवण्याची पद्धत आहे मी स्वतः माझ्या आईवडिलांना आणि माझ्या दोन्ही बहिणींना मा