Posts

Showing posts from February, 2017
चौथ्या नवतेचा लेखक चौथ्या नवतेचा लेखक म्हणून मी लिहायला बसतो तेव्हा मी चौथ्या नवतेचा लेखक नसतो तर मी फक्त लेखक असतो ज्याला माहित असते कि मला एक जाल निर्माण करायचे आहे . हे जाल महाजाल कि बृहदजाल कि लघुजाल कि सूक्ष्मजाल होणार हे माहीत नसते एक ओळ येते मग एक कडवे किंवा परिच्छेद मग कळते कि गद्य येणार आहे कि कविता पहिली ओळ अनेकदा कागदावर व पेजवर असत नाही पण डोक्यात असते आणि काहीवेळा तीच बऱ्याच गोष्टी निश्चित करते . भगवान शिवांनी तीन अक्ष तीन डोळे सांगितले होते १ पहिला कामाक्ष म्हणजे काम हा डोळा २ दुसरा अर्थ ३ आणि तिसरा महाक्ष म्हणजे मोक्ष ज्याला जनसामान्य शंकराचा तिसरा डोळा म्हणतात ह्यात पुढे धर्म ह्या जीवनार्थाची भर वैदिकांनी घातली ह्या तिन्ही अक्षांच्यावर एक एक महाकृती लिहायची हे मी निश्चित केले होते पण सुरवात कुठून करायची हेच स्पष्ट होत न्हवते सरतेशेवटी ज्या कामामुळे आपणा सर्वांचा जन्म होतो तिथूनच सुरवात करावी असा विचार करून स्फूर्तीची वाट पाहात बसलो . शाळेच्या पुस्तकाची सुरवात प्रतिज्ञेपासून होते म्हणून आधीच लिहून ठेवलेली प्रेमप्रतिज्ञा नावाची कविता घेतली पण समाधान होईना म्हणून
वस्तुवाद आणि निर्वस्तुवादी कविता श्रीधर तिळवे नाईक   गेले काही दिवस मी चॅनेल निर्वस्तुवादी ह्या संग्रहातील कविता फेसबुकवर टाकत आहे प्रतिसाद अल्प असणे अटळ आहे कारण मुळात मराठीत धड वस्तुवाद हाच प्रस्थापित झालेला नाही मग त्याविरुद्ध बंड म्हणून मी लिहिलेल्या निर्वस्तुवादी कविता पचणे अवघडच मात्र मराठी संस्कृतीत     वस्तुवाद मात्र व्यवस्थित बोकाळला आहे त्यामुळे त्याविषयी आता लिहिणे गरजेचे बनले आहे . ज्या फ्रेंच संस्कृतीत तो प्रथम आला तिथेच मुळात त्याची दखल घेऊन त्याच्यावर विस्ताराने लिहायला २००२ साल उजडले आहे मग मी कोल्हापूर     पासूनच ज्यांना लिहायला सुरवात केली त्या निर्वस्तुवादी कवितांची साधी दाखल तरी कोण घेणार ? ह्या कविता मी सौष्ठवच्या फेब १९९३ च्या अंकात टाकल्या होत्या आणि आता   वस्तुवादाच्या प्रभावामुळे त्या दखलपात्र ठरण्याच्या शक्यता आहे . वस्तुवादाला इंग्लिशमध्ये thingism असा शब्द आहे आणि तो फ्रेंच chosisme ह्या शब्दाचे भाषांतर आहे पोस्टमॉडर्न साहित्याच्या संद