Posts

Showing posts from June, 2020
नवीन पिढीच्या कवींसाठी  दोन शब्द श्रीधर तिळवे नाईक दिलीप चित्रेंशी चर्चा करतांना ते एक फार गहन मुद्दा उपस्थित करायचे तो म्हणजे मराठी आधुनिकता म्हणजे काय ? मी हा प्रोजेक्ट हाती घ्यावा अशी त्यांनी सूचना केली होती जी मला चौथी नवता विकसित करायची आहे म्हणून मी नाकारली पण आयुष्यभर त्यांच्या ह्या सूचनेने माझा पाठलाग केलाय मराठी आधुनिकतेची सुरवात ते तुकारामापासून करायचे जे मी ठामपणे नाकारायचो माझ्या मते तुकाराम हे मोक्षयुगाशी निगडीत होते आणि त्यांना विज्ञानाची ए बी सी डी ही माहीत न्हवती तुकारामांचा ग्रेटनेस हा होता कि ते धर्मयुगातून निसटले आणि बुद्धाप्रमाणे मोक्षयुगात दाखल झाले निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर चक्रधर ह्या युगाचे नकुलीश लकुलीश कपिल असतील एकनाथ महावीर असतील तर तुकाराम गौतम बुद्ध आहेत आणि जो फरक आहे तो उपायाचा आहे म्हणजे नकुलीश ,लकुलीश ,कपिल ,महावीर ,बुद्ध हे जर योगोपायी ज्ञानोपायी ज्ञानकेंद्री असतील तर तुकाराम एकनाथ भक्तोपायी आहेत आणि साठोत्तरी ढसाळचा अपवाद वगळता अनेक कवी भक्तोपायी आहेत फक्त ढसाळच ज्ञानोपायी आहेत मराठीचे मोक्षयुग ह्या लोकांच्यामुळे बहरले आणि त्यांनी मार्गी मोक्षयुगाचा