कोल्हापूर व पाया पडणे वैग्रे 

कोल्हापूर - स्त्रियांसाठी फार प्रतिगामी विचार असणारं शहर?? 20 एक वर्षांपूर्वी गेले होते. ज्यांच्याकडे गेले होते त्या घरातील बायका माझ्याच वयाच्या, डोक्यावर पदर घेऊन राबत होत्या.. नि नवऱ्याच्या पायावर रीतसर डोकं ठेवून पाया पडत होत्या.. नवरे इंजेनीअर होते.


श्रीधर तिळवे नाईक 

प्रथम धन्यवाद ! प्रत्येक विकसनशील शहराप्रमाणे १९८५ला कोल्हापुरवर सरंजामशाहीचा पगडा होता त्यावेळी लिहिलेली ही कविता आहे मात्र कोल्हापूरातही ह्याकाळात आधुनिक विचार करणारे लोक होते व आहेत मात्र ते अल्पसंख्य आहेत पुणे मुंबईतही ह्या काळात किती आधुनिक लोक होते हा संशोधनाचा विषय आहे युरोपअमेरिकेतही प्रबोधनाचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही आजही तिथे शाळेत न गेलेल्या स्त्रिया आहेत प्रश्न प्रमाणाचा असतो आपल्याकडे पुरोगामी लोकांचे प्रमाण धड २० टक्केही नाही आधुनिक म्हणावेत असे ५ टक्केही नाहीत आणि उत्तराधुनिक १ टक्काही नाहीत 

प्रत्येक संस्कृतीत आदर व्यक्त करण्याच्या पद्धती असतात आपल्याकडे चरणस्पर्श ही आदर दाखवण्याची पद्धत आहे मी स्वतः माझ्या आईवडिलांना आणि माझ्या दोन्ही बहिणींना मामांना दत्ता दादाला चरणस्पर्श करतो करायचो त्यात मला काहीही वावगे वाटत नाही कारण हा आदर मनापासून आहे म सु पाटील दि पु चित्रे भालचंद्र नेमाडे ह्यासारख्या दिग्गजांच्याविषयी मला आदर असल्याने मी त्यांच्या पाया पडतो पडायचो जिथे आदर तिथे चरणस्पर्श ह्याचा अर्थ मी टीका थांबवतो असे नाही तो हक्क भारतीय संस्कृती देते नेमाडेंच्यावर तर मी अनेकदा तुटून पडलेलो आहे पण तरीही सरांच्याविषयी असलेला माझा आदर कमी झालेला नाही किंवा आमच्या संबंधात कधी कडवटपणाही आलेला नाही ते एकांतात फक्त एक वाक्य नेहमी ऐकवतात "तू गावातून आलेला असूनही देशीवादी नाहीस हे बरोबर नाही"  सांगण्याचा मुद्दा पाया पडणे किंवा चरणस्पर्श ह्यात जर आदर असेल तर काहीही वाईट नाही पण केवळ उपचार वा प्रथा किंवा लांगुलचालन म्हणून कोणी चरणस्पर्श करत असेल तर ते अतिशय वाईट आहे 

आता प्रश्न पतिपत्नी संबंधाचा तर माझे स्वतःचे स्पष्ट मत असे कि नवरा बायकोपैकी कुणीच कुणाच्या पाया पडू नये रूढी आणि पुरुषसत्ताक प्रथा म्हणून तर बिलकुल न्हवे पण पती आणि पत्नी ह्यांच्यात एखाद्या क्षणी आदर वाटला आणि पती पत्नीच्या किंवा पत्नी पतीच्या पाया पडली तर ते चुकीचे न्हवे पण हे पूर्णपणे वैयक्तिक मानले पाहिजे ह्याचा सामाजिक नियम बनवू नये पुरुषांनीही ह्या पुरुषसत्ताक प्रथेचा त्याग करावा व चरणस्पर्श स्वीकारू नये पण स्वतःची मुलगी आदराने नमस्कार करत असेल तर जरूर स्वीकारावा आयुष्यात कधीकधी फार विचित्र प्रसंग येतात माझ्या वडिलांनी आम्ही एकत्र बसलेलो असतांना अचानक अनंतता अनुभवली आणि त्यांचे आयुष्य बदलले दुसऱ्या दिवशी मी तुझा आजपासून तुझा शिष्य म्हणून अनपेक्षितपणे चरणस्पर्श करते झाले अशावेळी करायचे काय त्यांच्या आदराचा आदर करूनही मी त्यांना थांबवले आणि मी कुणालाच शिष्य बनवत नाही असे सांगून पुढची अध्यात्मिक साधना काय अशी चर्चा सुरु केली अनेकदा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्ती वाकतात तेव्हा त्यांना वाकू न देणे गरजेचे आहे मग त्यात कितीही आदर असो मी आजतागायत कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीचा चरणस्पर्श स्वीकारलेला नाही पुरुषांनी हेच तत्व जर बायको संस्कारबद्ध असेल तर पाळावे तिला पाया पडू देऊ नये 

आता कुणी म्हणेल कि आम्हाला आदर व्यक्त करण्यासाठी हे आवश्यक वाटत नाही तर ते स्वातंत्र्य मान्य आहेच पण हेही आपण रूढी किंवा संस्कार म्हणूनच म्हणतो आहे का हेही तपासावे . कुठलीही गोष्ट करताना आपण पूर्ण स्वतंत्र असलो पाहिजे आणि आपले निर्णय फक्त आपलेच असले पाहिजे असो 

श्रीधर तिळवे नाईक 


Alka Gandhi-Aserkar

तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते कुणालाही मान्यच असते..

पण मी जे पाहिले ते असे अचानक नवऱ्याबद्दल आदराचे भरते येऊन झालेले दिसत नव्हते, तर रूढी म्हणून दिसत होते.. मी तरी आजवर आदर म्हणून किंवा रूढी म्हणून नवरा बायकोच्या पायावर रीतसर डोकं ठेवून पाया पडताना कुठे पाहिला नाही कुणाचा... अपवाद असू शकतात. पण स्त्रियांनी नवऱ्याच्या पाया पडणे हे आपल्याकडे अपवाद म्हणून नाही तर सर्रास रूढी प्रथेत चालत आलेलं आहे.मी जे म्हटलं ते सरांजामी पुरुषी वर्चस्व असलेल्या घटनेबद्दलंच. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बाकीचे मुद्दे इथे अनाठायी वाटतात

[[[[[[[[[[[[[[

तुमचेच ठायी अनाठायीचे तर्कशास्त्र स्वीकारले तर तुमची मूळ कॉमेन्टचं अनाठायी होते कारण स्त्रीमुक्तीचा वा पुरुषप्रधानव्यवस्थेचा त्या कवितेशी काहीच संबंध नाही संबंध आहे तो कोल्हापूर शहराच्या कलासंस्कृतीशी तरीही मी तुमच्या कॉमेन्टला अनाठायी न म्हणता उत्तर दिले होते कारण समग्र स्वरूपात गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात आणि एकारलेपणा माझ्या प्रकृतीला मानवत नाही 

======================================================================

KJKK

Comments

Popular posts from this blog