चौथ्या नवतेच्या चार  कादंबऱ्या इंट्रो श्रीधर तिळवे नाईक 

अडाहॉकाबानासुना आल्यानंतर काहींनी  विचारलं होतं इतकंच ? नुसत्या एका कादंबरीनं काय होतं ? मी म्हणालो होतो मी नुसती ओपनिंग करून देतोय पुढच्या खऱ्या खेळ्या पुढची पिढी खेळेल आणि आता चार कादंबऱ्या स्पष्टपणे आलेल्या दिसतायत (विश्राम गुप्तेच्या कादंबरीवर मी आधीच बोललो आहे त्यामुळे तिचा विचार मी इथे करत नाहीये )

नितीन वाघ ह्यांची व्हर्जिन 

सुधीर देवरेंची मी गोष्टीत मावत नाही 

प्रणव सखदेवची मेट्रोमॉल 

अविनाश उषा वसंताची पटेली 

ह्यातील सुधीरची कादंबरी अनपेक्षितपणे आली कारण तो ज्या अहिराणीच्या संदर्भात काम करतोय तिच्यातून तो असं काही लिहिल हे अनपेक्षित होतं . नितिनकडून तो भेटल्यापासूनच अपेक्षा होत्या प्रणव मात्र थेट फेसबुकवर (आम्ही अजून एकदाही भेटलेलो नाही ) त्यामुळं माहिती न्हवतं अविनाश कादंबरीकडे आस्तेकदम सरकेलच अशी अपेक्षा होती कारण त्याच्या कविता मी वाचल्या होत्या आणि त्याच्या कवितेच्या भाषेतच पटेलीच्या भाषेची शक्यता स्पष्ट दिसत होती 

ह्या चारही कादंबऱ्या अल्टर्नेटीव्ह व्हिजन घेऊन येतात नितीन सेलेबिलिटीची , सुधीर गोष्टीची , प्रणव मॉलची आणि अविनाश दमछाक करणाऱ्या अस्तित्व आणि मुंबई संबंधाची चौघांच्या चार तऱ्हा आहेत पण म्हणूनच आपापल्याजागी चौघे युनिक आहेत 

सुधीर देवरेच्या नायकाने  म्हंटल आहे ,"माझं नाव सुधम . मला लेखक व्हायचं आहे. लेखक åहायचं असलं तरी  मला सलग लिहता येत नाही . सलग सुचत नाही म्हणून पण  असं तुटक तुटक लिहून  काढायलाही  मला जमत नाही  हाताशी लागतं तेवढं लिहितो विसरलं जातं तेवढं सोडून देतो. मला लिहताना धाप लागते. तशी ͬ चिंतन करतानाही  धाप लागते."

ही धाप प्रत्येकाला लागलीये का ?

ह्या कादंबऱ्या चौथ्या नवतेत जिला मी डिजिटल खाच म्हणतो तीचे सतत प्रत्यय देतात सर्वसाधारणपणे आधुनिकतेपर्यंतचा काळ हा काहींना काही CUE क्यू देणारा काळ होता उत्तराधुनिकतेने प्रथम  डिसकंटिन्यूटी अनुभवली आणि आमच्या पिढीच्या वाट्याला खाच आली डिसकंटिन्युइटी संदिग्ध का होईना पण सिग्नल देते पण खाच क्यू देत नाही ती सणकण येते आणि निघून जाते साहजिकच निवेदनशैलीत अखंडता टिकवणे कठीण जाते जर तुम्ही जुन्यापुराण्या शैलीने जगणारे असाल तर तुम्ही ब्लॉक होत नाही पण चौथ्या नवतेचे असाल तर ब्लॉक होता ! निघता !काढता पाय घेणे हा चौथ्या नवतेत एस्केप नाही तर गतिशील जीवनाची आवश्यकता आहे आधीच्या पिढ्यांपुढे परिवर्तन कसे घडवायचे हा प्रश्न होता आता सतत समोर परिवर्तन पावणारे वास्तव समोर ठाकत असते आणि त्याला थांबवायचे कसे हा प्रश्न आहे हेमंत दिवटेच्या एका काव्यसंग्रहाचे नावच थांबता येत नाही असं आहे मन्या जोशींच्या भाषेत सांगायचे तर ही भगवान ट्रिप आहे पण प्रॉब्लेम हा आहे कि ट्रिप आहे पण ह्या ट्रीपमध्ये भगवान उपस्थित नाही प्रवास आहे पण ह्या प्रवासात प्रॉब्लेम हा नाही कि थांबता येत नाही प्रॉब्लेम हा आहे कि थांबवता येत नाही 

पुन्हा ओसंडून अंगावर येणारी गर्दी ! साहजिकच पटेलीचा नायक स्काय वॉल्क प्रिफर करतो जिथून गाड्या ताऱ्यांसारख्या पाहता येतात तर मेट्रोमॉलचा नायक मॉलमध्ये रात्रीचा टाइम साधून जातो एक ओपन स्पेसमध्ये आहे तर दुसरा बंदिस्त पण अवाढव्य जागेत आहे 

मर्ढेकरांनी मुंबईकराला उंदीर म्हंटल होतं पण उंदराचं वैशिष्ट्य असं कि उंदराला किमान वास हा CUE देतो काचेच्या खाचा असल्या कि उंदराला खाचा खाचा वाटत नाही डिजिटल खाचा ह्या कधीकधी खाचा कळू देत नाहीत मॉल हा असा खाचा कळू न देणारा ग्लास आहे प्रणव , नितीन आणि अविनाश ह्यांच्या कादंबऱ्या ह्या अशा जगातल्या खाचा शब्दात उचलतात पण कळू देत नाहीत 

खाच असते तर गॅप मुद्दाम ठेवली जाते हे लोक गॅप ठेवत नाहीत पण तरीही खाचांच्या मुळे गॅपचा फील येतो आणि तो निवेदनाचा भाग वाटतो चारही कादंबऱ्यांत दृश्यात्मक वेग कमालीचा आहे म्हणजे पटेलीचा नायक १७ मध्ये ऑफिसमधून भाषा व्याख्यान देत गर्लफ्रेंड्सशी बोलत कधी कॅरॅमपाशी येतो ते कळतच नाही  

चौथ्या नवतेच्या कादंबरीकारापुढे दोन पर्याय असतात 

१ उत्तराधुनिक 

२ जालात्मक 

मी स्वतः जालात्मक पद्धतीने कादंबऱ्या लिहितो कारण मला महाव्याप्ती कवटाळायची असते पण आज काळ असा आहे कि महाव्याप्ती पाहायला लोकांना वेळ नाही त्यामुळे आजच्या काळात उत्तराधुनिक दृष्टिकोन जास्त पॉप्युलर आहे हे चौघेही उत्तराधुनिक लघुव्याप्ती पद्धतीने जातायत हे मान्यतेच्या दृष्टीनं बरंच आहे 

ह्या चार कादंबऱ्यांत उत्तराधुनिक रूटलेसनेसचा फील जबरदस्त आहे मेट्रोचा नायक मॉलच्या सरफेस कल्चरवर माय वर्ल्ड इज फ्लॅट म्हणत फिरतो स्वतःच स्वतःची एन्टरटेनमेन्ट शोधतो आणि फॅंटसीमध्ये स्वतःच आयुष्य सरकवत जातो तर नितीनची नायिका जणू सेल्समनशिप कन्व्हिन्स करायला धडपडते आहे बाजारांचा दबाव दोघांच्यावर आहे पण नितीन अविनाश आजचे वास्तव तर प्रणव आजची फँटसी फोकस करतो 

श्रीधर तिळवे नाईक 

इंडिया हा मूळचाच उत्तराधुनिक देश आहे हे कळायला जी काही रोमँटिक स्टेशने लागतात त्यात हे गाणे कहर आहे म्हणजे गाणारी गायिका आली नाही म्हणून किशोरकुमार म्हणाला कि मीच गायिकेचा भाग गातो आणि दोन्ही आवाजात तो गाणे गातो आणि पडद्यावर तो गाणारा पुरुष गायक असूनही लेडीज ड्रेस घालतो आणि आपल्या गायकीचा फिमेल व्हर्जन गातो आणि त्याने गायलेल्या मेल गायकीला पडद्यावर साकार करतो तेही त्याच्याच मागे लागत खलनायक असलेला प्राण जो चक्क नाचतोय ह्या गाण्यात ! हाफतिकीट हाफमॅड ! हे सगळं करायला सहमती देतो ते एरव्ही स्ट्रिक्ट असणारा संगीतकार सलील चौधरी ! टोटल फिदा ! 

लिंक 

https://www.youtube.com/watch?v=Ks3Js2bEh4w

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog