चौथी नवता चौथीच का श्रीधर तिळवे नाईक 

मराठीत पहिली दुसरी तिसरी चौथी अशा तऱ्हेची इतिहास मांडणी करण्याची परंपराच नाही साहजिकच पहिली नवता दुसरी नवता असं म्हंटल कि लोक दचकतात पाश्चात्य देशात मात्र १९६० नन्तर अशी मांडणी कॉमन होत गेली विशेषतः अल्विन टॉफ्लरच्या थर्ड वेव नंतर अशी मांडणी लोकप्रिय झाली आपल्याकडे द भि कुलकर्णी ह्यांनी पहिली परंपरा दुसरी परंपरा अशी मांडणी केली व ह्या नावाचे ग्रन्थही लिहिले विशेषण वापरण्याऐवजी संख्यात्मक मांडणी का केली गेली ह्याचे कारण एकाच काळात एकच मांडणी निर्माण होण्याचा काळ ओसरला होता मी अगदी सुरवातीला जालता हा शब्द वापरायचो पण तो डोक्यावरून जायला लागल्यावर परिचित काही शोधायला हवे म्हणून मी द भि कुलकर्णी ह्यांचा वारसा पुढे न्हेत १९९२ च्या नव्यांच्या अक्षर चळवळीत (संपादक अरुण म्हात्रे ) प्रथम चौथी परंपरा हा शब्द वापरला होता पण परंपरा हा शब्द कोणीच द भि च्या अर्थाने घेत नाही म्हंटल्यावर नवता हा शब्द वापरायला सुरवात केली त्याआधी विशेषण वापरतांना चौथी हा शब्द वापरला कारण करंट ट्रेंड तसाच होता उदाहरणार्थ ह्या काळात मानसशास्त्रात वर्तनवादी शाखेत वर्तनवादी थेरपीला पहिला वेव कॉग्निजन्ट ला दुसरा वेव व स्वीकारशील व खुल्या थेरपीला तिसरा वेव मानले जायला लागले होते ज्यात एरीक फ्रॉमपासून अनेकजण होते जिने अध्यात्माला स्वतःत सामावून घ्यायला सुरवात केली होती 

अर्थात काही क्षेत्रात विचार वेगळा होता म्हणजे स्त्रीवादात फर्स्ट वेव्ह फेमिनिझम व सेकण्ड वेव फेमिनिझम प्रस्थापित झाला होता व पुढे १९९० नंतर आलेल्या स्त्रीवादाला थर्ड वेव फेमिनिझम म्हणायला सुरवात झाली होती पण ही क्षेत्रे अपवाद होती मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या भविष्यविज्ञानाच्या म्हणजे फ्यूचरॉलॉजीच्या क्षेत्रात १९६५ नंतरच्या फ्यूचरॉलॉजीला थर्ड वेव फ्यूचरॉलॉजी म्हंटले जायला लागले होते आणि टॉफलरने हाच शब्दप्रयोग आपल्या थर्ड वेव साठी वापरला होता ह्या फ्यूचरॉलॉजीशी माझे स्वतःचे काही मतभेद होते आणि फोर्थ वेव फ्यूचरॉलॉजीची मला गरज वाटत होती साहजिकच १९८५ नंतरच्या फोर्थ वेव फ्यूचरॉलॉजी आणि मराठीचे काव्यशास्त्र ह्यांना सामोऱ्या जाणाऱ्या मला चौथी जालता हाच शब्द योग्य वाटणे साहजिकच होता जो मी पुढे चौथी नवता असा बदलून पुढे वापरायला सुरवात केली जेणेकरून फक्त माझीच नाही तर अनेकांच्या मांडण्या पुढे यायला मदत व्हावी देशीवाद आधुनिकवाद , सौंदर्यवाद असे वाद वापरून नवतेच्या हसीन वादिया निर्माण करण्याचे दिवस गेले आपल्याला समांतर अनेक डिस्कोर्सेस निर्माण होत असणार हे गृहीत धरूनच मांडणी करण्याचे हे दिवस आहेत मी त्यावेळीही सांगत होतो कि चौथ्या नवतेचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे डिस्कोर्स निर्माण अनेक श्रीधर तिळवे असणारच ते आपल्याला भेटत नाहीत कारण ते अद्याप त्यांच्याच सिलॅबसमध्ये नाहीत तर आपल्या सिलॅबसमध्ये कुठून येणार पण एक दिवस त्यांची माहिती आपणाला पडेलच तोवर पोस्टमॉडर्न सिलॅबस आणि लेखक स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही एकविसाव्या शतकातील बहुतांशी नोबल विनर हे पोस्टमॉडर्न लेखक आहेत किंबहुना देशीवाद , उत्तरवसाहतवाद आणि पोस्टमॉडर्न वाद ही सध्याची जगभर चालणारी चलनी नाणी आहेत ह्या लोकांचे दिवस कधी संपणार मला माहीत नाही पण हा काळ लवकरच येईल कारण नोबल पारितोषिक मिळणे आणि सिलॅबसमध्ये समावेश होणे  हा एन्ड पॉईंट असतो तो ह्या लोकांचा आलेला आहे 

हे सांगण्याचं कारण म्हणजे काही भुक्कडगिरीतून चौथी आणि नवता हे शब्द वापरलेले नाहीत आमच्याच एका कवीने स्वतःला जीवनवादी म्हणवून घेऊन चळवळीला लाज आणली होती त्यामुळे आम्ही काही उथळगिरी करतो आहोत असा गैरसमज पसरला तो गैरसमज दूर व्हावा म्हणून हा लेखनप्रपंच ! 

श्रीधर तिळवे नाईक 







Comments

Popular posts from this blog