देशीयतेचे कार्य काय श्रीधर तिळवे नाईक 

साठोत्तरीचा ज्वर अद्यापही ओसरलेला नाही आपण ज्या संस्कृतीत चाललोय त्यापेक्षा आपण ज्या संस्कृतीत होतो  त्यातच प्रत्येकाला रस ! बरं स्वतः भूतकाळात रमणाऱ्या ह्या लोकांचा तेच काम करणाऱ्या हिंदुत्ववादाला विरोध असतो कारण काय तर ह्यांना परंपरेत काही आधुनिक लोक व विचार सापडत असतात समजा असे लोक तुमच्या परंपरेत नसते तर तुम्ही हिंदुत्ववाद्यांचं काय केलं असतं ? आमच्या परंपरेत हिंदुत्ववाद्यांना विरोध नाही म्हणून गप्प बसला असता कि परंपरा मोडीत काढली असती ?

नवतेचा आधार परंपरा असत नाही नवतेचा आधार वर्तमान व भविष्य असते तुम्ही नवतेला पारंपरिक आधार शोधायला लागला कि आपोआपच जे परंपरावादी लोक असतात ज्यांना आधुनिकता किंवा चौथी नवता नको असते ते तुमच्या वळचणीला येऊन उभे राहतात आणि मग तुम्ही परंपरेला बळ देता देता कर्मठपणाला बळ द्यायला लागता रामाचं समर्थन अंतिमतः बजरंग दलाचं समर्थन बनतं आणि परंपरेचा देशीवादी पद्धतीने विचार करणारे लोक कितीही आधुनिक असले तरी ते अल्पसंख्याक असल्याने परंपरेचा अंतिम लढा हा कर्मठ लोकांच्या ताब्यात जातो अंतिमतः हिंदू कादंबरी हिंदुत्ववादाला मदत करते हिंदू लिहिणार्यांना हे कळत नाही कर्मठ लोक ज्ञानपीठ उगाच देत नाहीत त्यांना माहीत असतं कुठलीही अडगळ मग ती कितीही आधुनिक असो अंतिमतः अडगळ असल्याने आपणालाच येऊन मिळणार आहे नवता अडगळ नसते ती ताजीतवानी उमललेली नेटम्बलेज असते नवे नेटवर्क असते साहजिकच ती अडगळीला नवी बनवत असते देशीवाद नवतेला अडगळ बनवत असतो नवतेला परंपरा बनवत असतो देशीवादाचे कामच नवतेला परंपरेचा भाग बनवणे हे असते त्यामुळे देशीयता नव्या नवतेनंतर पुन्हा पुन्हा अवतरत असते देशीयता नवतेला परंपरा बनवेपर्यंत नवता पुन्हा काही नवं शोधून नवं बनवून त्या नवतेला नव्या पद्धतीने सादर करायला लागते आणि देशीयतेपुढे पुन्हा नवे आव्हान उभे करते  


थोडक्यात काय देशीयतेचे काम परंपरेत राहून नवतेला सामावून घेणे आहे 


दुर्देव इतकंच सध्या चौथी नवता देशीयतेच्या मिठीत मावत नाहीये . 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog