श्रीधर तिळवे ह्यांची राहुल सरवटे ह्यांनी घेतलेली मुलाखत भाग ३

                       c) शिक्षणव्यवस्थेतील सुद्धा त्यांचे वेळापत्रक syllbas शाखांवर विभाजन ( science / arts ) वगैरे याबाबत तुम्ही सुचवलेले बदल नवा माणूस घडवतील पण ते अंमलात आणताना आजचा माणूस आणि समाज यांचा पाया उटवहून टाकू शकेल म्हणून त्याच implementation होणं अवघड आहे .


                                                    खरे तर टिकहरण हे पुस्तक मला आता तितकेसे आठवत नाही मात्र माझ्यात सतत बदल होत असतात त्यामुळे टीकाहरणमधील माझ्या भूमिकांत काहीनाकाही बदल आलेलेच असणार

                                                   तर आता प्रथम a  मुद्दा तर एक गोष्ट लक्षात घे आपल्या समजत एकाच वेळी अनेक प्रकारच्या घटना घडत असतात म्हणजे सती जाण्याच्या काळातही आपल्याकडे तंत्र पंथात सामूहिक सेक्स चालत होताआजही प्रतिव्रता आणि जारता दोन्ही आपल्याकडे चालू आहेमुलांना वाढवण्याची काही समांतर व्यवस्था जोपर्यंत निर्माण होत नाही तोवर लग्न संख्या अटळ आहे खाजगीकरणाच्या काळात हि जबाबदारी सरकारने घ्यावी असेही आपण म्हणू शकत नाही .


                                      त्यामुळे लग्न हि संस्था अटळ बनलीय ह्याचा एक परिणाम तू पाहशील तर काळात नकळत back to the marriage institute चा फील नव्वदच्या शतकात प्रचंड वाढलेला आहे त्यातूनच हम आपके है कौन दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चे प्रचंड यश जन्मलय आजच्या पिढीकडे पाहशील तर तुला असं दिसेल कि लग्नापूर्वी तिला मजाही मारायचीये आनि तिला लग्नही करायचंय आणि लग्नानंतरही तिला आपलं घर शाबूत ठेऊन अफेरही करायचंय ह्यातून प्रचंड त्राण  निर्माण होणे अटळ आजच्या सीरिअलमध्ये थाटामाटात लग्न होतायत आणि नंतर विवाहबाह्य संबंधाच्या भानगडीची होतायत काळात नकळत आपल्या मनस्थितीच्या त्या निदर्शक आहेत .

                                              बरट्रॅन्ड रसेलने  लग्नाला legalised prostitution म्हणजे कायदेशीर वेश्यागिरी म्हंटले होते ते खळबळ उडवणारे होतेत्याने ज्या काळात हे म्हटले त्या काळात अनेकदा मध्यमवर्गीय स्त्री कामावर जात नसे ती घरात असे आणि पुरुष तिला घर चालवायला पैसे देई आणि त्या बदल्यात स्त्री त्याला आपले शरीर इच्छा असो  नसो अर्पण करी . कामावर जाणाऱ्या वर्किंग वुमनबाबत असे म्हणता येईल का ह्याविषयी मला शंका आहे . शेवटी प्रेस्टिट्यूशन म्हणजे काय ?


  पैश्याच्या बदल्यात शरीर देणे आणि हे देताना निखळ व्यवहार म्हणून देणे . आजची स्त्री ते करते  कायकिंबहुना कुठलीही काळातील स्त्री असे करत होती काय ?  हीच गोष्ट पुरुष करतो कि नाही ? असे अनेक प्रश निर्माण होतात आणि त्यांची उत्तरे त्या त्या स्त्रीपुरुषावर अवलंबून आहे . एक general निष्कर्ष काढणे कठीण आहे शक्य आहे कि एखादी वैश्या अत्यंत प्रेमाने शरीसंबंध करेल तेव्हा प्रत्येक संघ हा त्याबाबत नवाचं असतोआणि त्याचे स्वरूप नवेच असते ह्याचे भान आपणाला हवे . हा संघ prostitutional झाली कि नाही हे फक्त ते कापलंच सांगू हस्कटे तिसरा माणूस ह्यावर काही बोलू शकत नाही


                                                                आता तुझा b मुद्दा मी टिकाहरण  मध्ये workshop ला पर्याय म्हणून growthwork चा पर्याय मांडला होता आणि तो social बाबतीतही लागू होतो सऱ्याच्या NGO च्या काळाच्या social workshop प्रचंड वाढत चाललेत अशा वेळी त्याला पर्याय म्हणून तुम्हाला social growthworks करावीच लागतील अर्नाल अवचटांच्या कार्यरत ह्या पुस्तकात अशा social growthworks चा त्यांनी आढावा घेतलेला आहे.  आपला समाज सामाजिक काम करणाऱ्या माणसाबाबत उदासीन असतो .

 किंबहुना भारतीय समाज हा सरळ सरळ पलायन वादि समाज आहे तो मीथमध्ये जास्त रमतो आपण चिन्हसृष्टीय चौथी नवता त्यातील गॉसिप्स आणि पेज थ्री कल्चर ज्या स्पीडने आत्मसात केले तो स्पीड मला अजिबात आश्चर्यचकित करणारा नव्हता कारण वास्तवा पासून पळून जाणाऱ्या आपल्या मेन्टॅलिटीला हे सगळे साजेसे होते  आहे social growthwork करणे म्हणजे die hard reality बदलणे त्यात आपल्या समाजाला काय रस असणार आपले देव हे काल्पनिक त्यांचे चमत्कार काल्पनिक आपली समाजव्यवस्था ज्या जातीय व्यवस्थेच्या आधारे उभी ती जातीयता काल्पनिक आपल्या आर्थिक व्यवहाराला कसलीही नीतिमत्तेची जोड नाही कुठलाही अर्थव्यवहार करताना कोणत्याही क्षणी आपली नीतिमत्ता ढासळू शकते त्या अर्थाने आपला विवेक काल्पनिक आपलं आपल्या प्रत्यक्ष आईवडिलांवर प्रेम कमी त्या पेक्षा मातृत्व , पितृत्व ह्या उद्दात कल्पनावरच आपलं प्रेम अशा सगळ्या फॅन्टसी लॅण्डमध्ये social growthworks ची गरज ही सर्वाधिक आहे त्यांची अंधुक असणारी शक्यताही मला बळ देते .


                                आता तुझा मुद्दा c टीकाहरणमध्ये मी शिक्षण व्यवस्थेत जे म्हटलं वा जे उपाय सुचवले आहेत ते तू समजतोस तितके अवघड आहेत असं मला वाटत नाही . ते अंमलात आणण्याची इच्छाशक्ती हवी भारतात खरा खुरा दुष्काळ इच्छाशक्तीचाच आहे आज तेरा वर्षांनंतरही ते लिखाण relevant वाटावं हा माझ्या द्रष्टेपणाच पुरावा नसून आपल्या समाजाचा आंधळेपणा आहे .                                                                                                                                    
                                    आज सर्वत्र जागतिकीकरणाचा बोलबाला चाललाय ...... networking हा key wood बनलाय - sociolorists म्हणताहेत future society is a networking society  - या सोसायटीवरचा semiodities चा प्रभाव स्पष्टच आहे चिन्हसृष्टी ( television , computer , internet etc  बृह्दजाल ) जेव्हा नवा समाज घडवतील अशा वेळेला वाढलेली असहिष्णुता , भोगी वृत्ती आणि व्यक्तीच सामाजिक तुटलेपण ( ailenation ) वाढतंय शिवाय mcdonald's  सारखं restuarent एका नव्या corporate beuraucracy   अमेरिकन symbol बनून सर्वत्र homoginialization च्या प्रकियेला हातभार लावतय  ( reberance : george ritzer - mcdonaldization of society अश्या वेळेला स्वत्व व्यक्तिगत पातळीवर आणि एक ( मराठी ) समाज म्हणून सुद्धा कास जपता येईल ?


                                          ह्या प्रश्नच उत्तर शोधायचं असेल तर सत्व म्हणजे काय हा प्रश्न प्रथम विचारला पाहिजे मग वैयक्तिक सत्व आणि सामाजिक सत्व अशी काही विभाजन रेषा अस्तित्वात असतेका ते पहिले पाहिजे .


                                          मी मागेच म्हटल्याप्रमाणे व्यक्ती ही सत , चित्त,आनंद,क्रिया,शिव,शक्ती,अवकाश,
काळ आणि स्थिती अशा नऊ नयांनी बनलेली असतेतर व्यक्तिगत सत्त्व हे ही ह्या नऊ प्रकारचे असते म्हणजे सतात्मक सत्त्वचित्रात्मक सत्त्व ,आनंदात्मक सत्त्वक्रियातत्व सत्त्व ,शैव सत्त्व ,शाक्त सत्त्वअवकाशात्मक सत्त्व आणि कालिक सत्त्व . सत्त्व जोपासणे म्हणजे या नऊ नयाबाबत आपणाला जे काय करणे योग्य आहे असे वाटते ते करणे होय

 उदाहरणार्थ सतात्मक सत्त्व म्हणजे माझ्या सताविषयी माझ्या शरीराविषयी ते जसे आहे तसे स्वीकारणे  त्याच्या भल्यासाठी जे योग्य आहे ते करणे होय जर जर माझ्या त्वचेचा रंग सावळा असेल तर त्याचा सन्मान करणे म्हणजे सतात्मक सत्त्व होय . जर कुणी गोऱ्या रंगाची महती गाऊन माझ्यात मी सावळा आहे ह्याबद्दल न्यूनगंड निर्माण करू पहात असेल तर तसा तो होऊ  देणे म्हणजे सत्त्व राखणे होय माझ्या शरीरासाठी जर भाकरी आणि चपाती योग्य असतील तर मी त्याबद्दल न्यूनगंड का बाळगावा केवळ फॅशन आलीये  म्हणून मॅक्डोनाल्डचा बर्गर खाणे हे सत्त्व नसल्याचेच लक्षण होय .


 तर आपले जे रोजचे मराठी जेवण आहे त्याविषयी कसलाही न्यूनगंड  बाळगणे म्हणजे शरीरात्मक सतात्मक सत्त्व होय .सत्त्व हे चांगलीच गोष्ट आहे पण त्या सत्वाचे गर्वात रूपांतर होणार नाही ह्याची मात्र काळजी घेणे होय म्हणजे सावळ्या रंगाचे सत्त्व जोपासावे पण तो गोऱ्या रंगापेक्षा श्रेष्ठ आहे असा अंहगंड बाळगणे हे मात्र गर्वाचेच लक्षण होय . चित्तात्मक सत्त्व म्हणजे स्वतःच्या विचाराशी बांधीलकी असणेमाझी जी काही वैचारिक तत्त्वे आहेत त्याच्याशी मी कमीटेड असले पाहिजे म्हणजे समज धूम्रपान करू नये हे मला पटले आहे तर केवळ छान छान जाहिराती येतात किंवा सिगरेट पिणाऱ्याला आसपासच्या काही पोरी मर्द समजतात म्हणून मी धूम्रपान करता कामा नये

 आनंदात्मक सत्त्व म्हणजे स्वतःच्या भावभावनांशी प्रामाणिक राहणे जर मी एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलो असेन आणि ती प्रेमभावना मला स्पष्टपणे उमजली असेल तर त्या मुलीचा धर्म , जात वगैरे  बघता समाज काय म्हणेल ह्याची पर्वा  करता मी तिच्यापुढे त्या भावभावनेचा अत्यंत सभ्यतेने इजहार केला पाहिजे . क्रियात्मक सत्त्व म्हणजे आपणाला ज्या क्रिया कराव्याश्या वाटतात त्याच करणे केवळ समाज सांगतो म्हणून काही करणे हे सत्त्व नसल्याचेच लक्षण आहे  स्वतःला काय करायचे आहे ते करणे म्हणजे क्रियात्मक सत्त्व होय शैव सत्त्व म्हणजे स्वतःची , स्वतःच्या कृत्याची पूर्ण जबाबदारी घेणे अनेकदा लोक कृती करतात पण त्यांची जबाबदारी घेत नाहीत हे शैव सत्त्व नसल्याचे लक्षण आहे आपण जे आहोत जसे आहोत जिथे आहोत त्याची पूर्ण जबाबदारी घेणे आणि जर त्याबाबत आपल्यावर अन्याय होतोय  असे वाटले तर त्या अन्यायाविरुद्ध लढणे हे सदैव सत्वाचे लक्षण होय .


 शाक्त सत्त्व म्हणजे स्वतःच्या इच्छा , तृष्णा ओळखून त्या स्वीकारणे त्या तृष्णेचे रूपांतर प्रतिभेत करणे आता कवी होणे  दार्शनिक होणे ह्यांदर्भात लागणारी तृष्णा माझ्याजवळ आहे इतकेच नव्हे तर ह्या तृष्णेचे प्रतिभेत रूपांतर करून त्या बाबत काही विधायक काम घडवून आणण्याची शक्ती माझ्याजवळ असेल तर तिचा स्वीकार करणे तिला त्या दिशेने कार्यरत करणे म्हणजे शाक्त सत्त्व होय . आपल्याजवळ नेमकी कशा प्रकारची प्रतिभा आहे हे ओळखणे हेही शाक्त सत्त्वाला ओळखणेच आहे . कुठलीही व्यक्ती ही एका विशिष्ट अवकाशात जगत असते तर तो अवकाश स्वतःला हवा तसा ठेवणे त्याला स्वतःला हवा तसा आकार देणे म्हणजे अवकाशात्मक सत्त्व होय सर्वसाधारणपणे आपले घर आणि आपले ऑफिस हे दोन अवकाश ह्यासंदर्भात फार महत्वाचे असते . .


 आपल्या अवकाशाची नेमकी गरज काय ते आपण ठरवायला हवे म्हणजे कुठले फर्निचर हवे कुठला रंग भिंतींना हवा कसल्या खुर्च्या हव्यात वगैरे वगैरे कालिक सत्त्व म्हणजे स्वतःच्या काळात जे करणे योग्य वाटते तेच करणे शिवाजी महाराजांनी काम करणे आणि तुकाराम महाराजांनी काय केले ह्यापेक्षा स्वतःच्या काळात काय करणे योग्य आहे ते ठरवणे  त्याप्रमाणे काळानुरूप कृती करणे म्हणजे कालिक सत्त्व राखणे होयभूतकाळ हा नेहमीच त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स आपल्यावर लादायला उत्सुक असतो जगातली अनेक माणसे तर भूतकाळाचीच एजंट असतात त्यांच्या एजंटगिरीला शरण  जाणे  स्वतःही भूतकाळाचे एजंट  बनणे म्हणजे कालिक सत्त्व राखणे होय.


                                                                 ही सर्व सत्त्वे सामाजिक बाबतही अप्लाय होतात फक्त  ती विश्वीयसृष्टीय , प्रतिसृष्टीय आणि चिन्हसृष्टीय अप्लाय होतात फक्त ती विश्वीयसृष्टीय प्रतिसृष्टीय आणि चिन्हसृष्टीय अशा चार पातळ्यांवर अप्लाय होतात एवढंच मराठी संस्कृतीबाबत जर विश्वीय पातळीचा विचार केला आहे असे दिसते मराठीत नामदेव एकनाथ,तुकारामअसे एकापेक्षा एक  enlightened पुरुष झालेले दिसतात मुक्ताबाई,जनाबाई,
बहिणाबाई अशी स्त्रैण धारा दिसते भक्तीची धारा ही आनंदाची धारा आहे .


                                                     ज्ञानेश्वरांच्या रूपाने चित्रात्मक धारा दिसते तिचा फारसा विकास मात्र झालेला दिसत नाही ज्ञानेश्वरांच्याच रूपाने शैव धारा दिसते ती अमृतानुभवाच्या रूपाने प्रकटलेली आहे . लोटिळकांनी गीतारहस्य लिहून क्रियात्मक धारा ( कर्मयोग ) मांडलेली आहे . फुलेंनी भक्ती धारा नव्या रूपात मांडलेली आहे विनोबा भावेंच्या रूपाने विश्वीय चित्तधारा पुन्हा अवतरली आहे . मराठीतलं हे सगळं अध्यात्म मराठीला अध्यात्मिक सत्त्व पुरवण्यास सक्षम आहे . मराठीने धर्म स्थापन केला नाही हे एका अर्थाने फार बरे केले कारण विश्वीय पातळीचा धर्म झाला कि तो कट्टर होत जातो आणि त्याचे रुपांतर ब्राम्हणी जाणिवेत करायला सुरवात केलीय संतांच्या नावाने चमत्कार लिहायला सुरुवात केलीय पण तरीही सुदैवाने त्यात कट्टर पण आलेला नाही . मराठीच्या ह्या अध्यात्मिक वारशाचे रूपांतर अध्यात्मिक सत्वात करण्यात अद्याप तरी मराठीला यश आलेले नाही



                                                        मराठी संस्कृतीचे खरे अपयश हे सृष्टीय पातळीवर आहे विशेषतः निसर्ग विज्ञानात आपले योगदान अगदी नगण्य आहे मराठी संस्कृतीतील परंपरा फार कामाच्या नाहीत अपवाद फक्त शिवाजीचे राज्य आहे पण शिवाजीला आपण नीट समजून घेतलंय असं मला वाटत नाही शिवाजीने स्थापन केलेले राज्य हे पेशव्यांच्या हातात कसे काय सरकले ह्या मूलभूत मुद्द्याचा आपण अजूनही खोलवर विचार केलेला नाही
१२ व्या शतकाच्या आधी जी मराठी परंपरा होती तिचाही अद्याप पुरेसा अभ्यास झालेला नाही आपल्याला orientalism पेक्षा marathiliasm ची जास्त गरज आहे हा मराठीलीझम आपण पुरेश्या प्रमाणात जोपर्यंत विकासत नाहीत तोवर मराठीला क्षेत्रीय सत्त्व सापडणे कठीण आपले देशी विचारवंत हे फक्त मिरवणूक काढणारे आहेत आणि त्यामुळेच देशीवादामुळे जास्तीतजास्त चांगली करमणूक होते प्रत्यक्ष काम होत नाही .


                                                   प्रतिसृष्टीय पातळीवर तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुन्हा आपली बोंबच आहे मात्र विचारसरणीचा मात्र गडगंज ऐवज आपल्याला उपलब्ध आहे मात्र आपला प्रत्येक मराठी विचारवंत हा राष्ट्रीयच असतोकाही विचार प्रणाली तयार झालेली नाही मराठी विचारवंतांचा प्रभाव संपूर्ण भारतावर पडलेला आहे किंबहुना भारतातले सगळे वाद हे मराठी माणसाने निर्माण केले आहेत टिळकवाद सावरकरवाद , हिंदुत्त्ववाद काँग्रेसवाद,डांगेवाद , फुलेवाद , आंबेडकरवाद हे सगळे महत्त्वाचे isms ही मराठी माणसाची देणगी आहे . मराठी माणसाला प्रतिसृष्टीय सत्त्व पुरवायला ती पुरेशी आहे आपली खरी बोंब  १९५०  नंतर झाली आपण १९५० नंतर आपल्या विचारवंतांचे देव्हारे माजवण्याखेरीज काहीच केलेले नाही परिणामी देशाचे वैचारिक नेतृत्व आपल्या हातातून निसटले . अर्थशास्त्र  समाजशास्त्रातले नवीन बदल आत्मसात करण्यास आपण कमी पडलो ही परखड वस्तुस्थिती आहेजोपर्यंत आपण फुले आंबेडकर टिळक हेडगेवार गोळवलकर वगैरे सर्वांचे वैचारिक ओझे फेकून नवे जग नव्या पद्धतीने पहायला शिकत नाही तोपर्यंत आपणाला भवितव्य नाहीमराठी समाजात आज जो काय विचार करायचा होता तो फुले आंबेडकर वगैरेंनी आधीच केला आहे असा एक झापडबंदपना आलेला आहे तो जोपर्यंत आपण फेकत नाही तोपर्यंत प्रतिसृष्टीय सत्व कमावणे आपल्याला शक्य नाही


                                                       मराठी संस्कृतीचे चिन्हसृष्टीय सत्त्व ही असेच फाफललेले दिसते कलाक्षेत्रात कविता सोडली तर जागतिक दर्जाचे म्हणावे असे फारसे काम आपणाला करता आलेले नाही आणि ज्या कवितेच्या क्षेत्रात आपण आपला जागतिक दर्जा कायम राखलंय त्याची कसलीही कदर मराठी विचारवंत , राजकारणी , पत्रकार वगैरे मंडळींनी केलेली नाहीअत्यंत फालतू आणि सामान्य दर्जाचे कवी प्रमोट करण्याखेरीज मराठी वर्तमानपत्रांनी आणि मीडियाने काही केलेले नाही . चित्रकलेत गायतोंडे , प्रभाकर बरवे , कोलते अशी काही महत्वाची नावे आहेत . विचारवंतातही शरद पाटील ,  . साळुंखे ह्यासारख्यांनी एकाकी लढवलेले किल्ले महत्त्वाचे आहेतमराठी माणसाने कसलीही राजकीय  सामाजिक ताकद ह्या विचारवंतांच्या मागे उभी केलेली नाही आपण जो पर्यंत हे करत नाही तोपर्यंत मराठी सत्व हे स्वप्नच राहणे अटळ आहे . विचारवंतांना सन्मान देण्याऐवजी त्यांना कसे वापरता येईल हाच विचार करणाऱ्या मुर्दाड राजकारण्यांची संख्या हि मराठी समाजात वाढते आहे आणि त्यांचे अनेक दुष्परिणाम आपल्या राजकारणावर आलेले स्पष्ट दिसतात . मराठी माणूस एकतर भोंगळ जागतिक होतो किंवा ओंगळ देशी त्यामुळे भरपूर घोळ घालतो त्याला एकाच वेळी ऑस्करही जिंकायचे असते आणि खंडोबाच्या जत्रेत आपला सिनेमा चालावा असेही वाटत असते अशी माणसे सत्व कमवून देऊ शकत नाहीत दुर्दैवाने अशाच मराठी माणसांची संख्या वाढते आहे .



                                                         postmodernity   कडे आपण कसं पहाता ?

a) postmodernity 
ची science वरील टीका विशेषतः                           आणि पुढे foucault ची displine & punish मधील टीका

b) derrida 
चा विचार ( retu : संदर्भ : वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ला - कव्ही ) तुम्हाला एका अर्थाने ब्राह्मणवादी वाटतो काय ? deconstruction  deconstruction तुम्ही कास कराल ?

c) 
भारतीय संदर्भात postmodernism  चा साचलेल्या / तुंबवलेल्या modernism ला ( dipankar gupta - भारतीय आधुनिकतेला mistaken modernity म्हणतात... किंवा आजही जातपॅट , स्त्री-शिक्षण , हुंडा सती - science , technology आणि गणपतीला दूध पाजणं वगैरे एकत्रच नांदणे चालतच ... ) मोकळं करू शकेल का ?
एकूणच  postmodernism  का over all analysis तुम्ही कसा करता ?

d ) postmodern 
काळातले anti - enlightenment चे सायरन वाजणे ideology is dead , history is over किंवा subject is dead युरोपियन अवकाश काळात निर्माण झालेल्या आरोळ्यांच्या संदर्भात तुम्ही काय म्हणता ?


                                     postmodernism  चा विचार करताना मुळात तीन प्रकारचे postmodernism  आहेत हे लक्षात घ्यायला हवे

                                   पहिला प्रकार हा प्रतिसृष्टीचा निरोप घेणाऱ्या त्यातून निर्माण झालेल्या modernity चा निरोप घेणाऱ्या postmodernism  आहे त्यात प्रामुख्याने ल्योतोरचा समावेश होतो . modernity ने जी ideology वा history वा subject जन्माला घातला त्यांच्या मृत्यूची घोषणा त्या प्रकारात होते


                                     दुसरा प्रकार चिन्हसृष्टीच्या आणि चिन्हसृष्टीतील संहिताचे विश्लेषण करणारा postmodernism ! ह्यात प्रामुख्याने देरिदा बार्थ वगैरे विचारवंताचा समावेश होतो हाच प्रकार पुढे सर्वच गोष्टींना संहिता समजून त्यांचे विश्लेषण करतो लाकानचे psychoanalysis हे चिन्हसृष्टीय psychoanalysis ची सुरवात आहे तो पेशंटने निर्माण केलेल्या संहितांना प्रचंड महत्त्व देताना दिसतो .


                                   तिसरा प्रकार चिन्हसृष्टीतील चिन्हवस्तू semiodities त्याची निर्मितीउत्पादनउपभोग त्याचा सामाजिक परिणाम त्यातून निर्माण झालेले  उत्पादनसंबंध वगैरेचा विचार करतो ह्यात बॉद्रिलार्द फ्रेडरिक जेम्सन वगैरेचा समावेश होतो



                                   मुख्य प्रश्न असा आहे कि ह्या सगळ्या घडामोडींचा विश्लेषणाचा आपणाला खरोखर काही फायदा आहे काय ? म्हणजे subject is dead असं म्हणताना ह्या देशांत व्यक्तिस्वातंत्र्याचा तोरा मिरवणारा subject मुळात निर्माण झालाय काय हाच प्रश्न आहे . आपल्याकडचे मी चे स्वरूप  त्यांच्याकडचे subject चे स्वरूप एकच आहे काय ? किंवा history is dead म्हणायला मुळात ह्या देशांत पुरेशी history निर्माण झाली आहे काय किंवा ज्या संदर्भात हे विधान केले गेले आहे तो संदर्भ लागू होतो काय ? लोकशाही आणि भांडवलशाहीचा एकतर्फी विजय खरोखर झाला आहे काय ? ideology is dead म्हणताना आपल्याकडच्या कुठल्या ideology खरोखर dead  झाल्या ? आपल्या कडच्या ideology चे नेमके स्वरूप काय आहे ? आंबेडकरवाद ही ideology आहे पण फुले वाद ही ideology आहे काय ? ideology आणि दर्शन ह्यांच्यातला फरक आपण कसा स्पष्ट करून सांगणार आहोत ?  ज्याला मी चिन्हसृष्टीय दर्शन म्हणतो तसे दर्शन निर्माण करता येणे शक्य आहे कायते करताना मला देरिदा बार्थ चा उपयोग अधिक आहे कि भारतातल्या ध्वनिसिद्धांताचा अधिक उपयोग आहे ?


                                                postmodernism  ची सायन्सवरील टीका ही सायन्सवरील गैरसमजावर आधारित आहे. science ला एक केवळ डिस्कोर्स म्हणून ट्रीट करता येईल असे मला वाटत नाही ही टीका माझ्या मते जी मानव्य विज्ञाने आहेत त्यांना जास्त लागू होतो उदाअर्थशास्त्र  राज्यशास्त्र पण physics सारख्या विज्ञानात ती फारशी मूल्यवान नाही . psychoanalysis हेही मानव्य विज्ञान असल्याने तिथे तिचा विचार करायला हरकत नाही .


                                           
                                                 आता मुद्दा B deconstruction हे एक फार गुंतागुंतीचे हत्यार आहे . modernism चे माझ्या मते दहा खांब आहेत  हेतू  मूळ  केंद्र  सीमा  उपस्थिती  डिझाईन  आकार  बंदिस्त चौकट  क्रम  उच्चनिच्चता १० शेवट  रेखीवता  प्रत्येक गोष्टीमागे हे दहा खांब असतात असे modernity मानते म्हणजे हीमुलाकतीमागे निश्चितपणे काही हेतू आहे असे सांगेल ह्या मुलाकतीचे मूळ कुठे ना कुठे आहे हे गृहीत धरेल ह्या मुलाकतीमागे काही केंद्रे आहेत   ह्या मुलाकतीत प्रत्यक्ष श्रीधर तिळवेच्या व्यक्तिमत्वाची उपस्थिती आहे हे गृहीत धरेल ह्या मुलाकतीचे डिझाईन शोधून काढेल तिचा एक आकार काढून दाखवेल मग प्रश्नाचा  उत्तरांचा क्रम उत्तरे देताना कोणत्या प्रश्नाला वरचा दर्जा  दिलाय कोणत्या प्रश्नांना दुय्यम मानलय ते शोधेल ह्या मुलाखतीमागची चौकट आणि मुलाखत हा एक                   साहित्य प्रकार म्हणून फॉलो केलाय का ते तपासेल मुलाखतीला एक रेखीवता प्राप्त झालीये कि नाही ते बघेल .


                                                देरिदा असे करणार नाही तो ह्या मुलाखती मागे काही हेतू असेल अगर नसेल ते बघणार नाही किंवा श्रीधर तिळवे ह्या माणसाच्या उपस्थितीला तो काडीचेही महत्त्व देणार नाही . मुलखातीला काही आकार नाहीच हे तो सिद्ध करेल तो मूळ वैगेरे शोधायच्या भानगडीत पडणार नाही ते फक्त संहिता बघेल आणि संहितेतील मजकूर वाचताना त्याच्यासाठी वाचन हा एक छानसा खेळ असेल

 तो modern विचारवंतासारख्या गंभीर आणि पोक्त चेहरा करणार नाही हा सगळा प्रकार त्याच्यासाठी केवळ एक खेळ असेल ह्या मुलाखतीला समज काही आकार  रचना प्राप्त झाली नाही तर तो आनंदच साजरा करेल तो ह्या संहितेचे माझ्या इतर संहिताशी काय नाते आहे ते तपासेल आणि संहितांच्यातले परस्परविरोध उलगडून दाखवून ती गंमत एन्जॉय करेल deconstruction ही अशी क्रिया आहे . मुळात centres ना उखडण्यासाठी ती जन्माला आली पुरुष सत्ताक समाजात पुरुष हा केंद्र तर स्त्री ही परिघावर आहे देरिदाच्या मते प्रत्येक संस्कृतीत अशी केंद्रे आहेत .


                                             भारताचा विचार केला तर आपणाला ब्राह्मण , पुरुष , संस्कृत  इंग्रजी,हिंदूशहरे अशी काही केंद्रे दिसतात तर ब्राम्हणेतर स्त्रिया देशी भाषा इतर धर्म गावे ही परिघावर असतात असे देरिदा सांगेल त्यांच्या दृष्टिकोनातून ब्राम्हणेतर स्त्रिया , देशी भाषा , इतर धर्म , गावे ही marginalised म्हणून बाहेर आहे म्हणेल त्यांनीच भारतावर राज्य केलेले दिसेल उदाहरणार्थ यूरोपात देरिदा ख्रिश्चन / ज्यू असे binary oposition मांडतो  ज्यू हे अल्पसंख्यांक मार्जिनलाईन असल्याने कसे नाडले गेले आहेत तो सिद्ध करतो .\


भारतात काय दिसते ? हिंदू / मुस्लिम असे binary मांडले तर मुस्लिम वा ख्रिश्चन marginalise असूनही त्यांनी उलट बहुसंख्यांक हिंदूंवर राज्य केलेले दिसते त्यामुळेच भारतात आज ज्याला बहुजनवाद म्हणतात तो जन्माला आला थोडक्यात भारतातील काही केंद्रे ही चमक marginalise  भाषांनीच आपल्यावर राज्य केलेले दिसते म्हणूनच देरिदा  इथे अप्लाय ( लागू ) होत नाही . मी postmodernism ला त्यामुळे सुरुवातीपासूनच विरोध केलाय . 



                                            आता मुद्दा c घेऊ तर प्रथम हा प्रश्न विचारावा लागेल कि भारतात modernity म्हणजे काय ? मी युरोपियन मांडणी ला छेद देणारी एक नवी मांडणी टिकाहरणच्या प्रस्तावनेत मांडली होती तिचे गृहीतक हे होते कि भारतात थेसिस अँटीथेसिस नावाची भानगडच अस्तित्वात नाही इथे लोकायत जैन बौद्ध भक्ती ज्युडाईक उपनिषदीय वैदिक अशी दर्शने एकमेकाला कधी समांतर तर कधी हातात हात घालून तर कधी एकमेकांचे खण्डनमण्डन करत वाटचाल करतात .



 भारतातील आधुनिकता किंवा मी जिला विषता  म्हणतो ती विशता हीही ह्या कुळातूनच अवतरते मार्क्सवाद रॉयवाद हा लोकायत सावकरवाद वा संघ हे वैदिक हा बौद्ध , कृष्णमूर्ती पुन्हा बौद्ध रानडेवाद गांधीवाद हा भक्ती फुले हा पुन्हा भक्ती  बौद्ध विवेकानंद हा उपनिषदीय विनोबा भावे उपनिषदीय अशा कुळांचीच धारा पुढे न्हेतात ( आपण युरोपियन चष्मातून भारतास पहाणे जितक्या लवकर सोडू तितके बरे ) आपली विशता ( आधुनिकता त्यातच येते ) ही वरील कुळांना पुढे न्हेते.



तुम्हाला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर वैदिक कुळ ह्या समाजात कसे काम करत होते ते समजून घ्यावे लागते आंबेडकर हे भले नंतर बौद्ध झाले असतील पण पहिल्यापासूनच त्यांचे कुळ बौद्ध होते आणि गौतम बुद्ध समजल्याशिवाय आंबेडकर समजणे शक्य नाही त्यामुळे mistaken moderniy वगैरे सगळ्या गोष्टी भम्पकच आहेत हब्बरमासने unfinished programme of modernity ची जी यूरोपात मांडणी केली त्याचा mistaken moderniy हा भारतीय अवतार आहेमुळात एक गोष्ट लक्षात घे ह्या देशात सर्वात जास्त वसाहतवादाला कोणी  बळी पडले असेल तर ते मार्क्सवादी विचारवंत most colonised thinker ह्याचे कारण त्यांना लोकायत कुळाशी आपली नाळ नीट जुळवता आली नाही तुम्हाला अध्यात्माला नकार द्यायचा असेल तर द्या पण मग इथल्या सर्वच धर्मावर , धर्मपंथावर चार्वाकाप्रमाणे तुम्हाला उग्र आणि कठोर टीका करावयास हवी मार्क्सवादांनी ही प्रखरता दाखवली नाही मी मागेच म्हटल्या प्रमाणे मार्क्सने उत्पादन संबंधाच्या आधारे संपूर्ण समाज तपासण्याचे जे अफलातून वैचारिक शस्त्र तुमच्या हातात दिले ते तरी मार्कवाद्यांनी नीट वापरले का ?
भारतीय विज्ञानाची पाळेमुळे खणून विज्ञानाची एक संगतवर धारा दाखवण्याची जबाबदारी मार्क्सवाद्यांची होती ती त्यांनी पार पडली का ? भारतातील विशता ( ह्यात आधुनिकता हि येते ) ही वसाहत वादाने डागाळलेली आहे पण त्याचबरोबर ती भारतातील दर्शन परंपरेशी मी दाखवल्याप्रमाणे नाते सांगणारीही आहे .


 हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत Indian modernity उलगडणे कठीण आहे आपली साहित्यिक modernity ही तर अधिकच गुंतागुंतीची आहे म्हणजे संत तुकारामाचे सगळे काव्य हे modern काव्य आहे हे जर एखाद्याने सिद्ध करायचे ठरवले तर ते फार कठीण नाही मग मराठी आधुनिक कवितेची सुरुवात तुकारामापासून झाली असे म्हणायचे काय ? अशावेळी तुम्हाला एक मूलभूत कसोटी द्यावी लागते ती म्हणजे आधुनिकता ही औद्योगिकतेची
( Industrilisation ) परिणीती आहे ही कसोटी तुम्ही लावली तर तुकाराम हा आधुनिक कवी नाही हे सहज सिद्ध होते . मार्टिन ल्यूथरने कॅथोलिक चर्चविरुद्ध प्रोटेस्ट करून प्रोटेस्टंट पंथ स्थापन केला म्हणून त्याला कुणी modern म्हणत नाही तुकारामाचे कामही तसेच आहे ब्राह्मणी धारेविरुद्ध केलेले ते क्षेत्रीय बण्ड होते विशतेचा त्याच्याशी फारसा संबंध नाही .


 विशतेची बीजे मात्र तुकारामांत आढळतात कारण शेवटी तो व्यवसायाने वाणी होता . आज गणपतीने दूध पिणे , सती वगैरे ज्या घटना आहेत त्या ब्राह्मणी जाणिवेच्या निदर्शक आहेत तर हुंडा स्त्रीशिक्षण वगैरे क्षेत्रीय जाणिवेतून आलेल्या आहेत त्यांचा postmodernism शी काहीही संबंध नाही एक गोष्ट लक्षात घे जेव्हा समाजात एखादी लाट येते एखादा स्फोट होतो तेव्हा त्यात आधीचे सर्वच जळून जाते असे नाही आधीचे बरेचशे शिल्लक उरते भारतातही विशीय स्फोट झाल्यानंतर विश्वीय ( धार्मिक  अध्यात्मिक ) क्षेत्रीय स्फोटातल्या कित्येक गोष्टी तशाच शिल्लक राहिल्या आणि म्हणूनच जातपात,स्त्रीशिक्षण , हुंडा , सायन्स , टीव्ही चॅनेल्स वगैरे सर्व गोष्टी एकत्रच नांदतात भारतात १९८० नंतर जो चिन्हसृष्टीय स्फोट झाला त्यात माध्यमाचा स्फोट होता , semiodities चा स्फोट होता , globalisation चा स्फोट होता त्यामुळे आपल्याकडचे अनेक विचारवंत आंबावून गेले आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी postmodernism आयात करायला सुरुवात केली ही मांडणी मूळचीच colonised होती ती आता postmodern colonialist झाली उत्तरआधुनिक वसाहतवादी झाली हे एका मर्यादेपर्यंत आवश्यकच  होते पण पुढे तो भारतीय दर्शन धाराशी नाळ जुळवण्याचा उपक्रम पार पडायला हवा होता तो काही सुरु झाला नाही माझ्यासारखी माणसे तर पूर्णपणे एकटीच पडली ह्या काळात मी जे एक नवीन networking करत होतो हे समजून घेण्याची उत्सुकताही मराठी माणसाने दाखवली नाही परिणामी मराठीतही हल्ली एका उथळ पोस्टमॉडर्निझमचे आगमन झालेलं दिसते .


                                                               
मार्गी आणि देशी लिहिताना आपण निरनिराळ्या खंडीय संवेदनशीलता ( उदाअमेरिकी संवेदनशिलता , आफ्रिकी संवेदनशीलता ) मांडताना त्याचा map बनवलाय ..... ह्या प्रकारची चिन्हनिर्मिती तुम्ही कशी करता ? तुमच्या visualization ची process कशी होते ?


                                                              मी जगाला थेट व्हिज्युलाईज  करतो मला गोष्टींना थेट पाहायला आवडते असे थेट पाहताना म्हणजे जगाचा नकाशा थेट पाहताना माझ्या मनात एक विचार आला कि हे जे यूरोप आशिया आफ्रिका , उत्तर अमेरिका , अमेरिका , आस्ट्रेलिया खण्ड आहेत हे केवळ भौगोलिक खण्ड आहेत कि सांस्कृतिक खण्ड आहेत ?  यूरोपियन्स स्वतःला नेहमीच यूरोपियन्स म्हणवतात पण तू जर युरोपचा नकाशा पाहिलास तर तुझ्या लक्षात येईल कि इंग्लंड हे राष्ट्र यूरोपपासून तुटले आहे आणि त्याचा एक फार मोठा सांस्कृतिक परिणाम यूरोपच्या विचारधारेवर झालाय . इंग्लंड हे नेहमीच उर्वरित यूरोपापेक्षा वेगळा विचार करताना दिसते आणि त्यातूनच इंग्लंड आणि इंग्लंडखेरीजचा उर्वरित कॉन्टिनेन्टल असे दोन भाग यूरोपीय विचारधारेचे दिसतात पहिल्या धारेला ऍनालीटीकल तर दुसऱ्या धारेला ते कॉन्टिनेन्टल म्हणतात.


                                                           लॅटिन अमेरिकन लिटरेचर वाचतानाही मला त्यामागे एक वेगळी संवेदनशीलता अनुभवास आली आणि ती अमेरिकेपेक्षा वेगळी जाणवली याउलट उत्तर अमेरिकेतील कॅनडा  यु.एस. ह्या दोन देशातील संवेदनशीलतेत कमालीचे साम्य जाणवले जापानीज , चायनीज , कोरियनभारतीय चित्रपट पाहताना त्यांच्यामागेही एक अनुभूती आहे  हे तीव्रतेने जाणवले आणि मग त्यातून मी खण्डिय संवेदनशीलता मांडावयास सुरुवात केली



                                                                    आज जगात जे काही धर्म आहेत ते सगळे आशिया खण्डाने जन्माला घातलेत त्यामुळे आशियाई संवेदनशीलता ही धर्म  अध्यात्म ह्यांनी भारावलेली दिसेल . यूरोप हा ग्रीक रोमन संवेदनशीलतेनी भारावलेला आहे उदाअमेरिका नवे जग आणि प्रॅक्टिकल प्रॅगमॅटिझम ने भरवलेला आहेलॅटिन अमेरिका हे स्पॅनिश संवेदनशिलता आणि नवे अद्भुत ह्याने भारावलेला आहे आफ्रिका आपल्या अहिमतेचा पाठलाग करत आजही टोळ्याटोळ्यांत विरखून पडलेला आहेऑस्ट्रेलिया हद्दपार झालेल्यांची नवीन सभ्यता घडवण्यात गुंतलेला आहे.



                                                                    जागतिकीकरणाच्या युगात ह्या सगळ्या खण्डिय सभ्यता एकमेकांशी देवाणघेवाण करणार आहेत आणि संघर्षही करणार आहे त्यांचे विश्लेषण करताना ही खण्डियता आपणाला निश्चीतच उपयोगी पडेल खरेतर आजचे साहित्यिक युग हे खण्डियतेचे युग आहे मी एका अर्थाने मराठीत लिहिणारा आशियाई लेखक आहे



                                                                तुम्ही एकदा ही खण्डियता नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येते कि आशियाई खण्डियता ही पूर्व आशिया आणि आशिया ह्या दोन पोटप्रकारात विभागली गेलीय पुढे जाऊन तुमच्या असेही लक्षात येते कि ओसामा बिन लादेनशी लढताना इंग्लंड  यु.एस एकाच भाषेत का बोलतात ? इंग्लंड,यु.एस. ,  कॅनडा ह्या तिन्ही राष्ट्रांची भाषा इंग्लीश आहे आणि आणि त्याचा एक घनदाट संस्कार त्याच्यावर आहे . इंग्लीश ही एक थंडगार लोकांची भाषा आहे आणि त्यांच्या कृतीतून एक थंडगारपणा व्यक्त होत असतो . ह्यांची प्रवृत्ती ही मूळची दुकानदाराची प्रवृत्ती आहे आणि आपली दुकानदारी नीट चालावी म्हणून  कुठल्याही थराला जाण्याची  त्यांची तयारी असते .


एक प्रकारचा बर्फाळपणा तिथे जाणवतो तर पूर्व आशियात एक रखरखीत वाळवंट जाणवते हे वाळवंट रात्री थंडगार आणि दिवसा गरम . इस्लामचा स्वभावही ही काहीसा असाच झालेला आहे त्यामुळेच ओसामा बिन लादेनच्या दहशतवादात एकाचवेळी वाळवंटाची थंडाई आणि गर्मी जाणवत असते . इस्लामची पर्दादारी आणि ओसामा बिन लादेनची पर्दादारी ह्यांच्यातही तुला एक साम्य जाणवेल.


युनायटेड अमेरिका एका बुरख्याआडच्या स्त्रीशी लढतीये यु.एस.किंवा जॉर्ज बुश ह्यांच्याकडे तू नीट पाहिलेस तर तुझ्या लक्षात येईल हे हॉलिवूड चित्रपटातल्या अमेरिकन काऊबॉय सारखे आहेतमाणसे मरण्यातला मुर्दाडपणा आणि मूर्खपणा ह्यांचा एक वाचाळ संगम तुला जॉर्ज बुश मध्ये दिसेलबुरखाधारी स्त्री आणि अमेरिकन काऊबॉय ह्यांच्यातली ही लढाई आहे आणि ती नेमका कोणता रंग धारण करेल हे सांगणे कठीण आहेमाझी व्हिज्युलाझेशनची  प्रोसेस कशी होते हे तू मला विचारलेस म्हणून मी ती एका उदाहरणासहित तुझ्यापुढे मांडली .  स्त्री वाहिनी कस जन्माला आलं ? यामागे कुठलाही trans - sexual अनुभव आहे किंवा होता का ? yin - yang पुरुष प्रकृती किंवा या स्वरूपाच्या संकल्पनांचा प्रभाव जाणवतो उदातू माझ्या पोटात आहेस ही कविता अत्यंत नैसर्गिक पणे स्त्रीनं लिहिलेली वाटते . ही आतूनच वहात असलेली वाहिनी आहे का हे ही एक external channel ( वाहिनी ) आहे ? यावर सविस्तर सांगावं .



                                                        स्त्रीवाहिनी हा कवितासंग्रह समजावून घ्यायचा असेल तर मुळात शक्ती हा नय समजून घेतला पाहिजे . असोशी , पिपासाआसक्ती , इच्छास्फूर्ती आणि प्रतिभा ह्या शक्तीच्या अनुक्रमे असंवेद्य ,संवेद्य , प्रकट , जागृतउन्नत , मुक्त अशा स्थिती . असोशीतूनच तृष्णा,  भुक आणि  निकड निर्माण होतात . मी टिकाहरण मध्ये पुरुषी तृष्णा आणि स्त्रैण तृष्णा अशी विभागणी केली होती प्रत्येक माणसात स्त्रीशक्ती  पुरुषशक्ती असतेच स्त्रीशक्ती ही काहीशी शांत , संयत , मृदू तर पुरुषशक्ती ही आक्रमक , हिंसकजोरकस असते ह्या दोन्ही सम्यक आणि सुसंवादी होणे ही निर्वाणवस्था . कुठलाही कलावंत हा स्त्रीशक्तीने ओतझोत असतोम्हणूनच कालवंताच्यातली भांडणे हीही अनेकदा बायकी असतात .




                                                          वैचारिक गणिती सातत्य हा काही स्त्रीशक्तीचा गुणधर्म नव्हे त्यामुळे अनेक कलावंतांच्यात त्याचा अभाव जाणवतो आणि त्यांचे वर्तनही अनेकदा परस्परविरोधी होत असतेस्वतःतल्या ह्या स्त्रीशक्तीशी समतोल साधत प्रत्यक्ष व्यवहारात कसे जगायचे ही पुरुष कलावंतांच्यापुढची सर्वात मोठी डोकेदुखी आहे स्त्रीवाहिनीत अनेक गोष्टी व्यक्त झालेत त्यातली ही एक डोकेदुखीही आहेच प्रत्येक स्त्री जिच्यात स्त्रीशक्ती अधिक आहे ती ह्या डोकेदुखीला सामोरी जात असतेच स्त्रीवाहिनी ही माझ्यातल्या ह्या स्त्रीशक्तीकडून आलीय . ती अत्यंत नैसर्गिकपणे माझ्यातून आलेली वाहिनी आहे ती external तर अजिबातच नाहीये ती internal आहेमाझ्या आसपासच्या अनेक स्त्रियात माझ्यातल्या स्त्रीशक्तीने शिरकाव करून त्यांच्या अंगाने मी तो अनुभव मांडलेला आहे . अर्थात अशा प्रकारचे शक्तीचे रूपांतरण होण्यासाठी तुमची शक्ती ही फक्त प्रकट असून चालत नाही तर ती जागृत आणि उन्नत व्हावी लागते स्त्रीवाहिनीतल्या प्रत्येक कवितालेखनावेळी माझ्यातली सर्व शक्ती ही स्त्रीशक्तीत रुपांतरीत झालेली होती आणि प्रतिभेचा मला आलेला तो एक वेगळाच प्रत्यय होता



                                                                 यम यमी  हा प्रयोग केवळ बहीणभावांचे संबंध                          धक्का वाटत नाही ; poststructurlism  शी या प्रयोगाचा काही धागा जुळेल का ? हा केवळ तांत्रिक प्रयोग वाटत नाही ही कलाकृती अजून स्पष्ट कराल का ? 


                                                              
 यम यमी ही कलाकृती केवळ बहीणभावांच्या संबंधावर आधारित नाही फारतर असे संबंध हे तिची सुरुवात आहे आपल्याकडे यम यमी ह्या भाऊबहिणीचा जो संवाद आहे तो विलक्षण आहे  भारतीय संस्कृतीत ज्या काही विलक्षण संवादमालिका आहेत त्यातील ही एक मी तिला चिन्हसृष्टीय स्फोटांच्या संदर्भात मांडले आहे . यमयमीत यमी यमाला सांग कर म्हणून आव्हान करतीये  आणि यम आपले नाते बहीणभावाचे असल्याने ते शक्य नाही  हे तिला पटवून देतोय विसाव्या शतकात यामी पुढाकार घेणे शक्य नाही म्हणून माझ्या ह्या  कलाकृतीत यम पुढाकार घेतो हा जो भाऊ आहे तो ब्ल्यू फिल्या पाहून चेकाळला आहे मात्र त्याची जी बहीण आहे ती मानलेली आहे सख्खी नाही आणि मग त्यांच्यात जो ताणाबाणा निर्माण होतो तो ताणाबाणाही कलाकृती प्रकट करते आपल्याकडे मानलेले बहीणभाऊ किंवा राखीभाऊ राखीबहेन हा प्रकार खूप चालतो  हे नाते विलक्षण गुंतागुंतीचे असते इथे बॉर्द्रलार्द  ज्याला सिडक्शन म्हणतो त्या सिडक्शनची शक्यता वारंवार उद्भवत असते ही कलाकृती त्या सिडक्शनचा भविष्कार आहे . मी ह्या कलाकृतीत मुद्दामच मर्ढेकरी पादाकुलकाचा वापर केला कारण मर्ढेकर हा मराठीतला एकमेव पुरुष प्रियकर ( नंतर नामदेव ढसाळ आला ) तर हा पुरुष प्रियकर आताच्या चिन्हसृष्टीय seduction च्या ethos  मध्ये आला तर त्याचे काय होईल हेही मला बघायचे होते सर्वसाधारणपणे मिथेल फुकोसारखे लोक संस्कृतीचे सत्ताकारण sexuality च्या अंगाने तपासतात ही कलाकृती मात्र संस्कृतीचे मूळ शेवटी कपड्यात असते असा anti sexual निष्कर्ष काढून संपते


                                                          
बांधकाम संपल का नाही ? चालू वर्तमानकाळात बांधली जात असलेली मयसभा एकूणच माया आणि मोक्षप्रतता यांचा झगडाच आहे का ? 


                                                       
 बांधकाम ही माझ्या कवितांमधली एक मूलभूत थीम आहे त्यावर सलील वाघने केलेली टिपणी फार मार्मिक आहे तो म्हणतो बांधकाम  चालू आहे ही श्रीधरची सर्वाधिक गाजलेली म्हत्वाची कविता . क्लासिकल , रोमँटिककलावादी , जीवनवादीपरंपराप्रिय बंडखोर असे सर्वच बॅरिअर्स मोडणारी आणि महाकाव्याची अपेक्षा निर्माण करणारी अशी ही सनातन कविता आहे . कविता प्रातिभिक उन्मेश साजरा करणारी ही कविता आहे ही कविता म्हणजे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट चित्रविचित्र हास्यस्फोट आणि ओक्सबोक्शी रडणं याच मिश्रण आहे ज्या मयसभेचं  बांधकाम चालू होतं ती मयसभा आता बांधून पूर्ण झाली आहे पण बघून झालेली नाही आणि तिचं सारखं रिनोव्हेशन  चालू आहे . व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण जेव्हा मुंबईला पहिल्यांदा टेकले तेव्हा मुंबईत त्यांना सतत नवनवीन दुरुस्त्या , बांधकाम चाललेली भघायला मिळायची त्या वेळेस त्यांना वाटलं कि हा मुंबईचा जडणघडणीचा  काळ आहे आणि आपण किती भाग्यवान कि तो आपल्याला जवळून बघायला मिळतोय पण नंतर त्यांच्या लक्षात आलं कि आपल्या करियरची पूर्ण सुरुवात आणि शेवटही आला तरी तेच चित्र जागोजागी दिसतंय आपलं भाग्य काही सरता सरत नाहीए बांधकाम पूर्ण झालीच नाहीएत ती चालूच आहे .


                                                           ह्या सलील वाघच्या टिपणीतच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे एकीकडे हे मयसभेचे बांधकाम आणि माणसांमधली मोक्षाची चिरपरिचित आच यांच्यातला हा झगडा सहजसहजी संपेल असं मला वाटत नाही तो संपायला मला मोक्षच मिळायला हवा तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही बांधकामे आणि मी एकमेकाला भिडत राहणार .


                                                    
तुमच्या काळात लिहिताहेत असे श्रेष्ठ कवी / लेखक / तत्वज्ञ तुम्हाला कोण वाटतात ? - का ? 
  मराठी 
 इतर भारतीय भाषा 
 जागतिक भाषा 


                                                     
मला वाटत श्रेष्ठ तत्वज्ञाची नावे मी ज्यांना चर्चेत उल्लेखलेल आहे त्यावरून स्पष्ट व्हावी मराठी कवी म्हणशील तर ज्ञानेश्वर , तुकाराम , नामदेव , बहिणाबाईनामदेव ढसाळ इतर भारतीय भाषांतील कबीर रेदास , गोरखनाथनरसी मेहता सगळे शीख गुरु जागतिक भाषेतील जलउद्दीन रुमी अक्ताव्हियो पाझ , पाब्लो नेरुदा वगैरे समकालीन कवितेतील सलील वाघच्या कवितेतील निकड सचिन केतकरच्या कवितेतील कल्पकता संजीव खांडेकरांच्या ऑल दॅट आय वॉंना डु तली तत्वज्ञानात्मकता मला आवडतात खरेतर बऱ्याच कवींचे मला काहींना काही आवडते . मला समकालीन मराठी गद्य लेखक अद्याप भेटलेला नाही बाकीच्या भाषातले काही गद्य वाङमय वाचायचे मी सद्या बन्द केलय कारण मी स्वतः एका अशा लेखनात गुंतलोय कि जिथून डोके वर काढून इतर कुणाचे काही वाचायला मला फुर्सत नाही हे दुःखद आहे पण खरे आहे . इतरांचे वाचण्यापेक्षा आता स्वतःचे गद्य लेखन करणे हे मला महत्वाचे वाटते आहे . 

Comments

Popular posts from this blog