Posts

Showing posts from November, 2018
सत्य किती ? सत्ये किती?श्रीधर तिळवे नाईक  गेले कित्येक लेख आपण सत्याविषयी चौथी नवता काय म्हणते याचा शोध घेत आहोत. पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे दोघेही एकच एक सत्य मानत होते आणि तशी मांडणी करत होते. याला शह देण्यासाठी म्हणून उत्तराधुनिकतेने सत्य अनेक असतात असा सिद्धांत मांडला आणि संपूर्ण आधुनिक वाद मोडीत काढला . यामागे नेमके काय कारण होते? यामागे कारण होते उत्तराधुनिक ज्ञानाची quantam प्रक्रिया जी मुळातच ऑब्जेक्टिव्ह कडून सब्जेक्टिव्ह कडे आली. सर्वसाधारणपणे पुरोगामी युग हे ऑब्जेक्टिव्ह सत्य शक्य आहे असे मानत होते तर आधुनिक युग ऑब्जेक्टिव्ह सत्य एक आहे हे स्वीकारत होते परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी फॅक्चर झालेले आहे अशी मांडणी करत होते त्यामुळेच फ्रॅक्चरड सब्जेक्ट फ्रॅक्चरड माईंड फ्रॅक्चरड सोसायटी हे आधुनिकतेचे एक फार मोठे समीकरण उदयाला आले. उत्तर आधुनिकतेने याही पुढे जाऊन अनेक सत्ये असतात असा सिद्धांत मांडला आणि सब्जेक्ट इज डेड असे जाहीर केले . त्यातूनच मग बहुविध दृष्टिकोन आणि बहुविध multiple सत्ये यांचा सिद्धांत स्वीकारला गेला यातल...