Posts

Showing posts with the label SPORTS
हरणे सहन झाले नाही कि आपणाला परकीय हात दिसू लागतो इंग्लंडविरुद्धचे हरणे हे नवे उदाहरण इंग्लंडने काल आपल्या स्पिनचा कचरा केला बुमराह कसा शांतपणे खेळायचा आणि बाकींच्यांवर कसे तुटून पडायचे ह्याचा नीट अभ्यास करून इंग्लडचे खेळाडू उतरले भारतीय अभ्यास न करता उतरले आम्ही काय भक्कमच आहोत ह्या थाटात इंग्लंडच्या कप्तानाने जो भारताला हरवेल तो विश्वचषक जिंकेल असे सामन्याआधी सांगितले होते तिथेच हे लोक अभ्यास करून उतरणार हे स्पष्ट होते रेग्युलर स्पिनर्सची धुलाई होत असतांना केदार जाधव जास्त वापरायला हवा होता आणि जर त्याला वापरायचे नसेल तर मग घेतला कशाला ? विराट कोहली मला कप्तान म्हणून कधीच ग्रेट वाटला नाही ढापणं लावलेली स्ट्रॅटेजी तो राबवत असतो (अपवाद तो धोनीचा सल्ला घेतो तेव्हा अफगाणिस्तानविरुद्ध शेवटच्या दोन षटकात ते दिसले होते  )कालचा सामना ह्याचे उत्तम उदाहरण खरेतर आयपीएल मध्ये विराटच्या कॅप्टनशिपची लक्तरे निघाली होती टीम वाईट असली कि त्याचे काहीच चालत नाही माझं स्वतःच स्पष्ट मत असं कि भारतीयांना नेतृत्वाचा बुद्धयांक कळत नाही आणि मग टीमच्या खेळाचे श्रेय आपण नेतृत्वाला देतो खरे नेतृत्व कच्चा...