हरणे सहन झाले नाही कि आपणाला परकीय हात दिसू लागतो इंग्लंडविरुद्धचे हरणे हे नवे उदाहरण इंग्लंडने काल आपल्या स्पिनचा कचरा केला बुमराह कसा शांतपणे खेळायचा आणि बाकींच्यांवर कसे तुटून पडायचे ह्याचा नीट अभ्यास करून इंग्लडचे खेळाडू उतरले भारतीय अभ्यास न करता उतरले आम्ही काय भक्कमच आहोत ह्या थाटात इंग्लंडच्या कप्तानाने जो भारताला हरवेल तो विश्वचषक जिंकेल असे सामन्याआधी सांगितले होते तिथेच हे लोक अभ्यास करून उतरणार हे स्पष्ट होते रेग्युलर स्पिनर्सची धुलाई होत असतांना केदार जाधव जास्त वापरायला हवा होता आणि जर त्याला वापरायचे नसेल तर मग घेतला कशाला ?
विराट कोहली मला कप्तान म्हणून कधीच ग्रेट वाटला नाही ढापणं लावलेली स्ट्रॅटेजी तो राबवत असतो (अपवाद तो धोनीचा सल्ला घेतो तेव्हा अफगाणिस्तानविरुद्ध शेवटच्या दोन षटकात ते दिसले होते )कालचा सामना ह्याचे उत्तम उदाहरण खरेतर आयपीएल मध्ये विराटच्या कॅप्टनशिपची लक्तरे निघाली होती टीम वाईट असली कि त्याचे काहीच चालत नाही माझं स्वतःच स्पष्ट मत असं कि भारतीयांना नेतृत्वाचा बुद्धयांक कळत नाही आणि मग टीमच्या खेळाचे श्रेय आपण नेतृत्वाला देतो खरे नेतृत्व कच्चा संघही चांगला करून दाखवतो उदा गौतम गंभीर त्याने सर्व सामने जिंकूनही धोनी कोहलीच्या राजकारणाने त्याचा बळी घेतला पुढे कलकत्ता ला त्याने कच्ची टीम पक्की करून आयपीएल चषक मिळवून दिलाच त्याआधी खरा कप्तान एकच झाला अजित वाडेकर अत्यंत कच्ची असलेली टीम त्याने महान करून दाखवली आणि नंतर धोनी त्याला पक्की टीम मिळाली पण त्याच्याकडे उत्तम नेतृत्व गुण होते सचिनला स्ट्रॅटेजी उत्तम कळायची पण अंमलबजावणीसाठी लागलेली आक्रमकता कमी पडली नाहीतर काड्या करणाऱ्या अझरुद्दीनसह सगळ्यांना हाकलून स्वतःला स्थिर केले असते पण ते जमलं नाही सौरभप्रमाणे विराटकडे आक्रमकता आहे पण स्ट्रॅटेजी नाही तो फक्त आक्रमक आहे त्यामुळे सर्व काही टीमच्या परफॉर्मन्सच्या भरवश्यावर ! कच्ची टीम पक्की करण्याचे कौशल्य नाही उलट आक्रमक स्वभावानुसार मत्सरही शिगोशीग भरलेला त्यामुळे युवराजसिंग गौतम गंभीर अश्विन हे कॅप्टनशिपचे दावेदार पद्धतशीर साईडलाईन केले गेलेले तर रवींद्र जडेजा ह्यांचा समर्थक म्हणून बाहेर फेकला गेलेला ! आणि आता हार्दिक पांड्याला उलटापूलटा करण्याचा प्रकार चालूच आहे कारण तो भविष्यातील प्रतिस्पर्धी आहे हाथोडा सुरवातीला वा मध्ये वापरायचा असतो शेवटी नाही खिळा वाकडातिकडा झाल्यावर हाथोडा मारून काय उपयोग ? तरीही हा हाथोडा खिळा कधीकधी सरळ करून पुन्हा हाणतो म्हणून बरं आहे
थोडक्यात काय काल आपण स्ट्रॅटेजीत , अभ्यासात आणि प्रत्यक्ष मैदानावरच्या परफॉर्मन्समध्ये हरलो उगाच पाक बिक डोक्यात आणण्यात काही अर्थ नाही उलट इंग्लंड दावेदार असल्याने त्याला हरवणे गरजेचे होते पाकला आपण कधीही मारू शकतो पाकची भीती नाहीच भीती इंग्लंडचीच होती आणि ती खरी ठरली .
श्रीधर तिळवे नाईक
तो मटका न्हवता पद्धतशीर प्लांनिंग होतं सुपर ओव्हरमध्ये बाऊंड्री मारणे जास्त गरजेचं आहे हे साहेबाला माहीत होतं कारण सुपर ओव्हर म्हणजे काय ते त्यांना माहित होतं न्यूझीलंडवाल्यांना बहुदा इतकं तपशीलवार माहित नसावं निदान त्यांची बॉडी लँग्वेज तेच सांगत होती आर्चर खरंतर गोंधळला होता पहिल्या बॉलला हे इंग्लिश कप्तानाच्या लक्ष्यात आल्यावर तो त्याच्यासोबतच प्रत्येक बॉलला थांबून बोलत राहिला खेळात स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असते अजित वाडेकर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी सोडले तर आपल्याकडे ती नाहीच आपण वैयक्तिक परफॉर्मन्सवर मॅच आणि युद्ध जिंकू पाहतो साहेब स्ट्रॅटेजीला फार महत्व देतो न्यूझीलंडचा कप्तान शेवटी शेवटी काहीसा विराट कोहलीसारखा ढापणं लावल्यासारखा खेळला मी मागच्या पोस्टमध्ये म्हणालो होतो खरी भीती पाकची नाही इंग्लंडची आहे मॉर्गन आणि रूट दोघेही कॅप्टन म्हणून सरस ठरले केन विल्यम्सन हा खरेतर चांगला कप्तान पण तो काल थोडा कमी पडला मी दोन्ही संघाचं अभिनंदन केलंय कारण दोघे इक्वल दिसले मात्र शेवटच्या ओव्हरमधल्या पाचव्या चेंडूवर मॅच फिरली तिथे इंग्लंडचे केवळ नशीब जिंकले आणि मॅच इक्वल झाली आणि सुपर ओव्हरचे नाटक झाले गप्टिलच्या एका अचूक थ्रोने इंडिया आउट झाला तर इथे चुकलेल्या थ्रोने न्यूझीलंडच्या हातातून मॅच गेली म्हणून म्हणालो क्रिकेट जिंकले थ्रो बहुदा प्रथमच इतका महत्वाचा बनला असावा क्रिकेट तर खेळच स्टॅटिस्टिक्सचा आहे मित्र त्याचे भान राखायलाच लागते

Comments
Post a Comment