उदारमतवादाचा अस्त आणि पुतीन श्रीधर तिळवे नाईक
रशियाचे प्रमुख पुतीन ह्यांनी उदारमतवादाचा अस्त झालाय अशी घोषणा केल्याने जगभर खळबळ माजली आहे
साहजिकच ह्या विषयावर चर्चा सुरु होणे अटळ आहे
उदारमतवादाचे बीज जगात प्रथम शैवांनी टाकले शैवांचा बहुउपायवाद म्हणजे मोक्ष व निर्वाण हे केवळ एकाच उपायाने मिळते ह्या एकउपायवादी प्रवृत्तीला दिलेले आव्हान आहे जैन आणि बौद्ध ह्यांनी फक्त ज्ञानोपायानेच मोक्ष वा निर्वाण मिळते असे सांगितले तर ज्यू ख्रिश्चन इस्लामने फक्त भक्तीचा एकांगी आग्रह धरला शिवांनी मात्र सुरवातीपासूनच भक्तोपाय ज्ञानोपाय कर्मोपाय तंत्रोपाय योगोपाय अश्या सर्वच उपायांनी मोक्ष वा निर्वाण मिळते असे सांगितले आणि सर्वच उपायांचा सन्मान केला
पुढे वैज्ञानिक युगात यूरोपात सृष्टीयतेत उदारमतवादाने असेच एकमतवादाला आव्हान दिले आणि विविध विचारप्रणालींना आयुष्यात जागा दिली पाहिजे असे सांगितले त्यातूनच धर्मनिरपेक्षवाद जन्मला आणि अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गॅरंटी देण्यात आली दुर्दवाने मुस्लिम राज्यकर्त्यांनी आणि राजवटींनी धर्मनिरपेक्षतावाद स्वीकारला नाही आणि त्यातूनच आजचा क्रायसिस जन्मला आहे
पुढे प्रतिसृष्टीयतेत ही थिम बहुसंस्कृतिवादाने मल्टीकल्चरलिज्मने पुढे न्हेली पण इथेही पुन्हा नवीन इस्लामिक राजवटींनी (ह्यात पाकिस्तान व बांगला देशही येतात ) बहुसांस्कृतिवादाला नकार देऊन आपल्या शासनात सक्तीने धर्मांतर घडवून आणून बहुसंस्कृतीवादाचा गळा घोटला आणि हळूहळू मुस्लिम फक्त आपले शासन नसते अशा राजवटीत बहुसंस्कृतीवादाची मागणी करून धूर्तपणाने आपल्या धर्मस्वातंत्र्याचे रक्षण करतात आणि जिथे बहुसंख्य मुस्लिम असतात तिथे इतरांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या गळा घोटतात हे सिद्ध झाले मुस्लिमांचा हा डबल ढोलकीपणा आणि दांभिकपणा जसा जसा मीडियातून उघड पडायला लागला तसतसे इतर धर्मियांच्या उदारमतवादी आणि बहुसांस्कृतिवादी समुदायांना आपल्या उदारमतवादी आणि बहुसंस्कृतिवादी मूल्यांचा पुन्हा विचार करणे भाग पडले ह्यातून जगभर नवीन राजवटी उदयाला आल्या पुतीन मोदी ट्रम्प शी जिनपिंग ह्यांनी मुस्लिमांच्याबाबत कठोर भूमिका घ्यायला हव्यात असा स्टान्स घ्यायला सुरवात केली शी जीनपिंगनीं तर चीनमध्ये सेपरेट मतपरिवर्तन करणारे कॅम्पच उघडले आशियातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण एव्हढे वाढले कि युरोपचा सांस्कृतिक चेहरा बदलणार कि काय अशी भीती युरोअमेरिकेतील ख्रिश्चन लोकांना वाटू लागली मुस्लिम लोकांची दादागिरी सहन करायची ह्यांची तयारी नसल्याने नव्या क्रुसेडची मानसिकता तयार व्हायला लागली मुस्लिम कट्टरतेमुळे काय होतंय ह्याची कल्पना काही मुस्लिम विचारवंतांना यायला लागली त्यांनी मुस्लिमांना उघडपणे आत्मपरीक्षण करायला सांगितले पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही मुस्लिम सत्यशोधक चळवळ स्थिर होण्याआधीच मरण पावली किंवा तिने क्रांतिकारकपणा टाकून दिला
राष्ट्रवादाचे पुनरागमन झाले जागतिकीकरणाचा अस्त होऊ लागला ह्या सर्वांची राजकीय अभिव्यक्ती होणारच होती ती पुतीन ह्यांनी केली आर्थिक पातळीवर जागतिकीकरण आवश्यक असलेले अमेरिका जर्मनी सारखे देश
संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या आर्थिक हितसंबंधाचा बळी देतील का ? पुतिनच्या रशियातील फार कम्पन्या जागतिक पातळीवर नाहीतच त्यामुळे पुतीन अशी वक्तव्ये करू शकतात पण ज्यांच्या कंपन्या जागतिक पातळीवर प्रचंड फायदा कमवतायत त्यांना अशी विधाने करता येणे शक्य नाही किंबहुना ट्रम्पची जी ह्याबाबत गोची झालीये ती आता विनोदी वाटायला लागली आहे भारतातही अंबानी टाटा बजाज ह्यासारख्यांचे हितसंबंध आता जागतिक झालेत त्यामुळे भारताला जागतिकीकरणातून माघार घेता येणे शक्य नाही ह्याबाबत आणखी एक विरोधाभास म्हणजे जगाला कट्टर वहाबी निर्यात करणारे अरब स्वतःच्या शासनात मात्र बहुसंस्कृतीवादाचा पाया टाकतांना दिसतायत दुबईला बहुसांस्कृतिवादी महानगर बनवण्याच्या दृष्टीने त्यामुळेच पाऊले पडतायत तुर्कस्तानही ह्याच दिशेने आज ना उद्या जाणारच प्रॉब्लेम हिंदुस्थानी द्वीपकल्पाचाच आहे भविष्यात सर्वाधिक कट्टर मुस्लिम कझाकिस्तान सीरिया भारत पाक अफगाणिस्तान आणि बांगला देशातच उरतात कि काय अशी आता शंका यायला लागलीये कारण इंडोनेशियानेही काळाची चाल ओळखायला सुरवात केलीये
पुतिनची गोची ही हिट्लरसारखी झालीये युरोपियन लोकांनी साम्राज्यवाद पसरवला तेव्हा जर्मनी झोप काढत होता पुढे जाग आली तेव्हा साम्राज्यवादाला देशच न्हवता परिणामी आसपासच्या देशावर हल्ला ! पुतिनचा रशिया जागतिकीकरण झाले तेव्हा असाच झोप काढत होता परिणामी जागतिकीकरणाचा फारसा फायदा रशियाला झालाच नाही आणि जी गोची जर्मन लोकशाहीची झाली होती तीच आता पुतीनची झाली आहे ह्यातून पुतीन काय करतील हे सांगता येणे अशक्य पण एक गोष्ट नक्की जगासाठी होवो न होवो पुतीनसाठी उदारमतवादाचा अस्त नक्की झाला आहे ह्यातून पुतीन हिट्लरसारखे हुकूमशहा तरी होतील किंवा पुढच्या निवडणुकीत पडतील आर्थिक प्रश्न युद्धाच्या मार्गाने सुटत नाहीत एव्हढी अक्कल त्यांनी पाकिस्तानकडून जरूर उधार घ्यावी इम्रानखानला विचारावे शेवटी उदारमतवादाचे जावो पण उधारमतवाद अजूनही नक्कीच जिवंत आहे
श्रीधर तिळवे नाईक

Comments
Post a Comment