भारतीय प्रबोधन आधी सुरु होऊनही का वाढले नाही हा भारतीय इतिहासातील एक कळीचा प्रश्न आहे ह्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण म्हणजे भारतीय प्रबोधनाला इथल्या राज्यकर्त्यांनी आधार पुरवला नाही आणि ज्यांनी आधार पुरवला त्या राजांना अतिशय पद्धतशीरपणे संपवले गेले

शंकराचार्यांनी हिंदू धर्म स्थापन करून पंचायतन देऊन हिंदूंचा गाभारा वसवला तर वेदांत सांगून मोक्षाची वाट वसवली समाजरचनेत वर्णजातिव्यवस्थेचा पुरस्कार करून वर्णजातीअधिष्ठित समाज निर्माण केला आणि अर्थकारणही वर्णजातिप्रधान केले शैवांचे धर्मांतर घडवून त्यांना हिंदू करून टाकले आणि वैदिक समाजरचना व धर्मरचना त्यांच्यावर लादली

ह्याला शैव उत्तर देणे अपरिहार्य होते शैवांचे उत्तर दक्षिणेत बसवेश्वर व उत्तरेत नानक ह्यांच्या रूपाने उदयाला आले आणि ह्यांच्या आधारे शैव राजवटी उभ्या करण्याचा प्रयत्न झाला मुस्लिमांच्यात प्रबोधनाचा राजकीय घाट घातला तो अकबराने ! त्याने दिनेईलाही हा नवीन धर्म उभा केला तर शिवाजींनी पुन्हा एकदा शैव राजवटींचा आदर्श निर्माण केला

पण मग माशी शिंकली कुठं ?

ह्यापैकी कुणी शंकराचार्यांना नाकारण्याचा प्रयत्नच केला  नाही ह्यांनी सरळ समांतर धर्म उभारले त्यामुळे पुढेही शाहूंचा अपवाद वगळता मेन स्ट्रीममध्ये पर्यायी व्यवस्था शोधण्याचा प्रयत्नच झाला नाही कुणीही शंकराचार्य नाकारले नाही ना टिळकांनी ना गांधींनी

यूरोपात रोमन व्हॅटिकन हे केंद्र मुळातच राष्ट्रांच्या बाहेर असल्याने त्याला परकं मानून राष्ट्रबाह्य मानून त्याविरोधात बंड करणे जर्मन व ब्रिटिश चर्चला सोपे गेले आपल्याकडे ब्रिटिश राजवट असल्याने त्यांनी राजाचा आवश्यक असलेला पाठिंबा दिला नाही कारण शेवटी ते परके राज्यकर्ते होते यूरोपातील प्रबोधन हे स्वकीय राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याने अवतरले भारतातही बसवेश्वर  सहज प्रबोधन करू शकले कारण राजा स्वकीय होता हा स्वकीय राजा उलटताच त्यांचेही प्रबोधन आक्रसले आणि पुढे त्यांची हत्या झाल्यावर ते भारतव्यापी होण्याऐवजी कर्नाटकात कोंडले गेले शंकराचार्यांची अशी हत्या झाली नाही उलट स्वकीय राजे त्यांच्या बाजूने होते कारण शंकराचार्य पारंपरिक होते बसवेश्वर पारंपरिक न्हवते ते बंडखोर होते आणि हे बंड शंकराचार्यांना शह देणारे होते म्हणूनच त्याचा काटा काढला गेला

भारतात नानकांनी उत्तरेत बंड उभे केले पण त्यांचेही राजे परकीय होते साहजिकच शीख धर्मगुरूंना जेलमध्ये टाकणे आणि पुढे तर त्यांचे हाल हाल करून मारणे ह्यापर्यंत मुघल शासकांची मजल गेली ह्याउलट मार्टिन ल्युथर ला सर्वांगाने राजकीय पाठिंबा मिळाला भारतीय प्रबोधन यूरोपाआधी सुरु होऊनही इथल्या राज्यकर्त्यांनी त्याचा गळा घोटला

भारतीय प्रबोधनाचा तिसरा बिंदू अकबर होता त्यालाही तो नास्तिक झाल्याने जेलमध्ये टाकण्यात आले
तर चौथा बिंदू शिवाजी महाराज होते त्यांच्याविरोधात स्वकीय मूळ राजे उलटलेच पण राजपूत आणि मोघलंही उलटले औरंगजेबाने संभाजींना हाल हाल करून मारले आणि ह्या प्रबोधनाचा मूळ कणा जखमी केला बाजीरावाने तो ताठ केला तर हरामखोर ब्राम्हणांनी मस्तानीचे निमित्त करून त्याला मानसिक पातळीवर कोंडी करून उडवले आणि इथल्या प्रबोधनाला ठार मारले नंतरची पेशवाई ही ब्राम्हणशाही आहे

अशातऱ्हेने प्रबोधनाचे चारही बिंदू इथल्या हिंदू मानसिकतेने सम्पवले

श्रीधर तिळवे नाईक

( शैव पॅरेडाईम्स अँड युरो अमेरिकन पॅरेडाईम्स ह्या माझ्या ग्रंथातील एका प्रकरणाचे संक्षिप्तीकरण )

ताजा कलम

अर्थात तरीही काही जणांच्या मते हिंदू हिंसक नाहीत आणि काही जणांच्या मते मुघल फार सज्जन होते पूर्वी फक्त कठीण होतं आता सर्वच जागी अवघड झालंअयातुल्लाह खोमिनीने घडवलेली क्रांती सुरवातीला आकर्षक वाटली खरी पण हळहळू तिचे स्वरूप स्पष्ट होत गेले आणि ही एक मूलतत्त्ववादी राज्य आणण्यासाठी झालेली क्रांती आहे हे स्पष्ट झाले मी ह्यावर १९८३ साली एक कविता लिहिली होती जी पुढे २००४ साली आलेल्या क व्ही ह्या काव्यसंग्रहात समाविष्ट झाली होती तिचा सुरवातीचा भाग इथे देत आहे
श्रीधर तिळवे नाईक
हे सर्व ईथं मर्यादित होत नाही वस्तुस्थिती अशी आहे कि इस्लामने सर्वत्र प्रबोधनाचा गळा घोटला तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रबोधन कोंडले गेले

Comments

Popular posts from this blog