बा सी मर्ढेकर 

मर्ढेकर हे व्यक्तिमत्व एक विलक्षण रसायन होते . एकीकडे जुन्या छंदात विशेषतः पादाकुलक अभंग ओवीत  ते नवी कविता लिहीत होते आणि दुसरीकडे नवे सोंदर्यशास्त्र रचत होते मराठीची एक परंपरा अशी कि दोन पातळीवर कोणी काम करत असेल तर त्या कवीची कविता साईडलाईन करायची आणि आणि त्याला समीक्षक म्हणून जास्तीत जास्त गाजवायचे मर्ढेकरांच्या बाबत हेच घडले आणि मराठीत त्यांच्या कवितांची चर्चा कमी आणि सौन्दर्यशास्त्राची चर्चा जास्त झाली ह्याला छेद साठोत्तरी पिढीने दिला आणि मर्ढेकरांच्या कविता चर्चेत आणायला सुरवात केली त्यांनी मर्ढेकरांचे सौन्दर्यशास्त्र साईडलाईन केले आणि कवितेतला आधुनिकतावादी आशय केंद्रस्थानी आणला . मात्र एका मुद्दयांवर चर्चा झालीच नाही तो मुद्दा म्हणजे कवितेत पक्के आशयवादी असणारे मर्ढेकर समीक्षेत आकृतिवादी का झाले ?

ह्या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन कवितेच्या स्थितीत आहे . रोमँटिसिझमने भारावलेल्या त्या कालखंडात रोमँटिक भावना असली म्हणजे काम भागते अशी गैरसमजूत पसरली आणि रविकिरण मंडळाच्या त्याच त्याच प्रतिमा जुन्या  कढीला नवा ऊत आणावा तश्या नवा ऊत आणून सादर होऊ लागल्या आणि कवितांचे सपाटीकरण सुरु झाले . ह्या काळात बहुदा कोल्हापूरला असल्याने असेल पण माधव ज्युलियन काही प्रमाणात वाचले ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कवितेला जिवंत ठेवण्यासाठी मर्ढेकरांना कवितेविषयीचे नवे इक्वेशन इंजेक्शन म्हणून आणणे भाग पडले . आकृती सुधारावी म्हणून आणि कविता अधिक नीटनेटकी व्हावी म्हणून त्यांनी नव्या प्रतिमा म्हणजे नवी क्रांती असे नवे इक्वेशन आणले . ह्यातून विंदा करंदीकर ,   सदानंद रेगे  असे दमदार आधुनिकतावादी कवी आलेच पण कुसुमाग्रज , पु शि  रेगे , बा भ बोरकर असे काही रोमँटिक कवी प्रतिमावापराबाबत अधिक ताजे आणि नीटनेटके झाले ह्याचवेळी अनिलांच्यामुळे घडलेला मुक्तछंद मर्ढेकरांनी मुक्तछंद तर लिहीन मीही असे म्हणत ''बिघडलाय'' हे अधोरेखित केले . पुढे  पु शि रेग्यांनी हा बिघडलेला मुक्तछंद नेमकेपणाने नीटनेटका केला आणि साठोत्तरीच्या मुक्तछंदाची पार्श्वभूमी तयार केली 

पण दुर्देवाने इथेच सत्यकथा आली आणि तिने मर्ढेकरांच्या सोंदर्यशास्त्राची धुव्वाधार चर्चा करायला सुरवात केली आणि प्रतिमावाद इतका बोकाळला कि कविता म्हणजे प्रतिमांच्या फटाक्यांची लगड अशी गैरसमजूत पसरली . जो आकृतिवाद बिघडलेल्या आकृतीला दुरुस्त करायला जन्मला होता तोच कवितेची आकृती 
साचेबद्ध्य  करू लागला . जर मर्ढेकरांच्या सौन्दर्यशास्त्रांइतकीच चर्चा त्यांच्या साहित्याची झाली असती तर हा अनर्थ टळला असता . असो . 











Comments

Popular posts from this blog