आदरणीय अरुंधतीजी नमस्कार ! ह्या प्रोजेक्ट्चा वेग हा सामुदायिक प्रयत्नावर अवलंबून आहे त्यामुळे कोण कोण कुठे आहे हे स्पष्ट होत जाईल . माझे इंग्लिश आमच्या गावरान भाषेत सांगायचं तर डबडा आहे नितीनने प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला होता एकट्या नितीनवर भार टाकता येईल का ? तो त्याचे काम चोख करेल अशी मला खात्री आहे इतरांशी माझे बोलणे झालेले नाही पण प्रणवला अनुवादाचा अनुभव असल्याने तो इंग्लिश अनुवादाबाबत काही काम करू शकेल असे वाटते मी इंग्लिश ट्रान्सलेशनला मदत देण्याचा प्रयत्न करू शकतो मी प्रयत्न म्हणतोय कारण तस्लिमाच्या तीन कवितांचा अनुवाद तोही हिंदीतुन मराठी एव्हढाच माझा अनुभव त्यामुळे ह्या विषयात अधिकारवाणीने बोलण्याचा मला अधिकार नाही तुम्ही हातात घेतलेलं काम शिव धनुष्यासारखे झालेले दिसत असले तरी ते हळूहळू पेलेल अशी मला खात्री वाटते मला प्रामाणिकपणे वाटते कि इंग्लिश अनुवाद तुमच्याइतका चांगला कुणी करू शकणार नाही ज्यांना अडचणी कळतात त्यांनाच त्यांच्या निवारणाचे मार्गही सापडायला लागतात अशा कित्येक कविता आहेत ज्या इंग्लिशमध्ये सहज होऊ शकतील असे मला वाटते मी माझ्या बाजूने मला शक्य ...
Posts
Showing posts with the label ARUNDHATI PROJECT