मला अनुवादाचा अनुभव नाही पण पुनर्वाचन करावे लागते कधीकधी ! शेक्सपिअर कॉलेजातच समग्र वाचला होता पण पीचडीच्या वेळी पुन्हा वाचावा लागला पुढे पीटर ब्रुकने ऑथेल्लोचा अर्थ एक दिग्दर्शक म्हणून कसा पलटवला ते वाचले आणि ब्रुकच्या नजरेतून ऑथेल्लो वाचायची वेळ आली त्यानंतर पुन्हा सलमान रश्दीने मूरस लास्ट साय लिहिली आणि ती वाचतांना पुन्हा ऑथेल्लो वाचायची वेळ आली ब्रुकने वंशभेदाच्या अंगाने तर रश्दीने तो मूर असल्याच्या अंगाने ऑथेल्लो पाहिला होता आता हा युवल हे अनएन्डिंग आहे मॅट्रिक्सवर मी दैनिक प्रहारमध्ये लेखमालिका लिहिली तेव्हाही त्याचे काही तुकडे पुन्हा पाहावे लागले होते नंतर त्यात एक बॉद्रीलार्द चा संदर्भ आहे म्हणून तो कन्फर्म करायला पहावा लागला होता सर्वाधिक वाचन अर्थातच महाभारताचे करावे लागते महाभारताने सगळ्या भारतीय लेखकांची ठासलेली आहे सर्वात वाईट म्हणजे महाभारत अथपासून इतिपर्यंत ब्राम्हण्यवादाचे  समर्थन करत असल्याने त्याची धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी प्रत्येक वाचनात अवस्था असते युवल भारतीय नाही हेच बरे
------------------------------------
सर्वोत्कृष्टतेची आस ही एकतर तुमच्यात असते किंवा नसते ती कल्टिव्हेटेड असेल अगर नसेल पण एकदा तिने तुम्हाला झपाटलं कि तुम्ही फालतू ठीकठाक बरे तर सोडूनच द्या पण उत्कृष्टतेपाशीही थांबत नाही हे सर्वोत्कृष्ट नेमके कुठे भेटेल ह्याचाही अंदाज तुम्हाला यायला लागतो एखादा तीनमध्ये एक सर्वोत्कृष्ट  देतो एखादा दहात सुरवातीला तर एखाद्याची  नेट प्रॅक्टिसच चालू असते पण तिथेही असा सर्वोत्कृष्टवाला कळतो एखादा सुरवातीला फार सामान्य खेळत असतो पण अचानक त्याला स्वतःचा खेळ सापडतो आणि सर्वोत्कृष्ट बाहेर पडायला लागते फेसबुकवर सर्वोत्कृष्टतेपेक्षा लाईक्स कशाला मिळतील ह्याचाच अदमास आधी घेतला जातो असे लोक लाईक्स कमवू शकतात पण सर्वोत्कृष्ट निर्माण करू शकत नाहीत

मराठी समीक्षा आणि समीक्षक अवरेजवादी आहे
----------------------------------------------------------------------------------------------

मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मराठीत भावावरच्या कवितांची सुरवात मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगापासून होते ताटी उघडा ज्ञानेश्वरा मधील आर्तता कुणाला साद घालत नाही? इंग्लिशमध्ये भावावरच्या कविता हे फार जुने वळण आहे सिफ्रिड ससून ची टु माय ब्रदर ही गाजलेली कविता ह्याचे उदाहरण म्हणता येईल माझे माझ्या भावंडांशी असलेले संबंध हे गाढ आहेत आणि मी त्यांच्यावर अनेक कविता लिहिता झालो आहे संन्यास म्हणजे रुक्ष कोरडेपणा न्हवे संन्यास म्हणजे सर्वव्यापी करुणा ज्या काळात ही कविता लिहिली गेली त्या काळात कॉलेज आणि दुकानाचे आटलेले उत्पन्न ह्यातून वाटचाल सुरु होती आणि ही वाटचाल माझ्या भावाचीही होती मला वाटतं अनेक घरात हे घडत असावे मनोहर ओकांची कविताही मस्त आहे हिंदूंमध्ये नेमाड्यांनी टिपलेला भावड्या काळजाला घरे पाडणारा !खरेतर मराठीतल्या भावंडांच्या संबंधावर कुणीतरी नीट संशोधनच करायला हवं विशेषतः आम्ही गावातून आलेले लोक भावंडगिरीला अतिशय महत्व देतो असे माझे निरीक्षण आहे मनोहर ओकांचे वैशिष्टय म्हणजे मुंबईत असूनही त्यांनी असे चित्रण केले आहे महानगरात भावंडांशी असलेले संबंध जिव्हाळ्याचेच असतात असा माझा अनुभव आहे फक्त त्याला जी कमर्शियल हितसंबंधांची फोडणी मिळते ती बघण्यासारखी असते सचिन तेंडुलकर अजित तेंडुलकर राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा मुकेश अंबानी अनिल अंबानी ह्या भावंडांच्या जोड्या पाहण्याजोग्या ! बॉलिवूडमध्ये तर भावंडप्रेम टोटल फिल्मी !असो !

धन्यवाद !








Comments

Popular posts from this blog