FACESHIP
ITS THE RELATIONSHIP ON FACEBOOK WITHOUT FLESHAL CONTACT. IT COMMUNICATES DIGITAL THINGS BUT NEVER TOUCH EACH OTHER. ALL PLEASURES AND SORROWS ARE SHARED WITHOUT REAL SENSES.
SHRIDHAR TILVE NAIK
सतीश तांबे ह्यांच्या पोस्टवर लिहिलेली कॉमेंट
अर्थसंदिग्धता व दुर्बोधता श्रीधर तिळवे नाईक
अर्थसंदिग्धता हा मुळीच काव्यगुण न्हवे तो एक सापेक्ष इफेक्ट आहे आकलन आणि अनाकलन ह्यांच्यामुळे निर्माण झालेला ! दुर्बोधता हे त्याचे टोक ! अर्थसंदिग्धता व दुर्बोधता दोन प्रकारची असते १ सहज २ हेतुग्रस्त जी सहज असते ती अर्थसंदिग्धता व दुर्बोधता उत्तम पण जी अर्थसंदिग्धता व दुर्बोधता मुद्दाम हेतुपूर्वक निर्माण केली जाते ती घटिया ! तिची सुरवात ग्रेस आणि खानोलकर ह्यांनी केली . लेखकाचे कामच मुळी शब्द ह्या साधनांद्वारे अर्थ ह्या माध्यमातून अनुभव निर्माण करणे हे असते हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधता अनुभवाचा गळा घोटते तर सहज निर्माण झालेली अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही अनुभवाच्या कक्षा रुंदावते अनुभवविश्व विस्तारते मर्ढेकर हे सहज अर्थसंदिग्धता व दुर्बोधतेचे उत्तम उदाहरण आहे अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही अनेकदा शब्दांना प्रतिमा म्हणून सादर करण्यातून निर्माण होते सत्यकथेचा सत्यानाश हा ह्या फोफाश्या आणि हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधतेमुळे झाला ज्यावेळेला थेट बोलणे शक्य नसते त्याकाळात प्रतिमेद्वारा बोलणे करावे लागते बी कवींची चाफा हे त्याचे उदाहरण ! ते तत्कालीन समाजात समर्थनीय होते पण आताच्या काळात जो पोर्नो बघता बघता कविता वाचतो चाफ्याच्या भाषेत बोलत असेल तर तो मूर्खच म्हंटला पाहिजे प्रतिमांनी अनुभव कॅरी केला पाहिजे अर्थसंदिग्धता व दुर्बोधता न्हवे चाफ्याच्या काळात चाफ्याने हे काम केले होते आणि रसपान ह्या शब्दात सगळं स्पष्ट झाले होते आणि वाचकांनाही ते कळले होते लज्जा हा त्या कवितेच्या अनुभवाचा प्राण आहे आणि ही लज्जा तत्कालीन स्त्रीबाबत नैसर्गिक व स्त्रीसुलभ आहे ग्रेस किंवा खानोलकर ह्यांच्याबाबत ती जेव्हा अनुभवाचा नैसर्गिक भाग म्हणून येते तेव्हा छान वाटते आरती प्रभूंची नाही कशी म्हणू तुला हे ह्याचे उत्तम उदाहरण ! पण आजचे रोमँटिक कवी ज्यांच्याकडे ही लज्जा औषधालाही नसते जेव्हा लज्जेचे ओंगळ प्रदर्शन करतात तेव्हा कवितेची लाज निघते हेतुग्रस्त अर्थसंदिग्ध व दुर्बोध लिहण्याचे दिवस साठोत्तरीने इतिहासजमा केले ह्या काळातल्या ग्रेस आरती प्रभूंच्या हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधतेची जितकी धुलाई आपण करू तितके बरे हेतुग्रस्त अर्थसंदिग्धता व दुर्बोधता ही अनेकदा मागासलेल्या समाजातून किंवा व्यक्तीच्या मनातून निर्माण होते प्राध्यापक किंवा तत्सम असलेली व्यक्ती जेव्हा पन्नासाव्या वर्षीही स्युडो रोमँटिक राहते तेव्हा आत्ताच्या काळात तो अडाणीपणा असतो ग्रेस किंवा आरती प्रभूंचा रोमँटिसिझम हा रोमँटिसिझमचा शेवटचा तुकडा असायला हवा होता अहो हिंदी चित्रपटांची गाणीसुद्धा आता पुढे सरकायला लागली बाकी अनुभवाचा नैसर्गिक भाग म्हणून प्रवाहित होणाऱ्या प्रतिमाप्रवाह , सहज दुर्बोधता व सहज अर्थसंदिग्धता ह्या तीन गोष्टी अनुभवाच्या अटळ भाग आहेत पण लेखकाचा उद्देश ह्या गोष्टी असू नयेत त्यामुळे अनुभव डेड होतो आणि एक्सपीरियन्स डेड होणं कलेला परवडणार नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment